Wednesday, January 6, 2021

प्रा.गोविंद लहाने यांना साई प्रतिष्ठान पुणे यांचा श्रीसाई समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार 2020 प्रदान

प्रा.गोविंद लहाने यांना साई प्रतिष्ठान पुणे यांचा श्रीसाई समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार 2020 प्रदान



सोनपेठ (दर्शन) :-
 
सोनपेठ येथील श्री महालिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातील समाजशास्त्र विषयाचे प्रा गोविंद लहाने  यांना साई प्रतिष्ठान पुणे च्या वतीने श्रीसाई समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार 2020 आॅनलाईन पद्धतीने प्रदान करण्यात आला. प्रा गोविंद लहाने यांनी  साई प्रतिष्ठान ने आयोजित अनेक काव्य स्पर्धांमध्ये आपल्या कविता सादर केल्या असून, त्यांच्या या समाजप्रबोधनपर  काव्यलेखन व   सादरीकरण यांची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करून तो  5 जानेवारी रोजी आँनलाईन पद्धतीने प्रदान करण्यात आला. प्रा गोविंद लहाने हे एक प्रसिद्ध कवी असून, ते शैक्षणिक क्षेत्राबरोबर सामाजिक व सांस्कृतिक कार्यातही नेहमी सहभागी असतात. त्यांना आता पर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळाल्यामुळे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

No comments:

Post a Comment