Saturday, January 30, 2021

अधीक्षक कार्यालयात विनाकारण येणार्‍या अधिकारी - कर्मचार्‍यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई ; पोलिस अधीक्षकांचा इशारा

अधीक्षक कार्यालयात विनाकारण येणार्‍या अधिकारी - कर्मचार्‍यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई ; पोलिस अधीक्षकांचा इशारा


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

पोलिस अधीक्षक कार्यालयात अधिकारी - कर्मचार्‍यांनी विनाकारण फिरू नये, अन्यथा अशा अधिकारी - कर्मचार्‍यांना शिस्तभंगाच्या कारवाईस सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी दिला आहे.
पोलिस अधीक्षक कार्यालयातील विविध विभागात, कार्यालयात काही अधिकारी - कर्मचारी सातत्याने येऊन तेथील कर्मचार्‍यांना भेटत असल्याची बाब पोलिस अधीक्षकांच्या निदर्शनास आली आहे. विशेष म्हणजे पोलिस अधिकारी - कर्मचार्‍यांच्या बदल्या, रजा, पदोन्नती यासह अन्य प्रशासकीय कामांसाठी अधीक्षक कार्यालयात त्या-त्या विभागातून वेळेत कामे पूर्ण केल्या जातात. मात्र, तरीही काही जण येथेच घुटमळत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या अधिकारी - कर्मचार्‍यांसाठी परिपत्रक काढून अशा अधिकारी - कर्मचार्‍यांना पायबंद घालण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीचे ड्युटी पास असल्याशिवाय पोलिस अधिकारी - कर्मचार्‍यांना कार्यालयात येता येणार नाही. विनाकारण पोलिस अधिकारी - कर्मचारी पोलिस अधीक्षक कार्यालयातील विभागांत फिरताना आढळल्यास त्यांच्याविरूध्द शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा पोलिस अधीक्षक जयंती मीना यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment