Sunday, January 31, 2021

संभाजी ब्रिगेडचे महासचिव मा.शिवश्री सौरभ दादा खेडेकर यांचा 2 फेब्रुवारी मंगळवार रोजी परळी दौरा......

संभाजी ब्रिगेडचे महासचिव मा.शिवश्री सौरभ दादा खेडेकर यांचा 2 फेब्रुवारी मंगळवार रोजी परळी दौरा......

परळी / सोनपेठ (दर्शन) :-
 
संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ दादा खेडेकर यांचा मंगळवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी परळी दौरा असून या दौऱ्याचे वेळापत्रक सकाळी 10.00 वा.संभाजी ब्रिगेड तालुका संपर्क कार्यालय उदघाटन जलालपुर,सकाळी 11 वाजता संभाजी ब्रिगेड कार्यकर्ता मेळावा लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे दुपारी 03.00 वाजता कार्यकर्त्यांसाठी राखीव वेळ अनुसया पॅलेस,दुपारी 04.00 वाजता पत्रकार परिषद अनुसया पॅलेस, संध्याकाळी 07.00 वाजता मौजे करेवाडी येथे संभाजी ब्रिगेडच्या तालुक्यातील पाच शाखांचे उदघाटन होणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शिवश्री प्रा.एम.एल. देशमुख,कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक शिवश्री डॉ.बालाजी जाधव,प्रमुख अतिथी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा.भास्कर निर्मळ,प्रमुख अतिथी संभाजी ब्रिगेड केंद्रीय निरीक्षक शिवश्री शशिकांत कन्हेरे,प्रमुख उपस्थिती संभाजी ब्रिगेड बीड पूर्व जिल्हाध्यक्ष प्रवीण ठोंबरे, संभाजी ब्रिगेड बीड मध्य जिल्हाध्यक्ष विजय दराडे,संभाजी ब्रिगेड बीड पश्चिम जिल्हाध्यक्ष महेंद्र मोरे,संभाजी ब्रिगेड माजी जिल्हाध्यक्ष राहुल वायकर,हे राहणार आहेत.या कार्यक्रमा साठी परळी तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संभाजी ब्रिगेड शाखा परळी तालुका तसेच मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड,वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद व सर्व कक्ष परळी वैद्यनाथ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सिंदखेडराजा / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
सा.सोनपेठ दर्शन राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ विशेषांकाची पाहणी करताना 12 जानेवारी 2021 जिजाऊ सृष्टी येथे संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ दादा खेडेकर व संभाजी ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष मनोज आखरे यांच्या सोबत सा.सोनपेठ दर्शन चे संपादक किरण रमेश स्वामी दिसत आहेत. 

सा.सोनपेठ दर्शन आपल्या पंचक्रोशितील बातम्या व जाहीरातीसाठी संपादक किरण रमेश स्वामी संपर्क मो.9823547752.

एकदा भेटाल परत-परत भेटाल...........!

नोट :- एका मिनीटात आटकेपार फक्त सा.सोनपेठ दर्शन आँनलाईन लिंक व्दारे तसेच जाहीरात ही वृतपत्रा सोबत सोशल मिडिया वाट्सप,फेसबुक,इन्स्टाग्राम व ट्युटर वरती देखील.

पहीले इस्तमाल करे फिर विश्वास करे.......!     









Saturday, January 30, 2021

अधीक्षक कार्यालयात विनाकारण येणार्‍या अधिकारी - कर्मचार्‍यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई ; पोलिस अधीक्षकांचा इशारा

अधीक्षक कार्यालयात विनाकारण येणार्‍या अधिकारी - कर्मचार्‍यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई ; पोलिस अधीक्षकांचा इशारा


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

पोलिस अधीक्षक कार्यालयात अधिकारी - कर्मचार्‍यांनी विनाकारण फिरू नये, अन्यथा अशा अधिकारी - कर्मचार्‍यांना शिस्तभंगाच्या कारवाईस सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी दिला आहे.
पोलिस अधीक्षक कार्यालयातील विविध विभागात, कार्यालयात काही अधिकारी - कर्मचारी सातत्याने येऊन तेथील कर्मचार्‍यांना भेटत असल्याची बाब पोलिस अधीक्षकांच्या निदर्शनास आली आहे. विशेष म्हणजे पोलिस अधिकारी - कर्मचार्‍यांच्या बदल्या, रजा, पदोन्नती यासह अन्य प्रशासकीय कामांसाठी अधीक्षक कार्यालयात त्या-त्या विभागातून वेळेत कामे पूर्ण केल्या जातात. मात्र, तरीही काही जण येथेच घुटमळत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या अधिकारी - कर्मचार्‍यांसाठी परिपत्रक काढून अशा अधिकारी - कर्मचार्‍यांना पायबंद घालण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीचे ड्युटी पास असल्याशिवाय पोलिस अधिकारी - कर्मचार्‍यांना कार्यालयात येता येणार नाही. विनाकारण पोलिस अधिकारी - कर्मचारी पोलिस अधीक्षक कार्यालयातील विभागांत फिरताना आढळल्यास त्यांच्याविरूध्द शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा पोलिस अधीक्षक जयंती मीना यांनी दिला आहे.

Friday, January 29, 2021

अखिल भारतीय विरशैव लिंगायत महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदि किरण सोनटक्के तर सुभाषअप्पा नित्रुडकर यांची मराठवाडा विभागीय अध्यक्षपदि निवड

अखिल भारतीय विरशैव लिंगायत महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदि किरण सोनटक्के तर सुभाषअप्पा नित्रुडकर यांची मराठवाडा विभागीय अध्यक्षपदि निवड

मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

अखिल भारतीय विरशैव लिंगायत महासंघाच्या मुख्य कार्यालयात मुंबई येथे प्रदेश कार्यकारणीच्या सर्व साधारण बैठकीत अखिल भारतीय विरशैव लिंगायत महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदि किरण सोनटक्के मांडाखळी जि.परभणी यांची तर सुभाषअप्पा नित्रुडकर सोनपेठ जि.परभणी यांची मराठवाडा विभागीय अध्यक्षपदि सर्वानुमते निवड करण्यात आली.आजतागायत आपन केलेल्या सामाजीक व धार्मिक कामाचा आढावा बघता आपन समाजाला योग्य दिशेने घेऊन जात आहात.युवा वर्गास योग्य मार्गदर्शन करुन संघटित कौशल्य आपल्या अंगी आहे म्हणून आपल्या सामाजीक कार्यास व्यासपीठ उपलब्ध करुन देण्या करीता आम्ही आपली निवड केली आहे.तरी आपन या पदाचा समाज हीतासाठी निस्वार्थपणे सदउपयोग करुन चांगले कार्य करुन या पदास न्याय द्याल अशी आपेक्षा निवड पत्रात व्यक्त करुन प्रदेश अध्यक्ष मा.विष्णू जंगम,प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते मा.डाँ.विजय जंगम,महासचिव मा.अजित जंगम,सचिव तथा प्रवक्ते वैजनाथ स्वामी तसेच सर्व प्रदेश कार्यकारणी सदस्य व बसलिंगआप्पा मोडीवाले, विनोद चिमनगुंडे, रामेश्वर महाजन,राजेश्वर चौडे, संपादक किरण स्वामी ,संपादक परमेश्वर लांडगे,पत्रकार संतोष स्वामी,उमाकांत कोल्हेकर,सदाशीव कोल्हेकर,कोंडीबा एकलारे, नागनाथ कोटुळे, भिमाशंकर शिंदे,महालिंग मेहत्रे, श्रीकांत मेहत्रे,अखिल भारतीय विरशैव लिंगायत महासंघ सोनपेठ तालुका शाखा सर्व सदस्य,मित्र परीवाराच्या वतिने व सर्वस्तरातुन अभिनंदन होताना दिसत आहे.





Thursday, January 28, 2021

अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचा ९ व्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी ; कोल्हापुरात ६ फेब्रुवारी रोजी वीरशैव समाज हजारोंच्या संख्येत होणार दाखल

अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचा ९ व्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी ; कोल्हापुरात  ६  फेब्रुवारी रोजी वीरशैव समाज हजारोंच्या संख्येत होणार दाखल


कोल्हापूर / परभणी / सोनपेठ (दर्शन) : -

अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या नववा वर्धापनदिन कोल्हापूर येथे दि.६  फेब्रुवारी २०२१ रोजी मोठ्या दिमाखात साजरा होणार असून राज्यासह देशभरातील वीरशैव समाज बांधव हजारोंच्या संख्येत दाखल होणार असल्याची माहिती अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ जिल्हाध्यक्ष संतोष जंगम यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. अक्कमहादेवी मंडप,बिंदु चौक कोल्हापूर येथे सकाळी ९ ते दुपारी २ वाजता होत असलेल्या महासंघाच्या वर्धापनदिन सोहळ्याला महाराष्ट्र राज्यासह राजस्थान, कर्नाटक, गुजराथ, हरियाना, दिल्ली आदी भागातून समाज बांधव उपस्थित राहणार आसल्याची माहिती संतोष जंगम यांनी दिली आहे. 
कोल्हापूर येथे होत असलेल्या महासंघाच्या नवव्या वर्धापनदिनाचे यजमानपद अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या कोल्हापूर जिल्हा शाखेने स्वीकारले असून प.पू.डॉ.निळकंठ शिवाचार्य धारेश्वरकर,  प.पू.डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य मन्मथधामकर, प.पू.श्रीगुरू महादेव शिवाचार्य वाईकर, वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य वसमतकर, प.पू. डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य मुखेडकर, नूल मठाचे मठाधिपती प.पू. गुरूसिध्देश्वर शिवाचार्य यांचे प्रमुख मार्गदर्शन या सोहळयात लाभणार आहे. या कार्यक्रमास म्हाडा चे मराठवाडा सभापती(राज्यमंत्रीदर्जा) संजयजी केणेकर, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्रीदर्जा) अशोक स्वामी,दिलीप स्वामी मुख्यकार्यकारी अधिकारी,सोलापुर,सुधिर हिरेमठ पोलिस उपआयुक्त पिंपरी चिंचवड,सिध्दाराम सालीमठ मुख्यकार्यकारी अधिकारी,पालघर, इचलकरंजीच्या नक्षराध्यक्षा अॅड.सौ.अलका  स्वामी, कोल्हापूर महापालिकेच्या नगरसेविका उमा बनछोडे, वीरशैव बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापुरे, वीरशैव बँकेचे संचालक चंद्रकांत जंगम, न्यायाधिश. सोनाली स्वामी, महासंघाचे बांग्लादेश संघठक श्री. पंकज रॉय, यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
२०२१ मध्ये होणार्‍या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर महासंघाच्या या वर्धापनदिनाकडे औत्सूक्याने पाहिले जात आहे. या बाबत महासंघाची भूमिका काय असेल याकरिता समस्त वीरशैव समाजाचे लक्ष आहे. 
वर्धापनदिनाच्या अनुषंगाने वीरशैव समाजात आपल्या कार्याची विशेष छाप सोडणार्‍या पुणे येथील शरद गंजीवाले,कायदेतज्ञ महेश स्वामी,बाळ देऊळकर, कोल्हापूर वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुनिल गाताडे, हिन्दू आणि वीरशैव एकच या पुस्तिकेचे लेखक सोलापूर येथील सिध्दाराम पाटील यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तर प्रशासकीय तथा सामाजीक क्षेत्रात विशेष कामगिरी करणार्‍या रामदास पाटील यांना धर्मरक्षकवीर, स्पर्धा परीक्षेसाठी सातत्याने विद्यार्थ्याना मार्गदर्शन करीत हजारो प्रशासकीय अधिकारी या देशाला देणारे आदरणीय मनोहर भोळे यांना विशेष कार्यगौरव, कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष सुनिल गाताडे यांना समाजभूषण, सामाजिक कार्यकर्ते किशोर बाळासाहेब पाटील यांना समाजभूषण, पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनिय कामिगरीसाठी पत्रकार परमेश्वर लांडगे यांना निर्भिड पत्रकार आणि साहित्यरत्न, वैद्यकीय क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी औरंगाबाद येथील शासकीय कर्करोग रूग्णालयाचे डॉ. महेश रेवाडकर व डॉ.जयश्री तोडकर पुणे यांना वैद्यकिय सेवारत्न,  सामाजिक,राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात विशेष योगदान असलेल्या बीड येथील पत्रकार संतोष स्वामी यांना विशेष कार्यगौरव, सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणार्‍या कोल्हापूर येथील वीरशैव अर्बन मल्टीपर्पज निधि बँकेचे चेअरमन संतोष जंगम यांना सहकाररत्न, कोल्हापूर येथील पत्रकार बाळकृष्ण सांगवडेकर यांना उत्कृष्ट साहित्यिक,अॅड महेश स्वामी यांना कायदेरत्न व सागर माळी यांना कार्यगौर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचेही यावेळी बोलतांना डॉ.स्वामी यांनी सांगीतले.
 अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे अध्यक्ष भिवलिंग जंगम, महासचिव अजित स्वामी, कोषाध्यक्ष प्रकाश जंगम, सचिव वैजनाथ स्वामी, महिला आघाडी प्रमुख विद्याताई जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापुर जिल्हाध्यक्ष संतोष जंगम,महिला जिल्हाध्यक्षा सौ.स्नेहल मठपती व समस्त पदाधिकारी यांचे वतीने सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील अधिकाधिक समाज बांधवांनी महासंघाच्या या वर्धापनदिन सोहळ्याला उपस्थित राहून वीरशैव समाजासाठी ऐतिहासिक ठरणार्‍या या क्षणांचे साक्षीदार व्हावे असे आवाहन महासंघाच्या राज्यभरातील शाखांकडून करण्यात आले आहे.

Sunday, January 24, 2021

सोनपेठ तालुक्यातील COVID-19 च्या काळात केलेल्या कामाचे प्रमाणपत्र व कार्यमुक्ती प्रमाणपत्राची मागणी

सोनपेठ तालुक्यातील COVID-19 च्या काळात केलेल्या कामाचे प्रमाणपत्र व कार्यमुक्ती प्रमाणपत्राची मागणी



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
 
मा.ना.नवाबजी मलीक साहेब,पालकमंत्री परभणी,
तथा मंत्री,अल्पसंख्याक विकास व औकाक कौशल्य विकास,रोजगार व उद्योजगता, महाराष्ट्र राज्य,मुंबई-32.यांना परभणी येथे "जनता दरबार" जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्र.प्राचार्य हरीभाऊ कदम व प्रा.सखाराम कदम यांनी प्रा. डॉ.चव्हाण अशोक दौलतराव,शहर संघटक,राष्ट्रवादी काँग्रेस तथा प्राध्यापक.कै.र.व.महाविद्यालय,सोनपेठ,जि.परभणी यांच्या स्वाक्षरी चे निवेदन यात विषय मा.जिल्हा शल्यचिकिस्तक व मा.जिल्हाधिकारी यांचे कडून COVID-19 च्या काळात केलेल्या कामाचे प्रमाणपत्र व कार्यामुक्ती प्रमाणपत्र मिळणे बाबत.संदर्भःजा.क्र.2019/महसुल/आपत्ती व्यवस्थापन,मा. जिल्हाधिकारी यांचे पत्र दि. 07/04/2020.जोडुन वरील विषयी सन्मानीय पालकमंत्री तथा मंत्री महोदयांच्या सेवेत विनंती करण्यात आली की,सोनपेठ तालुक्यातील सर्व शिक्षक व महाविद्यालयातील प्रोफेसरर्स, डॉक्टरर्स, यांनी COVID- 19 साठी तयार केलेल्या निवारनगृहाच्या ठिकाणी सेवकांची कार्य, तसेच चेक पोस्ट च्या ठिकाणी चौकीदारची कार्य तसेच सोनपेठ तालुक्यातील व शहरातील सर्वेक्षणाची कामे शिक्षक व महाविद्यालयातील प्राध्यापकांनी केलेली आहेत.विविध स्तरावर आपत्ती निवरणाचे सक्रिय काम करणाऱ्या शिक्षक व प्राध्यापकांना मा.जिल्हा शल्य चिकिस्तक व मा.जिल्हाधिकारी यांचे कडून COVID-19 च्या काळात केलेल्या कामाचे प्रमाणपत्र व कार्यामुक्ती प्रमाणपत्र देऊन सहकार्य करावे ही विनंती.तरी सन्मानीय पालकमंत्री परभणी तथा मंत्री महोदय यांनी COVID-19 च्या काळात आपती व्यवस्थापना मध्ये काम करणाऱ्या शिक्षक व प्राध्यापकांना न्याय देऊन सहकार्य करावे ही विनंती केली आहे.


मा.नवाब मलीक यांना "जनता दरबार" येथे राष्ट्रीयकृत बँक एसबीआयची सोनपेठ साठी दुसऱ्या शाखेची श्रीकांत विटेकर यांची मागणी

मा.नवाब मलीक यांना "जनता दरबार" येथे राष्ट्रीयकृत बँक एसबीआयची सोनपेठ साठी दुसऱ्या शाखेची श्रीकांत विटेकर यांची मागणी


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
मा.ना.नवाबजी मलीक साहेब,मंत्री,अल्पसंख्याक विकास विभाग महाराष्ट्र राज्य,मुंबई तथा पालकमंत्री,परभणी जिल्हा यांना श्रीकांत उत्तमराव भोसले (विटेकर) नगर परिषद सदस्य सोनपेठ यांनी "जनता दरबार" जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे राष्ट्रीयकृत बँक एसबीआयची सोनपेठ साठी दुसरी शाखा देणे बाबतचे निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष तथा आ.बाबाजानी दुर्रानी व मा.जि.प.अध्यक्ष तथा सभापती राजेशदादा विटेकर उपस्थीत होते.निवेदनात सोनपेठ शहरात एसबीआय व एसबीएच अशा असलेल्या दोन शाखांचे विलीनीकरणात एकच शाखा झाल्याने व्यापारी,शेतकरी, पगारदार,नागरिक व निवृत्ती वेतनधारक वृध्दांना जास्त त्रास सहन करावा लागत आहे.1.5 लाख लोकसंख्येचा सोनपेठ तालुका सह पाथरी तालुका व परळी तालुक्यातील काही भाग या बैंकेवर विसंबून आहे.त्यामूळे येथे सदैव गर्दी राहते.एकच शाखा असल्याने 50 टक्के शेतकरी जानेवारी महिना आला तरी खरीपाच्या पीक कर्जापासून वंचित आहेत.रब्बीच्या पीक कर्जाच तर खरच नाही. जिल्हयात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे थकीत कर्ज,10 टक्के
रक्कम भरना ओटीएस मध्ये माफ होत असताना सोनपेठ मध्ये मात्र कुठल्याही कामासाठी शेतीची कामे सोडून तासनतास रांगेत रहावे लागत आहे.महाराष्ट्र शासनाच्या कोविट-19 विषयी सामाजिक अंतर तर एकच शाखा व लाखो ग्राहक असल्याने पाळणे शक्य दिसत नाही. व्यापाऱ्यांना छोटयाशा कामासाठी बँकेत दिवस घालावा लागतो.कुटुंब निवृत्ती वेतनासाठी वृध्द तासनतास रांगेत असतात.एसबीआय मध्ये काम होत नाही म्हणून अनेकांना खाजगी जवहार करावे लागत आहेत.तरी शहर व तालुका सोनपेठ चा आवाका लक्षात घेता सोनपेठ शहरात राष्ट्रीयकृत बँक एसबीआयच्या दुसऱ्या शाखेची नितांत गरज आहे.तरी या संबंधी मा.साहेबांनी लक्ष घालून पाठपुरावा करावा.अशी विनंती केलेली आहे.


Saturday, January 23, 2021

शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण संपन्न

शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण संपन्न 



मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
 
शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा मुंबईतील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक येथे पार पडला.आदरणीय खा.शरद पवार साहेबांनी या सोहळ्यास उपस्थित राहून स्व.बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली.स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या ओजस्वी विचारांचे आणि त्यांच्या तडफदार कार्यशैलीचे स्मरण या प्रतिकृतीच्या रूपाने इथल्या युवा पिढीला होत राहील, अशी भावना पवार साहेबांनी यावेळी व्यक्त केली.या सोहळ्याला राज्याचे मा.मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे,अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.छगन भुजबळ,जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील,महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात,विरोधी पक्षनेते ना.देवेंद्र फडणवीस,नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे,उद्योग मंत्री ना. सुभाष देसाई,अल्पसंख्याक मंत्री ना.नवाब मलिक,पर्यावरण मंत्री ना.आदित्य ठाकरे,मनसेचे अध्यक्ष ना.राज ठाकरे,केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले उपस्थित होते.

श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी समर्पण अभियानास सहकार्य करा - शिवाजी मव्हाळे

श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी समर्पण अभियानास सहकार्य करा - शिवाजी मव्हाळे


 
सोनपेठ  (दर्शन) :-

सोनपेठ शहरात गल्लो-गल्ली तसेच घरो-घरी श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी समर्पण अभियानास सुरुवात दि.15 जानेवारी ते दि.15 फेब्रुवारी 2021 पर्यंत चालनार्या या अभियानाची सुरुवात श्रीराम मंदीर रामदासी यांच्या येथुन महाआरतीने करण्यात आली.यामधे राष्ट्रीय स्वयमसेवक संघ व श्रीराम प्रेमी सर्व पक्षीय नागरीकांनी सहभाग नोंदवून शहरातुन समर्पन निधी दिलेला आहे.तसेच आता ग्रामिण भागातुन प्रतेक गाव, वाडी,तांडे येथेही आम्हा स्वयमसेवकांना सर्व ग्रामिण पक्ष संघटना यांनी सहकार्य करुन यासाठि समर्पन निधी जमा करण्यासाठी मदत करुन सतकर्म करावे, आज उभा राहत असलेल्या श्रीराम मंदिरास एका-एका घरातुन फुल ना फुलाची पाकळी म्हनुण हातभार लावावा या कार्यासाठी देशातील पाचच कंपनी पुर्णत्वास घेऊन जात होत्या परंतु अनेकांना या पवित्र कार्यास लोकसहभाग असावा असा विचार समोर आला व ति संधी आपल्याला मिळाली आहे.त्या संधीचे सोने करुन जास्तीत जास्त नागरीकांनी सहभाग नोंदवून पुण्य पदरी मिळवावे असे आवाहन भाजपा परभणी जिल्हा ग्रामिण उपाध्यक्ष शिवाजी मव्हाळे यांनी सा.सोनपेठ दर्शनशी बोलताना व्यक्त केले.

 

Friday, January 22, 2021

पालकमंत्री नवाब मलिक यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम

पालकमंत्री नवाब मलिक यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम



परभणी / सोनपेठ (दर्शन) :- ​ 

राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि. 24 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता परभणी येथे आगमन व शासकीय विश्रामगृह सावली येथे राखीव. सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय परभणी येथे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटी, दुपारी 1 ते 2 दरम्यान राखीव. दुपारी 2 वाजता पालकमंत्री हे जिल्हाधिकारी कार्यालयात जनतेचे निवेदन स्विकारतील. सायंकाळी 4 वाजता जल जीवन समितीची बैठक, सायंकाळी 4.30 वाजता जिल्हा खनिज प्रतिष्ठाणची बैठक, सायंकाळी 5 वाजता माजी महापौर प्रताप देशमुख यांच्या निवासस्थानी चहापान, सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत राखीव. रात्री 8 वाजता जाकीर अहेमद खान मोईन खान यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन व सोईनुसार मुक्काम करतील.
सोमवार दि.25 जानेवारी रोजी सकाळी 8 ते 9.30 वाजता राखीव. सकाळी 10 वाजता जिल्हा वार्षिक योजना बैठक, दुपारी 3 वाजता परभणी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस भेट, सायंकाळी 4 वाजता राहत कॉ.ऑप क्रे सोसा. परभणी येथे भेट, सायंकाळी 6 ते 7 वाजेदरम्यान शासकीय विश्रामगृहात राखीव. सायंकाळी 7 वाजता उदघाटन व दर्पण निमित्त सदभावना संमेलन व संता गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थिती. रात्री 8 वाजता आखील इनामदार यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन व सोईनूसार मुक्काम करतील.
मंगळवार दि.26 जानेवारी रोजी सकाळी 9.05 वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमकडे प्रयाण. सकाळी 9.15 ते 10.40 वाजेदरम्यान प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम परभणी येथे आगमन व ध्वजारोहण व इतर शासकीय कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 वाजता परभणी येथून मोटारीने वसमत जि.हिंगोलीकडे प्रयाण करती.

अ.भा.वीरशैव लिंगायत महासंघाच्या पुरस्कारांची घोषणा ; पत्रकार परमेश्वर लांडगे व संतोष स्वामींना अनुक्रमे साहित्यरत्न व कार्यगौरव पुरस्कार ६ फेब्रुवारी रोजी कोल्हापुरात मान्यवरांच्या हस्ते वितरण

अ.भा.वीरशैव लिंगायत महासंघाच्या पुरस्कारांची घोषणा ; पत्रकार परमेश्वर लांडगे व संतोष स्वामींना अनुक्रमे साहित्यरत्न व कार्यगौरव पुरस्कार
६ फेब्रुवारी रोजी कोल्हापुरात मान्यवरांच्या हस्ते वितरण


पुणे / परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या नववा वर्धापनदिन कोल्हापूर येथे दि.६ व ७ फेब्रुवारी २०२१ रोजी साजरा करण्यात येणार असून या अनुषंगाने वीरशैव समाजाच्या उत्कर्षासाठी वाहुून घेतलेल्या अनेक मान्यवरांचा विशेष सत्कार, त्याच बरोबर विविध क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटविणार्‍या वीरशैव समाजातील ९ मान्यवरांना विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती महासंघाचे प्रवक्ते डॉ.विजय जंगम स्वामी यांनी पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलतांना दिली.महासंघाच्या वतीने दिल्या जाणार्‍या या राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी मराठवाड्यातील चौघांची निवड करण्यात आली असून त्यात अहमदपूरच्या भक्तिस्थळाचे अध्यक्ष आणि प्रशासकीय अधिकारी रामदास पाटील, औरंगाबादच्या शासकीय कर्करोग रूग्णालयाचे डॉ.महेश रेवाडकर, पत्रकार परमेश्वर लांडगे आणि पत्रकार संतोष स्वामी यांचा समावेश आहे.
रामदास पाटील यांना धर्मरक्षकवीर, डॉ. महेश रेवाडकर यांना वैद्यकिया सेवारत्न, परमेश्वर लांडगे यांना साहित्यरत्न तर संतोष स्वामी यांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या बरोबरच राज्यातील आणखी ६ जणांना समाजभूषण पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार असून त्यामध्ये मनोहर भोळे,सुनिल गाताडे, किशोर बाळासाहेब पाटील,संतोष जंगम, बाळकृष्ण सांगवडेकर, सागर माळी यांचा समावेश आहे. दि.६ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर येथे महासंघाच्या ९ वर्धापनदिनी निमंत्रित धर्मगुरूंच्या सानिध्यामध्ये उपस्थित मान्यवरांच्याच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
२०२१ मध्ये होणार्‍या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर महासंघाच्या या वर्धापनदिनाकडे औत्सूक्याने पाहिले जात आहे. या बाबत महासंघाची भूमिका मांडतांना प्रवक्ते डॉ.विजय जंगम म्हणाले, वीरशैव समाज हा हिन्दू धर्माचाच एक भाग असल्याने हिन्दू पासून त्याला वेगळे करता येत नाही. मात्र, राजकीय हेतूने प्रेरित झालेली समाजातील काही मंडळी वेगळ्या लिंगायत धर्माची मागणी करीत असून येत्या जनगणनेमध्ये धर्माच्या रकान्यात आपला धर्म लिंगायत असे लिहिण्यासाठी समाजाला सांगून मोठ्या प्रमाणात दिशाभूल करीत आहेत. वीरशैव समाजाच्या कोणत्याही घटकाने या अफवेला बळी पडुन आपला धर्म सोडू नये. जनगणनेचा फॉर्म भरतांना धर्माच्या रकान्यात आपला धर्म हिन्दू असल्याचेच नमून करावे. हिन्दू धर्म आहे आणि वीरशैव-लिंगायत ही आचरण पध्दती आहे. त्यामुळे याकडे समाज बांधवांनी गंभीरतेने पाहिले पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेत महासंघाचे अध्यक्ष भिवलिंग जंगम, महासचिव अजित स्वामी, कोषाध्यक्ष प्रकाश जंगम, सचिव वैजनाथ स्वामी, महिला आघाडी प्रमुख विद्याताई जंगम यांच्यासह अनेक पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

Thursday, January 21, 2021

भाषेचा वापर होत राहील तोपर्यंत भाषा जिवंत राहते-डॉ.संजय कांबळे

भाषेचा वापर होत राहील तोपर्यंत भाषा जिवंत राहते-डॉ.संजय कांबळे


सोनपेठ (दर्शन ) :-

सोनपेठ येथील कै. र. व.र. महाविद्यालयाच्या मराठी विभागाकडून शासन निर्देशाप्रमाणे 14 ते 28 जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा0 साजरा होत असून यापूर्वी कवी संमेलन घेण्यात आले आहे. याच उपक्रमांतर्गत आज डॉ. संजय कांबळे (मराठी विभाग, राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटी बेळगाव कर्नाटक) यांचे 'मराठी भाषा: काल, आज आणि उद्या' या विषयावर फेसबुक लाईव्ह व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी वरील उद्गार काढले.
 बाराव्या शतकात ताम्रपट व शिलालेखातून शब्द रुपात अवतरलेली मराठी तेराव्या शतकांमध्ये ज्ञानेश्वरी, विवेकसिंधु व लीळाचरित्र सारख्या उत्तमोत्तम ग्रंथातून काव्य व तत्वज्ञानाचे पाठ शिकवू लागली. 'माझा मराठाची बोलू कौतुके' व 'मज चक्रधरे निरुपिली मराठी,तियाची पुसा ' यासारख्या अट्टहासतून आपले सामर्थ्य प्रगट करू लागली. शिव काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहारकोश तयार करून मराठी भाषेला प्रतिष्ठा व राजभाषेचा दर्जा मिळवून दिला. पेशवेकाळात याच मराठीतून शाहिरांनी लावणी व पोवाड्याच्या माध्यमातून शृंगार व वीर रसाला मोकळी वाट करून दिली. 
 पुढे यावनी आक्रमणाच्या काळामध्ये संत एकनाथ व नरसिंह सरस्वती यांनी मराठीतून ग्रंथरचना करून मराठीची सेवा केली. ब्रिटिशांच्या आगमनानंतर मराठी भाषा आमूलाग्र बदलली. विरामचिन्हांचा वापर व गद्य लेखनाची वेगळी पद्धत मराठीत रूढ झाली. महात्मा ज्योतिराव फुले, केशवसुत, चिपळूणकर, कोल्हटकर यांनी मराठी भाषेचे सामर्थ्य कथा, कविता, निबंध व नाटक यातून व्यक्त केले.
 साठोत्तरी कालखंडामध्ये दलित, आदिवासी, स्त्रीवादी व ग्रामीण साहित्यातून आशयाच्या विविध शक्यता सामर्थ्याने अभिव्यक्त झाल्या. कामगार आहे मी तळपती तलवार आहे... म्हणणारे सुर्वे असोत वा 'एक तीळ सर्वांनी करणडून खावा... म्हणणारे ढसाळ असोत. मराठी कविता माणूस आणि माणसाचं जगणं महत्त्वाचं मानू लागली. बाबूराव बागुल, दया पवार, अण्णाभाऊ साठे शंकरराव खरात, प्र. ई. सोनकांबळे, ज.वी. पवार यांच्या लेखणीतून दलितांच्या व्यथा- वेदना सामर्थ्यानिशी व्यक्त झाल्या व मराठी भाषेला नवे आयाम प्राप्त झाले. ज्यांनी चूक केली येथे जन्म घेण्याची त्यांनीच ती सुधारली पाहिजे देश सोडून अथवा विद्रोह करून... अशी विद्रोहाची पेरणी करत कथा, आत्मकथा व कविता या तीनही अंगाने आंबेडकरी विचार आत्मसात करून प्राप्त आत्मभानाने अभिव्यक्ती साधली.
 मी नाही केवळ मादी, मी माणूस माणूस आधी....असे म्हणत म्हणत येथल्या स्त्रियांनीही आपल्या माणूसपणाची अभिव्यक्ती कविता, कथा व कादंबरीतून सामर्थ्यानिशी प्रगट केली. 
  याच वेळी जंगल दरयातून राहणाऱ्या आदिवासींनी बिरसा मुंडा, बाबुराव शेडमाके, राणी दुर्गावती यांच्या प्रेरणा लक्षात घेऊन लिहिलेल्या  लेखणीने जंगल, जमीन व पाणी यावर आमचा हक्क आहे म्हणत उलगुलान उभारले. भुजंग मेश्राम, वाहरू सोनवणे, उषाकिरण आत्राम, बाबुराव मडावी यांच्या साहित्यातून आदिवासींच्या जगण्याचे हक्क व अधिकार अबाधित राहावे यासाठी ची तळमळ दिसून येते.
   शेती आणि शेतकऱ्यांच्या व्यथा वेदनांना मुखरित करण्याचे काम मराठी ग्रामीण साहित्यातून याचवेळी झाल्याचे दिसून येते. डॉ. आनंद यादव, ना. धों. महानोर, इंद्रजीत भालेराव, विठ्ठल वाघ, भास्कर चंदनशिव, रा. रं. बोराडे यांच्या साहित्यातून कृषी व कृषकांच्या समस्या प्रचंड ताकदीने मराठी साहित्यात व्यक्त झाल्या. 'मातीसाठी जगाव माती साठीच मरावं, बाळा माती लई थोर तिला कसं विसराव... अशी जमिनीशी एकरूप राहण्याची शेतकऱ्यांची मानसिकता या कथा, कविता व कादंबरीतून सामर्थ्यानिशी व्यक्त होऊ लागली.
  एकविसाव्या शतकामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सगळ्याच भाषा आमूलाग्र बदलत आहेत. मराठी ही त्याला अपवाद नाही. फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर, मेसेंजर च्या माध्यमातून मराठी चे नवीन रूप दिसून येऊ लागल आहे. ई-मेल व मेसेजच्या माध्यमातून इंग्रजीचे आक्रमण थोपवून न धरता येऊ शकणारी अपरिहार्यता आपल्या सर्वांच्या लक्षात येत आहे. तरीही जोपर्यंत मराठी भाषा बोलणारा शेवटचा माणूस जिवंत आहे तोपर्यंत मराठी भाषेच्या जिवंत असण्याची, वाहण्याची काळजी करण्याचे काहीही कारण नाही असेही यावेळी डॉ. कांबळे म्हणाले.
  या फेसबुक लाईव्ह ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन मराठी विभागाकडून भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सखाराम कदम यांनी तर आभार विभागप्रमुख डॉ. बालासाहेब काळे यांनी मानले. या फेसबुक लाईव्ह व्याख्यानास तांत्रिक सहाय्य डॉ. विठ्ठल जायभाये यांनी केले. यावेळी प्राचार्य, डॉ. वसंत सातपुते, डॉ.मुकुंदराज पाटील, डॉ.बी. व्ही. आंधळे, डॉ. सा.द. सोनसळे, प्रा. सुरेश मोरे, डॉ. संतोष रणखांब, प्रा. अंगद फाजगे यांच्यासह प्राध्यापक व अनेक विद्यार्थी सहभागी होते.

महाराष्ट्र पत्रकार संघाचे परभणी जिल्हाध्यक्ष- प्रदीप कोकडवार, उपाध्यक्ष-किरण स्वामी व सचीव-के डी वर्मा यांची निवड

महाराष्ट्र पत्रकार संघाचे परभणी जिल्हाध्यक्ष- प्रदीप कोकडवार, उपाध्यक्ष-किरण स्वामी व सचीव-के डी वर्मा यांची निवड



मुंबई / परभणी / सोनपेठ  :-

महाराष्ट्र पत्रकार संघाची राज्यास्तरीय व जिल्ह्यातील जिल्हा पदाधीकारी पण २०२१ साठी खालील नाव जाहीर केली आहेत.राज्याध्यक्षपदी – विलासराव कोळेकर उपाध्यक्षपदी -सागर पाटील व विनोद वर्मा सचीव -शेखर सुर्यवंशी, सह सचीव – प्रतापराव शिंदे, प्रमुख संघटक -शिरीष कुलकर्णी, प्रशांत लाड,सोमनाथ पाटील, संपर्कप्रमुख -बाबासाहेब राशिनकर, अण्णासाहेब कोळी,डॉ.सुनील भावसार, रश्मी मदनकर, राज्य उपसंपर्कप्रमुख – भोला गुप्ता,बाळ तोरसकर,राजेंद्र गोसावी, कोकण विभाग अध्यक्ष – सुनील पवार, मराठवाडा विभाग अध्यक्ष – डॉ शिवपुत्र कनाडे, उपाध्यक्ष – डॉ.सुभाष हुलपल्ले,संपर्कप्रमुख – प्रविण मोरे, पुणे विभागीय अध्यक्ष – मनोज राऊत, राज्य कार्यकारी सदस्यय – राजेश जोष्टे (चिपळूण) -सोमनाथ पाटील (भडगाव),रावसाहेब काटकर (कोल्हापूर),नरेंद्र येरावार (नांदेड),ईश्वर महाजन (अमळनेर),दिपक पोतदार (जयसिंगपूर),प्रकाश वंजोळे (खंडाळा),उत्तम कागले (हुपरी), पद्माकर पांढरे (बल्लारपूर), सौ.शालन कोळेकर (खंडाळा),सदानंद खिंडरे (किल्लेधारुर),प्रल्हाद साळुंखे (धुळे),दिनेश कांबळे, कायदेविषयक सल्लागार – Ad.प्रकाश साळसिंगीकर(मुंबई हायकोर्ट),Ad. रामरक्षा सोनार (मुंबई) Ad.नितीन दसवडकर(पुणे) , प्रमुख सल्लागार -सदानंद शिंदे (मुंबई)डॉ.संजय सोनावणे (पनवेल),डॉ.राजेंद्र मोरे (पुणे),प्रा.महेश थोरवे-पाटील (पुणे),पंढरीनाथ बोकारे (नांदेड),किरण सोनावणे (ठाणे).

जिल्हाध्यक्ष

1) जळगाव जिल्हाध्यक्ष-सुधाकर पाटील
2) उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष-प्रा.डॉ.महेश मोटे,उपाध्यक्ष-अमोल पाटील, सचीव-डॉ.सुधीर पंचगल्ले
3) सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष-प्रा.संजय शेळके
4) गोंदिया जिल्हाध्यक्ष-सतिश कोसरकर, उपाध्यक्ष-कुमारसिंह सोमवंशी व राधाकिशन चुटे ,सचीव-बाबुलाल देवारे
5) मुंबई उपनगर -जिल्हाध्यक्ष-दिलीप शेडगे,उपाध्यक्ष-अनील अंबावले,सचीव-मोहन जाधव
6) सातारा -जिल्हाध्यक्ष-दिनेश लोंढे,उपाध्यक्ष-रविंद्र वाकडे,सचीव-गौतम भोसले
7) ठाणे जिल्हाध्यक्ष-शंकर (राज)परब,उपाध्यक्ष-प्रा.डॉ.प्रकाश माळी,सचीव-सुप्रीया भारस्वाडकर
8) सोलापूर जिल्हाध्यक्ष-श्रीकांत बाविस्कर, उपाध्यक्ष-विरभद्र पोतदार, सचीव-सिध्देश्वर डोके
महिला विभाग जिल्हाध्यक्ष-सौ.रजनी साळवे
9) चंद्रपूर जिल्हाध्यक्ष -सुरेश रामगुंडे,
10) रत्नागिरी जिल्हाध्यक्ष- जगदीश कदम,उपाध्यक्ष-वसंतराव काटे
11) अहमदनगर- जिल्हाध्यक्ष संजय नवले,उपाध्यक्ष-शांताराम दराडे,सचीव-हरिभाऊ मंडलीक
12) लातूर जिल्हाध्यक्ष-विठ्ठल तगलपल्लेवार, उपाध्यक्ष-भारत जाधव,सचीव चंद्रकांत लवटे
13) धुळे जिल्हाध्यक्ष-ईश्वर बोरसे,उपाध्यक्ष-अंबादास सगरे, सचीव-लक्ष्मण गोपाळ,
14) बिड जिल्हाध्यक्ष-बापुसाहेब हुंबरे,उपाध्यक्ष-देवेंद्रसिंह ढाका,सचीव-प्रा.चंद्रकांत नवपुते
15) नंदुरबार जिल्हाध्यक्ष-सुधीरकुमार ब्राम्हणे,उपाध्यक्ष-भरत नगराडे,सचीव-सचीन जडोदकर
16) रायगड जिल्हाध्यक्ष-प्रा.श्रद्धा शेटये,उपाध्यक्ष-संजय गायकवाड
17) सांगली जिल्हाध्यक्ष -संतोष पाटील,उपाध्यक्ष -अभिजित शिंदे ,जिल्हा संपर्कप्रमुख- दिलिप क्षीरसागर,जिल्हा सचीव- भगवान देवकर
18) पुणे जिल्हाध्यक्ष-प्रा.किरण जाधव,उपाध्यक्ष-प्रमोद परदेशी,सचीव-विजय जगताप
19) मुंबई शहर जिल्हाध्यक्ष-अनुज केसरकर, उपाध्यक्ष-राजेंद्र माने,सचीव -अनील नांगरे
20) नाशिक जिल्हाध्यक्ष-सचीन बैरागी, उपाध्यक्ष-रामदास कदम,सचीव-किरण काळे
21) यवतमाळ जिल्हाध्यक्ष-प्रवीण रोगे,उपाध्यक्ष-माधव चव्हाण, सचीव-विनोद ढेरे
22) कोल्हापूर जिल्हाध्यक्ष-अनिल उपाध्ये ,उपाध्यक्ष मधुकर भोसले (कागल),उपाध्यक्ष-संजय सुतार (शिरोळ),उपाध्यक्ष-बाजीराव पालकर (भुदरगड),सचीव -रमेश बोराटे (वडगाव),जिल्हा संपर्कप्रमुख -अनिल निगडे (करवीर)
23) नांदेड जिल्हाध्यक्ष-नामदेव यलकटवार
24) परभणी जिल्हाध्यक्ष-प्रदीप कोकडवार,उपाध्यक्ष-किरण स्वामी,सचीव-कचरूलाल वर्मा
25) जालना जिल्हाध्यक्ष-गणेश जाधव,उपाध्यक्ष-गौरव बुट्टे व संजय आहेर,सचीव-सुयोग खर्डेकर
26) नागपूर जिल्हाध्यक्ष-गजेंद्रसिंग लोहिया, उपाध्यक्ष-प्रितपालसिंग भाटीया
27) भंडारा जिल्हाध्यक्ष- शिवशंकर टेंभरे, उपाध्यक्ष-डी.जी.रंगारी व लिलाधर वाडीभस्मे,सचीव-ऋग्वेद टेंभरे
28) हिंगोली जिल्हाध्यक्ष-शिवाजी करडे,सचीव-गोपाल सातपुते
29) बुलढाणा जिल्हाध्यक्ष-वनिता जगदेव बोराडे, सचीव-रविंद्र वाघ
30) अकोला जिल्हाध्यक्ष-अरुण वैतकार
31) अमरावती जिल्हाध्यक्ष-नंदकिशोर काळमेघ
32) औरंगाबाद जिल्हाध्यक्ष-प्र.जिल्हाध्यक्ष-आकाश महालपुरे
33) गडचिरोली प्र.जिल्हाध्यक्ष-प्रा.मोहन वाटगुरे,उपाध्यक्ष-सहदेव रूमारे
34) वर्धा जिल्हाध्यक्ष-उमंग शुक्ला
35) पालघर जिल्हाध्यक्ष-प्रमोद पाटील, उपाध्यक्ष-राजेंद्रकुमार ढगे
36) बेळगाव जिल्हाध्यक्ष-बसवराज तारदाळे
यांची निवड राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी जाहीर केली आहे.

Saturday, January 16, 2021

दि वैद्यनाथ अर्बन को-आॕप.बॕक लि ; शाखा सोनपेठ च्या शाखा सल्लागार पदी जान्हवी किसान सेवा केंद्राचे तसेच जान्हवी पेट्रोल पंप संचालक मा.जगदीशअप्पा बुरांडे यांची निवड

दि वैद्यनाथ अर्बन को-आॕप.बॕक लि ; शाखा सोनपेठ च्या शाखा सल्लागार पदी जान्हवी किसान सेवा केंद्राचे तसेच जान्हवी पेट्रोल पंप संचालक मा.जगदीशअप्पा बुरांडे यांची निवड 




सोनपेठ (दर्शन ) :-

दि वैद्यनाथ अर्बन को-आॕप.बॕक लि;मुख्य शाखा परळी वैजनाथ चे चेअरमन मा.अशोक जैन यांनी नुकतेच नियुक्ती पत्र देऊन दि वैद्यनाथ अर्बन को-आॕप.बॕक लि ; शाखा सोनपेठ च्या शाखा सल्लागार पदी जान्हवी किसान सेवा केंद्राचे तसेच जान्हवी पेट्रोल पंप संचालक मा.जगदीशअप्पा बुरांडे यांची निवड केली आहे तसेच पुढिल वाटचालीस मा.अशोक जैन यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.या निवडी बद्दल दि वैद्यनाथ अर्बन को-आॕप.बॕक लि;बँकेचे प्रथमेश सदाशिवराव देशपांडे यांनी ही मा.जगदीशअप्पा बुरांडे यांना पुष्पगुछ देऊन अभिनंदन केले तसेच विरशैव समाज बांधव, मित्र परीवार, प्राध्यापक, वकिल, डाँक्टर्स,सा.सोनपेठ दर्शन परीवार व सर्व स्तरातील नागरीकांच्या वतिने शुभेच्छाचा वर्षाव होताना दिसत आहे.



समाजकार्य पदवीधारकांना विवीध पदावर डावल्या बाबत आरोग्य मंत्री यांना निवेदन

समाजकार्य पदवीधारकांना विवीध पदावर डावल्या बाबत आरोग्य मंत्री यांना निवेदन


 
सोनपेठ (दर्शन) :- 

महाराष्ट्र शासनाचे आरोग्य मंत्री मा.राजेश टोपे यांना राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस परभणी जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप दत्तात्रय भोसले यांनी दि.13 जानेवारी 2021 रोजी मुंबई येथिल राष्ट्रवादी काँग्रेस भवन "जनता दरबारात" एका निवेदना द्वारे समाजकार्य पदवीधारकांना विवीध पदावर डावल्या बाबत आरोग्य मंत्री यांना जातीने लक्ष घालुन होनारा अन्याय दुर करावा अशी विनंती केलेली आहे.या निवेदनात 
वरील विषयी विनंती पुर्वक निवेदन सादर करण्यात येते की,मी कुलदीप दत्तात्रय भोसले, रा.सोनपेठ जि.परभणी येथील रहिवाशी असुन मी समाजकार्य (एम.एस.ड्ब्ल्यु.)पदवीधर आहे.आपल्या शासनाच्या आरोग्य खात्यात व्यावसायिक समाजकार्याच्या विद्यार्थ्यांसाठी (एम.एस.डब्ल्यु.) अनेक वर्षापासून समाजकार्य पदवीधारकांना अभ्यासक्रमानुसार समुपदेशक /अधीक्षक/ गृहपाल जाहिराती मधून अशी विविध पदे भरण्यात येत होती.मात्र मागील काही वर्षात ही पदे अनारक्षित करण्यात येऊन त्यांची व्यावसायिक सामाजकार्य (एम.एस.डब्ल्यु.) ही पात्रता बदलून ती पदे अन्य शाखेच्या विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत.की ज्याचा ह्या पदाशी न्याय देण्याच्या दृष्टीकोनातुन (क्षेत्रकार्यासह) विशेष प्रशिक्षण पूर्ण न केल्याने,कोणत्याही प्रकारचा संबंध वैद्यकीय क्षेत्राशी येत नाही.
सध्या (कोव्हीड 19) या साथीच्या रोगाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे.त्यात महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी आरोग्य विभागाच्या समुपदेशक या पदासाठी जाहिरात काढण्यात येत आहेत.पण त्यामध्ये देखील समाजकार्य पदवीधारकांना
 या पदांपासुन डावलले जात असून त्याऐवजी बी.ए. / एम.ए.पदवीधर अशी पात्रता ग्राह्य धरण्यात येत आहे.शासनाच्या या निर्णयामुळे आम्हा समाजकार्य पदवीधारकांवर बरोजगारीची वेळ आली आहे.शासन असेच एम.एस.डब्ल्यु./ बि.एस.डब्ल्यु.पदवीधरांच्या जागा इतर पदवीधरांना देत गेले तर समाजकार्य -शिक्षणासारख्या प्रत्यक्ष फिल्ड वर उतरून शास्त्रशुद्ध पध्दतीने समाजातील समस्यांना सुखोल अभ्यास करून त्या सोडविण्यासाठी उपाययोजना व प्रत्यक्ष अंमलबजावणी राबविणारा अभ्यासक्रम बंद पडेल.यामुळे समाजाचे अतोनात नुकसान होईल.शिवाय समाजकार्य पदवीधारक बेरोजगार होतील किंबहुन झाले आहेत.
या निवेदनाव्दारे राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस परभणी जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप दत्तात्रय भोसले यांनी मा.राजेश टोपे आरोग्य मंत्री यांधा या विषयात जातीने लक्ष घालुन आमच्यावर होणारा अन्याय त्वरीत थांबवावा अशी नम्र विनंती शेवटी केलेली आहे.

परभणीत कोरोना लसीकरणाचा शुभारंभ डॉ. दुर्गादास पांडे ठरले पहिले लसधारक

परभणीत कोरोना लसीकरणाचा शुभारंभ
डॉ. दुर्गादास पांडे ठरले पहिले लसधारक
 



परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

मागील दीडवर्षापासून कोविड-19 मुळे जी सर्वस्तरावर अस्वस्थता होती त्या अस्वस्थेला आजच्या लसीकरण शुभारंभामुळे पूर्णविराम मिळाला आहे. ज्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या काळात कोविड-19 बाधितांवर उपचार केले त्या आपल्या सर्व आरोग्य सेवकांपासून या लसीकरण मोहिमेचा प्रारंभ होत आहे. आपल्या कोविड सेंटरमधील भूलतज्ज्ञ डॉ. दुर्गादास पांडे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी स्वत: ही लस सर्व प्रथम घेऊन परभणी जिल्हावासियांमध्ये नवा विश्वास निर्माण केल्याच्या भावना जिल्हाधिकारी दि. म. मुगळीकर यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचा शुभारंभ आज जिल्हा सामान्य रुग्णालयात झाला, यावेळी ते बोलत होते. खासदार श्रीमती फौजिया खान, खासदार संजय जाधव,  आमदार सुरेश वरपूडकर, जिल्हाधिकारी दी. म. मुगळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे व आरोग्य विभागाची टिम या ऐतिहासिक शुभारंभास उपस्थित होती.
 
जिल्ह्यातील सुमारे 10 हजार 800 सेवकांची, रक्षकांची नोंदणी या लसीकरणासाठी झाली असून जिल्ह्यात 4 ठिकाणी लसीकरण केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. आज प्रत्येक केंद्रावर 100 याप्रमाणे एकुण 400 लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी स्पष्ट केले.  
 
जिल्हा रुग्णालयातील अस्थिव्यंग विभागात कोरोना लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  नोंदणी कक्ष, निरीक्षण कक्ष व लसीकरण कक्ष अशा तीन  कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. सर्वप्रथम नोंदणी करून लसीकरण कक्षात प्रवेश दिला जाईल त्यानंतर लसीकरण केल्याच्यानंतर जवळपास 30 मिनिटे त्या उमेदवारास निरीक्षण कक्षात तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवले जाणार आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. प्रारंभी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरणाची सुरुवात करुन संवाद साधला. याबाबतचे थेट प्रक्षेपण संगणकीय पडद्यावर यावेळी सर्व मान्यवर व आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पाहिले.
 
या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, डॉ. डाके, डॉ. खंदारे, डॉ. धूतमल यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी- कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-*-*-*-*-

Friday, January 15, 2021

नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीराचा गरजुंनी लाभ घ्यावा - जन सेवा मित्र मंडळ सोनपेठ

नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीराचा गरजुंनी लाभ घ्यावा - जन सेवा मित्र मंडळ सोनपेठ 



सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ शहरात सदैव जनतेच्या सेवेत...जन सेवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,परभणी (संचलित) जन सेवा मित्र मंडळ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष साजेद कुरेशी यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया (ऑपरेशन) शिबीर,सोनपेठ व परिसरातील सर्व रूग्णांना कळविण्यात येते की,सोनपेठ शहरातील जन सेवा मित्र मंडळ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष साजेद भैय्या कुरेशी यांच्या वाढदिवसा निमित्त नेत्र तपासणी मोफत शिबीराचे आयोजन केले आहे, तरी सर्व गरजु रूग्णांनी या शिबीराचा अवश्य लाभ घ्यावा.दिनांक 19 जानेवारी 2021 वार मंगळवार वेळ सकाळी 10 ते 3 पर्यंत (टिप)
1.शिवारामध्ये मोतीबिंदु आढळलेल्या रूग्णांचे लायन्स नेत्र रूग्णालय उदगीर, जि.लातुर येथे मोफत शस्त्रक्रिया (ऑपरेशन) केले जाईल.2.शस्त्रक्रिया (ऑपरेशन) झालेल्या रूग्णांची राहण्याची, जेवण्याची, जाण्या-येण्याची व काळया चष्माची मोफत व्यवस्था करण्यात येईल,3. रूग्णांनी आधार कार्ड व नातेवाईकांचा मोबाईल नंबर सोबत अत्यंत आवश्यक आहे.आयोजन स्थळ जिल्हा परीषद केंद्रीय कन्या शाळा,सोनपेठ,संपर्क मो.9975003608 7020002886 9309105586.जन सेवा मित्र मंडळ पदाधीकारी कार्यकर्ते यांनी आवाहन केले आहे.

सोनपेठ पंचक्रोशितील बातम्या व जाहीरातीसाठि संपर्क संपादक किरण रमेश स्वामी मो.9823547752.

मुख्याध्यापकांच्या गैरवर्तणुकीबाबत शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार ; क्रीडा शिक्षक रामकीसन सुरवसे यांचे तिसऱ्या दिवशीही आमरण उपोषण सुरूच (उपोषणकर्त्यांची प्रकृती चिंताजनक; वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले दुर्लक्ष;मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सोडणार नाही-शिक्षक सुरवसे)

मुख्याध्यापकांच्या गैरवर्तणुकीबाबत शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार ; क्रीडा शिक्षक रामकीसन सुरवसे यांचे तिसऱ्या दिवशीही आमरण उपोषण सुरूच
(उपोषणकर्त्यांची प्रकृती चिंताजनक; वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले दुर्लक्ष;मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सोडणार नाही-शिक्षक सुरवसे)



परळी वैजनाथ / सोनपेठ  (दर्शन) :-

परळीतील श्री सरस्वती विद्यालयाचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक हे सतत आपल्याशी व कर्मचाऱ्यांशी उद्धट वागतात व नेहमी गैरवर्तन करतात अशी तक्रार बीडचे शिक्षण अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. शिक्षक रामकीसन सुरवसे यांनी ही तक्रार केली असून, याच्या प्रति पालकमंत्री, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व शिक्षण मंत्र्यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. सदरील तक्रारींची दाखल घेऊन कारवाई करावी या मागणीसाठी दि.13 जानेवारी पासून आमरण उपोषण सुरू केले असून आज तिसऱ्या दिवशीही हे उपोषण सुरू असून दरम्यान काल रात्री उपोषण करते सुरवसे यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तीन दिवसापासून सुरु असलेल्या उपोषणास अद्यापही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटही ही दिली नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी येथील श्री सरस्वती विद्यालयातील क्रीडा शिक्षक रामकिशन सुरवसे हे 13 जानेवारीपासून उपोषणास बसले असून काल मध्यरात्री त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते या उपोषणास अद्यापही शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
रामकीसन सुरवसे यांनी श्री सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर शंकरराव मिसाळ यांच्या विरोधात तक्रार केली आहे. यात म्हटले आहे की, सेवा जेष्ठता क्रम डावलून मुख्याध्यापक पद मिळवले आहे, शाळेच्या वेळेत शिक्षकांना खासगी कामे लावणे, वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणे, शासनमान्य राजा कर्मचाऱ्यांना नाकारणे, मयत सेवकांच्या निवृत्ती वेतनाचा अद्यापही लाभ मिळविणे, जाणीवपूर्वक सेवक व कर्मचाऱ्यांचा पगार संयुक्त खात्यात जमा ठेवणे, संस्थेचा वाद न्यायालयात असतांना संचालक मंडळाच्या नावाने कर्मचाऱ्यांना धमकवणे, शिक्षक व कर्मचाऱ्यांना पीएफ कर्ज नाकारणे, बँकेच्या कर्जासाठी कागदपत्रे न देणे, सेवानिवृत्त शिक्षकांस विलंब लावणे व आर्थिक नुकसान करणे, मार्जितले शिक्षक वगळता इतरांना मानसिक त्रास देणे यांसह अनेक तक्रारी सुरवसे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नसल्याचेही शिक्षक रामकिशन सुरवसे यांनी सांगितले.

Monday, January 11, 2021

माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना मराठा सेवा संघाचे अभिवादन 




सोनपेठ (दर्शन) :-
 
मराठा सेवा संघ सोनपेठ शाखेच्या वतीने दि 12 जानेवारी 2021 रोजी रयतेचं स्वराज्य स्थापन करणाऱ्या शूरवीर छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देऊन ज्ञान, चातुर्य, संघटन, चारित्र्य या गुणांचं बाळकडू ज्यांनी दिलं त्या राजमाता माँसाहेब जिजाऊ व तरुणांना स्फूर्ती देणारा ज्ञानाचा एक निरंतर झरा स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त परांडे काॅम्पलेक्स,विटा - पाथरी रोड सोनपेठ येथे विनम्र अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात माँसाहेब माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.त्यानंतर जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाचा समारोप झाला.यावेळी मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रा.राजकुमार धबडे सर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव कदम, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष मुरलीधर पायघन, मराठा सेवा संघाचे तालुका सचिव पंजाबराव सुरवसे, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष अमोल शिंदे, मराठा सेवा संघाचे प्रसिद्धी प्रमुख गजानन चिकणे, पदाधिकारी प्रताप शेळके सर यांच्यासह सर्व सहकारी उपस्थित होते.