अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ तसेच वीरशैव माहेश्वर संस्था व संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सन्मान सोहळा
मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत सोलापूर मतदार संघातून प्रचंड मताधिक्याने विजयी झालेले वीरशैव जंगम समाजातील आदरणीय धर्मगुरु श्री ष.ब्र. १०८ डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बुधवार दिनांक १२ जून २०१९ रोजी दादर (मुंबई) येथे अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या वतीने भव्य सन्मान सोहळा आयोजित केला होता.या सोहळ्याला सत्कारमूर्तींसह ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभले असे आपल्या सर्वांचे आदरणीय गुरुवर्य श्री ष. ब्र. १०८ डॉ. नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले वीरशैव धर्माचे नाव संपूर्ण देशभर पसरवणारे, शिवसेना नेते, संभाजी नगरचा ढाण्या वाघ, माजी खासदार श्री चंद्रकांत दादा खैरे साहेब या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले, तसेच ज्या संगीतमय शिव भजनामुळे या सोहळ्याला रंगत आली असे शिवपाठ मंडळ माणगाव यांनी सप्तसुरांची उधळण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले, वीरशैव लिंगायत समाजातील उच्च पदस्थ अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षाचे राजकीय नेते, वयोवृद्ध,आंतरराष्ट्रीय खेळाडू, विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेले गुणवंत, सूत्रसंचालक, महिला मंडळाचे नियोजन इत्यादी कार्यक्रमाचे केंद्रबिंदू ठरले. या सोहळ्यासाठी मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर, पुणे, सातारा,नाशिक,नांदेड,सोलापूर, अक्कलकोट, मराठवाडा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील विविध संस्था,संघटना,वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर,जंगम बांधव, माता,भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवलीत त्याबद्दल सर्वांचे शतशः आभार डाॅ.विजय जंगम (स्वामी) कार्याध्यक्ष- प्रवक्ता यांनी व्यक्त केले.
जय गुरुदेव
ReplyDeleteअखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ तर्फे 12/06/2019 रोजी
ReplyDeleteमुंबई दादर येथे नुतन खासदार म्हणुन निवडुन आलेले सोलापूर मतदार संघातुन आपले महास्वामीजी जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम झाला अतिशय खुपच छान झाला सगळ्यांच आयोजक समितिचे हार्दिक अभिनंदन