Wednesday, June 12, 2019

महेश नवमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन







गंगाखेड / सोनपेठ (दर्शन) :- गंगाखेड शहरात माहेश्वरी समाजाचा वंश उत्पत्ती दिवस महेश नवमी निमित्त विविध कार्यक्रमांचे  आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्वप्रथम राजेंद्र पेठ गल्ली पासून भगवती चौक, दिलकश चौक , भाजी मंडई ,डॉक्टर लाइन या शहराच्या मुख्य मार्गावरून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये समाजातील पुरुष, महिला, मुले सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. शोभायात्रेचा समारोप समृद्धी फंक्शन हॉल या ठिकाणी झाला. नंतरच्या मुख्य कार्यक्रमाचे अध्यक्ष माहेश्वरी सभा गंगाखेडचे अध्यक्ष गोपाळदास तापडिया तर प्रमुख उपस्थिती नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया, डॉ. शांतीलाल काबरा, रामलाल भुतडा, सत्यनारायण मानधना ,बालाप्रसाद बंग, मंजुषा दर्डा,  प्रेमलता नावंदर, आनंद सारडा यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व महेश पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सामूहिक महेश वंदनेचा कार्यक्रम  घेण्यात आला. यावेळी माहेश्वरी सभा गंगाखेड व  राजस्थानी सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वैवाहिक जीवनातील पन्नास वर्ष पूर्ण केलेल्या समाजातील दाम्पत्यांचा सत्कार सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. तसेच समाजातील दहावी ,बारावी व  इतर उच्चशिक्षित विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र ,सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माहेश्वरी सभेचे सचिव विजयकुमार बंग यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपामध्ये गोपाळदास तापडिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अभिलाषा मंत्री यांनी केले. तर आभार प्रदर्शन माहेश्वरी सभेचे सहसचिव नंदकुमार सोमानी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनीष तापडिया, गोपाल मंत्री ,गोविंद भंडारी,  कमल किशोर मणियार ,दगडू सोमानी,  आदींनी सहकार्य केले. स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

साप्ताहिक सोनपेठ दर्शन

बातमी व जाहिराती साठि

आपला हक्काचा मानुस

संपादक किरन रमेश स्वामी

संपर्क मो.9823547752.

1 comment:

  1. साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    बातमी व जाहिराती साठि
    आपला हक्काचा मानुस
    संपादक किरन रमेश स्वामी
    संपर्क मो.9823547752.

    ReplyDelete