जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांचे आवाहन
प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी
मोफत ऑनलाईन अर्ज करावेत
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2019 अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी बँकांमध्ये होणारी गर्दी टाळता यावी व अर्ज सुलभतेने भरता यावा म्हणून अर्ज व विमा हप्ता सामायिक सुविधा केंद्र (सीएससी) मार्फत मोफत ऑनलाईन पध्दतीने भरुन मिळणार असून शेतकऱ्यांनी बुधवार दि.24 जुलै 2019 पर्यंत अर्ज सादर करुन या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील भात, खरीप ज्वारी, बाजरी, मुग, उडिद, तूर, सोयाबीन, कापुस आणि सुर्यफुल या पिकाचा विमा शेतकऱ्यांना भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कॉमन सर्विस सेंटरला कुठलेही शुल्क देण्याची गरज नसून विमा हप्त्त्या व्यतिरिक्त शुल्क मागीतल्यास संबंधित सीएससी चालकांची तक्रार पोलिस स्टेशन, तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाचा नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्र.02452226400 या क्रमांकावर करावी. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पिक विमा योजनेत सहभागी होता यावे याकरीता अर्ज दाखल करण्याची सुविधा राष्ट्रीयकृत बँक, व्यापारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सामायिक सुविधा केंद्र येथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
पिकनिहाय हप्ता भात 870, ज्वारी 490, बाजरी 400, सोयाबीन 860, सुर्यफुल 462, मुग 380, उडिद 380, तुर 630, कापुस 2150 रुपये दर प्रति हेक्टरी याप्रमाणे आहेत. विमा भरण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज, आधारकार्ड, सातबारा उतारा, अधिसुचित पिकाची पेरणी केलेले स्वयंघोषणापत्र, बँक पासबुकची प्रत,भाडेपट्टा करार असलेल्या शेतकऱ्यांना करारनामा किंवा सहमती पत्र आदि कागदपत्रे आवश्यक आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,उपविभागीय कृषी अधिकारी, संबंधित तालुका कृषी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीयकृत बँकांशी संपर्क साधावा. असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.
आपले साप्ताहिक सोनपेठ दर्शन
संपादक किरन रमेश स्वामी
हक्काचा माणूस बातमी व जाहिराती साठि
संपर्क मो.9823547752
No comments:
Post a Comment