!! शाळा !!
शालेय साहित्य घ्यावे
आमच्याचं दुकानातून
खिसे रिकामे करून
टोकन मिळे शाळेतून
अरे नका जाऊ खचून
लुटणारं आहो खच्चून
ही तर सुरवात आहे
खूप पहायचे अजून
---------------------------------------------------
!! खपल्या !!
वर्ड कप पाहताना
दिसला बाबा माल्या
धवनपेक्षाही त्याच्या
बातम्या जास्तआल्या
रंगून जातोयं आम्ही
वर्ड कप कधी माल्या
दुष्काळाचे जखमेवर
बसू लागल्या खपल्या
--------------------------------------------------
!! साखर पोते !!
नातीला घेतो पाठीवर
राहतो फिरत घरभर
हवी कुणाला साखर
चला सांगा लवकर
सारे म्हणती हवी मला
हमी भाव साखरेला
साखर पोते खुश होते
आनंद अख्या घराला
- हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.
--------------------------------------------------
सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहिराती साठि
आपला हक्काचा माणूस संपादक किरन स्वामी
जगात जर्मनी भारतात परभणी 9823547752.
No comments:
Post a Comment