दुष्काळाने पिचलेल्या बळीराजाला पेरणीसाठी देवदुताची देणगी
बीज वाटप कार्यक्रम स्व. मुंडे साहेबांना समर्पित - ओमप्रकाश शेटे
संतोष स्वामी । दिंद्रुड / सोनपेठ (दर्शन):-
दुष्काळाच्या प्रचंड झळया सोसलेल्या बळीराजा ला माझगाव डाॅक शिप बिल्डर्स लि. व मुख्यमंत्री आरोग्य सहायता निधी कक्ष प्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्या विद्यमाने अजित सिड्स च्या दहा हजार बॅगचे वाटप करण्यात आले. आदर्श ग्राम समिती महाराष्ट्र चे कार्याध्यक्ष पोपटराव पवार,राहुल लोणीकर,माझगांव डाॅकचे अध्यक्ष संजय काजवे,संचालक विनोद मेहता यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
काल रविवारी माजलगाव विधानसभा मतदारसंघातील २३ चारा छावण्यांतील पाच हजार शेतकर्यांना दहा हजार अजित १९९ जातीच्या बॅग वाटपाचे आयोजन वडवणी च्या त्रिमूर्ती मंगल कार्यालयात करण्यात आले होते. शेतकर्यांचे मानबिंदू बळीराजाच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम राबलेल्या स्व गोपिनाथ मुंडे साहेबांची प्रेरणा डोळ्यासमोर ठेवत आपण शेतकर्यांना बीज वाटप करत असल्याचे यावेळी प्रस्ताविकात ओमप्रकाश शेटे यांनी सांगितले,मी कुठलेही राजकारण करत नसुन महाराष्ट्र भर मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्षाच्या माध्यमातून केलेल्या जनसेवेमुळे बळीराजासाठी काहितरी करावे या उद्देशाने हा बीज वाटपाचा उपक्रम केल्याचे त्यांनी सांगितले. बळीराजा टिकला तर देश टिकेल दुष्काळी परिस्थितीत खचलेल्या शेतकर्यांला छोटीशी मदत म्हणून हे कार्य हाती घेतल्याचे त्यांनी यावेळी नमुद केले. स्व.मुंडे साहेबांना बीज वाटपाचा कार्यक्रम समर्पित म्हणता क्षणी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला या कार्यक्रमात धारुर, वडवणी व माजलगाव तालुक्यातील दहा हजार शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
सुत्रसंचालन बंडु खांडेकर तर आभार पुसरा येथिल सरपंच हरि पवार यांनी मानले. आदर्श ग्राम समिती कार्याध्यक्ष पोपटराव पवार,मल्हार मार्तंड देवस्थान जेजुरी चे अध्यक्ष राजकुमार लोढा,जालना जि.प. सदस्य राहुल लोणीकर यांची समायोजित भाषणे यावेळी झाली.
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जलसंधारण महत्वाचे -पोपटराव पवार
याप्रसंगी पोपटराव पवार म्हणाले, शौचालय, व्यसनमुक्ती, जलसंधारण हि सदन गावाची त्रिसुत्र असुन जि गाव या सुत्रांना अमलात आणतील ते गाव सुजलाम सुफलाम व समृध्द शाली होतील.
ओम म्हणजे सृष्टीचा पालनहार या उक्तीला साजेशे काम ओमप्रकाश शेटे करत असुन आम्ही त्यांच्या या कार्यात सोबत आहोत, उपस्थितांना संबोधतांना येत्या कापसाच्या पहिल्या
पिकात शौचालय बांधण्याचे अवाहन त्यांनी केले.
No comments:
Post a Comment