गंगाखेड येथे 'डॉक्टर्स डे'निमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन
गंगाखेड / सोनपेठ (दर्शन) :-
'प्रेस असोसिएशन गंगाखेड' व 'डॉक्टर्स असोसिएशन गंगाखेड' यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. १ जुलै २०१९ रोजी 'डॉक्टर्स डे'निमित्ताने सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून याप्रसंगी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
गंगाखेड येथे प्रथमच अशा स्वरूपाचा 'डॉक्टर डे'निमित्ताने कार्यक्रम होत आहे. डॉक्टर्स, नागरिक, पत्रकार यांच्यात सुसंवाद निर्माण करण्यासोबत डॉक्टरांच्या एकूण कामगिरीला मनापासून प्रतिसाद देण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर्स असोसिएशन गंगाखेडचे अध्यक्ष डॉ. हेमंत मुंढे तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख, मुंबईचे श्री. ओमप्रकाशजी शेटे, विशेष उपस्थिती म्हणून चित्रपट-नाट्य अभिनेते श्री. चेतन दळवी तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉ. संजय कदम (आधार हॉस्पिटल नांदेड), डॉ. सूर्यकांत देशमुख (संचालक आय.सी.यू. परभणी),
डॉ. सौ. संतोष आर. तोतला (संचालक-तोतला हॉस्पिटल औरंगाबाद),
डॉ. सिद्धार्थ भालेराव (प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ), डॉ. राजगोपाल तोतला (अध्यक्ष- बालरोगतज्ञ असोसिएशन महाराष्ट्र प्रदेश), हे उपस्थित राहणार आहेत.
याच कार्यक्रमात जालना येथील सिगेदार एक्सिडेंट हॉस्पिटलचे डॉ. प्रकाश सिगेदार, गंगाखेड येथील अभिषेक हॉस्पिटलचे डॉ. के. पी. गारोळे, ग्रामीण रुग्णालय सोनपेठ येथील परिचारिका सौ. शालिनी डावकर, आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षक डॉ. कैलास देशमुख, परभणी येथील विनोद डावरे यांच्या सत्कार सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार, दि. १ जुलै २०१९ रोजी दुपारी ठीक १.०० वाजता, स्थळ: द्वारका फंक्शन हॉल, परभणी रोड कॉर्नर, भाग्यनगर, गंगाखेड येथे उपस्थित रहावे असे आवाहन 'डॉक्टर असोसिएशन गंगाखेड'चे अध्यक्ष डॉ. हेमंत मुंढे, शंकर इंगळे संस्थापक-अध्यक्ष प्रेस असोसिएशन गंगाखेड, उपाध्यक्ष- डॉ. दीनानाथ फुलवाडकर व सर्व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Wednesday, June 26, 2019
गंगाखेड येथे 'डॉक्टर्स डे'निमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment