1 )जोकर..
केळीच्यासाली वरून
पडलो एकदा चुकून
'ते' हसले पोट धरून
मी गेलो बरेचं शिकून
पडतो अधून मधून
मी मुद्दाम आपणहून
लोक हसतात पाहून
ऊरात येते भरून
रडवेले चेहरे सुध्दा
हसतात खळखळून
आनंद वेगळा कुठला
आहे जगात अजून
- हेमंत मुसरीफ पुणे .
९७३०३०६९९६.
2)आदर्श
उंच उंच चढावे पण
नका विसरू शिडीला
आठवण पायथ्याची
ठेवावी घडी घडीला
उबदार मिळे भाकरी
करा सलाम शेगडीला
बुडताना आली हाती
धन्यवाद त्या काडीला
पाय मातीचे असतांना
मान मिळतो पगडीला
पालवी नवीन फुटते
अभयदान पानझडीला
- हेमंत मुसरीफ, पुणे .
९७३०३०६९९६
साप्ताहिक सोनपेठ दर्शन
ReplyDeleteबातमी व जाहिराती साठि
आपला हक्काचा मानुस
संपादक किरन रमेश स्वामी
संपर्क मो.9823547752.