जागतिक योग दिनानिमित्त मोफत पाच दिवसीय योग शिबीराचे दि.21 ते दि.25 आयोजन
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील हनुमाण शिक्षन प्रसारक मंडळ, रोटरी क्लब, पतंजली योग समिती व स्वाभिमान न्यास आणि न.प.सोनपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवशीय मोफत भव्य योग प्राणायाम शिबीराचे दि. 21 जुन शुक्रवार ते दि. 25 जुन मंगळवार दरम्यान आयोजन करण्यात आले आहे, तरी या शिबीरासाठी उद्घाटन व प्रमुख उपस्थितीत ष. ब्र. गुरूवर्य 108 श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज, सौ. जिजाबाई राठोड, मा. आ. व्यंकटराव कदम, राजेशदादा विटेकर, सौ. सारिका विटेकर, परमेश्वर कदम, सपोनि. शिवदास लहाने, रो.प्रदीप गायकवाड, रो. चंद्रकांत लोमटे, प्राचार्य डॉ. वसंत सातपुते व पी. एल. जोशी हे रहाणार आहेत.शहरातील हनुमाण शिक्षन प्रसारक मंडळ, रोटरी क्लब, पतंजली योग समिती व स्वाभिमान न्यास आणि न.प. सोनपेठ सतत सामाजिक उपक्रम राबवत असतात, अशातच या सर्व संस्थानी एकत्रीत येऊन जागतिक योग दिनानिमित्त मोफत योग शिबीराचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह सोनपेठ येथे दि. 21 जुन ते 25 जुन दरम्यान सकाळी 5 ते 7 यावेळेत केले आहे. या शिबीराचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.या शिबीरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डी. एम. शेप, सौ पुनमताई खत्री तर योग प्रशिक्षक प्रा. डॉ. विठ्ठल जायभाये, मोहन चौलवार आहेत. नागनाथ सातभाई, उमेशअप्पा नित्रुडकर, संध्याताई कदम, वंदना लोहगावकर, राधाकिसन हिक्के, बळीराम काटे, आशोक मस्के, भक्तराज गांगर्डे, किरण स्वामी, गजानन चिकणे, मयूरी देशमुख, अँड. माधव चिमणगुंडे, आशोक कुंभार, सुरेश पाथरकर, बाबा कदम, ज्ञानेश्वर डमढेरे, नागनाथ कोटुळे, भगवान किरवले, लक्ष्मण साबणे व सर्व पत्रकार बांधव हे आयोजनात रहाणार आहेत.
No comments:
Post a Comment