Wednesday, June 12, 2019

सोनपेठ येथे महेश नवमी उत्साहात साजरी







सोनपेठ (दर्शन):-

सोनपेठ शहरात मारवाडी समाजाच्या वतीने  महेश नवमी निमीत्त शोभा यात्रा काढण्यात आली.

      शहरातील मारवाडी समाजाच्या वतीने दि.११ जून रोजी सकाळी ९ वा.महेश नवमी मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. प्रथम शंकराच्या प्रतिमेचे पूजन करून बालाजी मंदिर येथून शहरातील मुख्य रस्त्याने जय महेश च्या गजरात शोभा यात्रेस प्रारंभ झालं. त्यानंतर बालाजी मंदिर येथे महेश वंदना, सामुहिक महाआरती व प्रसाद वाटून या शोभा यात्रेचा समारोप करण्यात आला. या शोभा यात्रा प्रसंगी बालमुकूंद सारडा, घनश्यामदास झंवर, डॉ.मुलचंद काबरा, मुरलीभाऊ भुतडा, रामप्रसाद सारडा, राजाभाऊ चांडक, रामनिवास सारडा, सत्यनारायण शर्मा, रमेश झंवर, रमेश सारडा, शिवप्रसाद तापडीया, कन्हैयालाल वर्मा, राधेशाम सारडा, पवण सारडा, संजय काबरा, महेश शर्मा, विजय मरल्लेचा, गोविंद भुतडा, घनश्याम सारडा, विजय शर्मा यासह समाजातील महिला, प्रौढ, वृद्ध,तरुण व बालगोपाल सहभागी झाले होते.

साप्ताहिक सोनपेठ दर्शन 
बातमी व जाहिराती साठि
आपला हक्काचा मानुस
संपादक किरन रमेश स्वामी
संपर्क मो.9823547752.

1 comment:

  1. साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    बातमी व जाहिराती साठि
    आपला हक्काचा मानुस
    संपादक किरन रमेश स्वामी
    संपर्क मो.9823547752.

    ReplyDelete