मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन):-
मुंबई येथिल अक्षिकर सभागृह, पश्चिम दादर, मुंबई येथे दि. 12 जुन रोजी अखिल भारतीय विरशैव लिंगायत महासंघाने आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यामध्ये संभाजीनगरचे (औरंगाबादचे) माजी खासदार तथा शिवसेना नेते मा.श्री. चंद्रकांत खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व श्री.ष.ब्र. 108 डॉ. निळकंठ शिवाचार्य महाराज धारेश्वर यांच्या दिव्य सानिध्यात सोलापूर जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार मा. श्री.जयसिध्देश्वर स्वामीजींचा विषेश सन्माण करण्यात आला तर सर्व मान्यवंरांच्या शुभहस्ते क्रिडा क्षेत्रात विशेष कामगिरी केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय धावपट्टू ओमकार विवेकानंद स्वामी (लातूर) यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यावेळी उपस्थित IAS सालिमठ सर, मुंबईचे DCP संदिप भाजीभाकरे सर, नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी IAS दिलीप स्वामी सर, निवृत्त सहा.पोलीस आयुक्त ACP सुरेश स्वामी सर, विरमाहेश्वर जंगम संस्था पुणे अध्यक्ष महेश कुगांवकर सर इ. मान्यवंरांची विषेश उपस्थिती होती.
ओमकार स्वामी यांनी बोलताना या पुरस्काराच्या योग्य समजुन समाजभुषण पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल अखिल भारतीय विरशैव लिंगायत महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय जंगम व महासंघाचे सचिव वैजनाथ स्वामी तसेच महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा मनापासून आभार व्यक्त केले.
ओमकार अभिनंदन साप्ताहिक सोनपेठ दर्शन संपादक व परीवार यांच्या वतिने शुभकामना
ReplyDelete