Thursday, June 27, 2019

हिंदू मुस्लिम एकता समितीचा सोनपेठ बंद सोनपेठ बंद सोनपेठ बंद


सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ शहरातील हिंन्दु मुस्लिम एकता समिती यांच्या वतीने माँबलिचींग व तबरेज अन्सारी (झारखंड राज्य) हत्या विरोधात दिनांक 28 जुन 2019 शुक्रवार रोजी सकाळ पासून दुपारी 4 पर्यंत सोनपेठ शहर बंद राहील तसेच दुपारी 2:30 वाजता हिंदू मुस्लिम एकता समिती तर्फे बालेपीर मस्जित ते तहसील कार्यालय मूक मोर्चा निघणार असून तमाम हिंदू व मुस्लिम बांधवांनी वरील प्रश्नावर देशात चाललेल्या संशयावरुन मुस्लिम समाजावर तसेच तबरेज अन्सारी यांच्या हत्ते विरोधात विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात येणार आहे.हे निवेदन पोलीस स्टेशन सोनपेठ येथे पी.एस.आय.संतोष मुपडे यांना देण्यात आले आहे तरी सर्व लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनी दि.28 जुन 2019 सकाळ पासुन दुपारी 4 वाजेपर्यंत आपली दुकान बंद ठेऊन सहकार्य करावे असे अवाहन हिंदू मुस्लिम एकता समितीच्या पदाधिकारी यांनी केली आहे.

आपले साप्ताहिक सोनपेठ दर्शन
संपादक किरन रमेश स्वामी
हक्काचा माणूस बातमी व जाहिराती साठि
संपर्क मो.9823547752 .

Wednesday, June 26, 2019

गंगाखेड येथे 'डॉक्टर्स डे'निमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन

गंगाखेड येथे 'डॉक्टर्स डे'निमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन
गंगाखेड / सोनपेठ (दर्शन) :-
'प्रेस असोसिएशन गंगाखेड' व 'डॉक्टर्स असोसिएशन गंगाखेड' यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. १ जुलै २०१९ रोजी 'डॉक्टर्स डे'निमित्ताने सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून याप्रसंगी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
गंगाखेड येथे प्रथमच अशा स्वरूपाचा 'डॉक्टर डे'निमित्ताने कार्यक्रम होत आहे. डॉक्टर्स, नागरिक, पत्रकार यांच्यात सुसंवाद निर्माण करण्यासोबत डॉक्टरांच्या एकूण कामगिरीला मनापासून प्रतिसाद देण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर्स असोसिएशन गंगाखेडचे अध्यक्ष डॉ. हेमंत मुंढे तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख, मुंबईचे श्री. ओमप्रकाशजी शेटे, विशेष उपस्थिती म्हणून चित्रपट-नाट्य अभिनेते श्री. चेतन दळवी तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉ. संजय कदम (आधार हॉस्पिटल नांदेड), डॉ. सूर्यकांत देशमुख (संचालक आय.सी.यू. परभणी),
डॉ. सौ. संतोष आर. तोतला (संचालक-तोतला हॉस्पिटल औरंगाबाद),
डॉ. सिद्धार्थ भालेराव (प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ), डॉ. राजगोपाल तोतला (अध्यक्ष- बालरोगतज्ञ असोसिएशन महाराष्ट्र प्रदेश), हे उपस्थित राहणार आहेत.
याच कार्यक्रमात जालना येथील  सिगेदार एक्सिडेंट हॉस्पिटलचे डॉ. प्रकाश सिगेदार, गंगाखेड येथील अभिषेक हॉस्पिटलचे डॉ. के. पी. गारोळे, ग्रामीण रुग्णालय सोनपेठ येथील परिचारिका सौ. शालिनी डावकर, आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षक डॉ. कैलास देशमुख, परभणी येथील  विनोद डावरे यांच्या सत्कार सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार, दि. १ जुलै २०१९ रोजी दुपारी ठीक १.०० वाजता, स्थळ: द्वारका फंक्शन हॉल, परभणी रोड कॉर्नर, भाग्यनगर, गंगाखेड येथे उपस्थित रहावे असे आवाहन 'डॉक्टर असोसिएशन गंगाखेड'चे अध्यक्ष डॉ. हेमंत मुंढे, शंकर इंगळे संस्थापक-अध्यक्ष प्रेस असोसिएशन गंगाखेड, उपाध्यक्ष- डॉ. दीनानाथ फुलवाडकर व सर्व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांचे आवाहन प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी मोफत ऑनलाईन अर्ज करावेत परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांचे आवाहन
प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी
मोफत ऑनलाईन अर्ज करावेत

परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2019 अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी बँकांमध्ये होणारी गर्दी टाळता यावी व अर्ज सुलभतेने भरता यावा म्हणून अर्ज व विमा हप्ता सामायिक सुविधा केंद्र (सीएससी) मार्फत मोफत  ऑनलाईन पध्दतीने भरुन मिळणार असून शेतकऱ्यांनी बुधवार दि.24 जुलै 2019 पर्यंत अर्ज सादर करुन या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी केले आहे.
          प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील भात, खरीप ज्वारी, बाजरी, मुग, उडिद, तूर, सोयाबीन, कापुस आणि सुर्यफुल या पिकाचा विमा शेतकऱ्यांना भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कॉमन सर्विस सेंटरला कुठलेही शुल्क देण्याची गरज नसून विमा हप्त्त्या व्यतिरिक्त शुल्क मागीतल्यास संबंधित सीएससी चालकांची तक्रार पोलिस स्टेशन, तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाचा नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्र.02452226400 या क्रमांकावर करावी. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पिक विमा योजनेत सहभागी होता यावे याकरीता अर्ज दाखल करण्याची सुविधा राष्ट्रीयकृत बँक, व्यापारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सामायिक सुविधा केंद्र येथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
          पिकनिहाय हप्ता भात 870, ज्वारी 490, बाजरी 400, सोयाबीन 860, सुर्यफुल 462, मुग 380, उडिद 380, तुर 630, कापुस 2150 रुपये दर प्रति हेक्टरी याप्रमाणे आहेत. विमा भरण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज, आधारकार्ड, सातबारा उतारा, अधिसुचित पिकाची पेरणी केलेले स्वयंघोषणापत्र, बँक पासबुकची प्रत,भाडेपट्टा करार असलेल्या शेतकऱ्यांना करारनामा किंवा सहमती पत्र आदि कागदपत्रे आवश्यक आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,उपविभागीय कृषी अधिकारी, संबंधित तालुका कृषी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीयकृत बँकांशी संपर्क साधावा. असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.

आपले साप्ताहिक सोनपेठ दर्शन
संपादक किरन रमेश स्वामी
हक्काचा माणूस बातमी व जाहिराती साठि
संपर्क मो.9823547752

Tuesday, June 25, 2019

कविता

                             !!  शाळा !!

                         शालेय साहित्य  घ्यावे
                 आमच्याचं दुकानातून
                        खिसे  रिकामे  करून
                 टोकन मिळे शाळेतून

                       अरे नका जाऊ खचून
                लुटणारं आहो खच्चून
                      ही तर सुरवात आहे
                खूप पहायचे अजून

---------------------------------------------------
                       !!  खपल्या  !!

                 वर्ड कप पाहताना
                            दिसला बाबा माल्या
                 धवनपेक्षाही त्याच्या
                           बातम्या जास्तआल्या

                रंगून  जातोयं आम्ही 
                           वर्ड कप कधी माल्या
                दुष्काळाचे  जखमेवर
                           बसू लागल्या खपल्या
--------------------------------------------------

                           !!  साखर पोते  !!

              नातीला घेतो पाठीवर    
                         राहतो  फिरत  घरभर
             हवी कुणाला साखर
                         चला सांगा लवकर

             सारे म्हणती हवी मला
                        हमी भाव साखरेला
            साखर पोते खुश  होते
                       आनंद अख्या घराला

                      - हेमंत मुसरीफ पुणे.
                        9730306996.
--------------------------------------------------
       सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहिराती साठि

    आपला हक्काचा माणूस संपादक किरन स्वामी

   जगात जर्मनी भारतात परभणी 9823547752.

Sunday, June 23, 2019

दुष्काळाने पिचलेल्या बळीराजाला पेरणीसाठी  देवदुताची देणगी बीज वाटप कार्यक्रम स्व. मुंडे साहेबांना समर्पित - ओमप्रकाश शेटे

दुष्काळाने पिचलेल्या बळीराजाला पेरणीसाठी  देवदुताची देणगी

बीज वाटप कार्यक्रम स्व. मुंडे साहेबांना समर्पित - ओमप्रकाश शेटे

संतोष स्वामी । दिंद्रुड / सोनपेठ (दर्शन):-

दुष्काळाच्या प्रचंड झळया सोसलेल्या बळीराजा ला  माझगाव डाॅक  शिप बिल्डर्स लि. व मुख्यमंत्री आरोग्य सहायता निधी कक्ष प्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्या विद्यमाने अजित सिड्स च्या दहा हजार बॅगचे वाटप करण्यात आले. आदर्श ग्राम समिती महाराष्ट्र चे कार्याध्यक्ष पोपटराव पवार,राहुल लोणीकर,माझगांव डाॅकचे अध्यक्ष संजय काजवे,संचालक विनोद मेहता यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.

काल रविवारी माजलगाव विधानसभा मतदारसंघातील २३ चारा छावण्यांतील पाच हजार शेतकर्यांना दहा हजार अजित १९९ जातीच्या बॅग वाटपाचे आयोजन वडवणी च्या त्रिमूर्ती मंगल कार्यालयात करण्यात आले होते. शेतकर्यांचे मानबिंदू बळीराजाच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम राबलेल्या स्व गोपिनाथ मुंडे साहेबांची प्रेरणा डोळ्यासमोर ठेवत आपण शेतकर्यांना बीज वाटप करत असल्याचे यावेळी प्रस्ताविकात ओमप्रकाश शेटे यांनी सांगितले,मी कुठलेही राजकारण करत नसुन महाराष्ट्र भर मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्षाच्या माध्यमातून केलेल्या जनसेवेमुळे बळीराजासाठी काहितरी करावे या उद्देशाने हा बीज वाटपाचा उपक्रम केल्याचे त्यांनी सांगितले. बळीराजा टिकला तर देश टिकेल दुष्काळी परिस्थितीत खचलेल्या शेतकर्यांला छोटीशी मदत म्हणून हे कार्य हाती घेतल्याचे त्यांनी यावेळी नमुद केले. स्व.मुंडे साहेबांना बीज वाटपाचा कार्यक्रम समर्पित म्हणता क्षणी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला या कार्यक्रमात धारुर, वडवणी व माजलगाव तालुक्यातील दहा हजार शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
सुत्रसंचालन बंडु खांडेकर तर आभार पुसरा येथिल सरपंच हरि पवार यांनी मानले. आदर्श ग्राम समिती कार्याध्यक्ष पोपटराव पवार,मल्हार मार्तंड देवस्थान जेजुरी चे अध्यक्ष राजकुमार लोढा,जालना जि.प. सदस्य राहुल लोणीकर यांची समायोजित भाषणे यावेळी झाली.

दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जलसंधारण महत्वाचे -पोपटराव पवार

याप्रसंगी पोपटराव पवार म्हणाले, शौचालय, व्यसनमुक्ती, जलसंधारण हि सदन गावाची त्रिसुत्र असुन जि गाव या सुत्रांना अमलात आणतील ते गाव सुजलाम सुफलाम व समृध्द शाली होतील.
ओम म्हणजे सृष्टीचा पालनहार या उक्तीला साजेशे काम ओमप्रकाश शेटे करत असुन आम्ही त्यांच्या या कार्यात सोबत आहोत, उपस्थितांना संबोधतांना येत्या कापसाच्या पहिल्या
पिकात शौचालय बांधण्याचे अवाहन त्यांनी केले.

Friday, June 21, 2019

अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी वैजनाथ स्वामी यांची नियुक्ती

अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी वैजनाथ स्वामी यांची नियुक्ती

नांदेड / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

आखिल भारतीय ओबीसी महासंघ दि २०/०६/२०१९ रोजी सांगली येथे  झालेल्या महत्वपुर्ण राष्ट्रिय बैठकीत  मा.रवीकुमार स्वामी यांचे आदेशानुसार मा,वैजनाथ स्वामी,नांदेड यांचे संघटन कौशल्य व सामाजीक,राष्ट्रीय कार्य  विविध माध्यमातुन देशपातळीवर विविध उपक्रमाचे आयोजन अंदोलन,उपोषन करून न्याय हक्कासाठी नेहमी सक्रीय असनारे वैजनाथ स्वामी यांच्या कार्याची  दखल घेत  मराठवाडा विभागीय अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.या बैठकीस उपस्थित

  मा रविकुमार स्वामी
     राष्ट्रीय अध्यक्ष

मा नविनभाई राठोड
     राष्ट्रीय उपाध्यक्ष
             
मा,वैषाली सोलंकी राष्ट्रिय
महिला आघाडी अध्यक्ष

मा लिंबानी परांजपे 

राष्ट्रिय युवती अध्यक्ष

मा ,कुमार कुंभार
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

मा,सुजाता सुतार
महिला आघाडि प्रदेश अध्यक्ष

मा, गौरी खाडेकर
प्रदेश उपाध्यक्ष

   डॉ  संजय कुंभार
वैद्यकीय प्रदेश अध्यक्ष

मा, प्रशांत बोरकर
प्रदेश उपाध्यक्ष

मा, प्रज्ञा कांबळे
महिला प्रवर्ग प्रदेशअध्यक्ष

मा,दशरथ माशाळकर
मागास प्रवर्ग प्रदेश उपाध्यक्ष

मा,वैष्णवी गुरव
प्रदेश कार्याध्यक्ष

प्रकाश हिरवकर
प्रदेश कार्याध्यक्ष

मा.अमित हिरेमठ
प्रदेश युवक अध्यक्ष

मा, मंजुषा गोटफोडे
प्रदेश युवती अध्यक्ष

यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड करण्यात आली  संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांचेकडून वैजनाथ स्वामी यांचे हार्दिक अभिनंदन  केले. या निवडीमुळे राज्यभरातुन वैजनाथ स्वामी यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Thursday, June 20, 2019

हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल सहज सापडणार, केवळ 14422 'हा' नंबर डायल करा!


नवी दिल्ली / मुंबई / परभणी /सोनपेठ (दर्शन) :-

हरवलेला किंवा चोरीला गेलेल्या मोबाईल शोध घेणं आता सोपं होणार आहे. मोदी सरकारने हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाईलच्या वाढत्या तक्रारींवर रामबाण उपाय शोधला आहे. सरकारने देशभरात 14422 हा हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तर तक्रारीसाठी पोलीस स्टेशनच्या चकरा मारण्याची गरज नाही. केवळ हेल्पलाईन नंबर डायल केल्यास तुमच्या तक्रारीची नोंद होईल आणि संबंधित यंत्रणा कामाला लागतील. त्यामुळे चोरी किंवा हरवलेला मोबाईल परत मिळवणं सोपं होईल.सर्व मोबाईलचा डेटाबेस सांभाळणाऱ्या Central Idenity Register तयार करण्यात आलं आहे. दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद येत्या 1-2 आठवड्यात ही सेवा सुरु करु शकतात.सेंट्रल आयडेंटीटी रजिस्टरमध्ये (CEIR) सर्व मोबाईलचा डेटाबेस असेल. महाराष्ट्र सर्कलमध्ये याची यशस्वी चाचणी झाली. त्यानंतर आता देशभर ही लागू करण्यात येणार आहे.मोबाईल फोन कसा परत मिळू शकेल ? तुमचा मोबाईल हरवला किंवा चोरीला गेल्यास 14422 हा हेल्पलाईन नंबर डाईल करा. नंबर डाईल केल्यानंतर पोलिसात तुमची तक्रार नोंद होईल आणि तुमच्या फोनचं नेटवर्क बंद होईल.IMEI नंबर वरुन ऑपरेटर्स मोबाईलचं नेटवर्क ब्लॉक करु शकतील.IMEI नंबर जर बदलला तरीही दुसऱ्या IMEI नंबरवरुनही मोबाईल ब्लॉक करता येईल.IMEI नंबर बदलल्यास 3 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते.दूरसंचार तंत्रज्ञान केंद्राने (सी-डॉट) चोरी किंवा हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी सेंट्रल इक्यूपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (सीईआयआर) तयार करण्यात आला आहे. सीईआयआरमध्ये देशातील प्रत्येक नागरिकाच्या मोबाईल मॉडेल, सिम नंबर आणि IMEI नंबरची नोंद आहे. IMEI नंबर मॅच करण्यासाठी सी डॉटने नवी प्रणाली मोबाई कंपन्यांच्या मदतीने बनवली आहे.ही प्रणाली विविध राज्यांच्या पोलिसांकडे सोपवण्यात येईल. याशिवाय दूरसंचार कंपन्याही यामध्ये महत्त्वाच्या भूमिका निभावतील.जर मोबाईलमधील IMEI नंबर बदलला असेल, तर मोबाईल कंपनी त्या सिमची सेवा बंद करेल. त्यानंतरही पोलिस तो मोबाईल ट्रॅक करु शकतील.सी डॉटनुसार CEIR तंत्रामुळे तक्रार आल्यानंतर मोबाईलमध्ये कोणतंही सिमकार्ड घातलं तरी नेटवर्क येऊ शकणार नाही.मात्र या तंत्रामुळे चोरलेल्या किंवा हरवलेल्या मोबाईलमध्ये कोणी सिमकार्ड घातलं, किंवा IMEI नंबर बदलला तर त्याची माहिती तातडीने मिळेल आणि तो मोबाईल ट्रॅकही केला जाऊ शकेल.
मोबाईलमधील नेटवर्क हे संबंधित सिमकार्ड कंपनीद्वारे ब्लॉक केलं जाईल.जर कोणी दुसऱ्या मोबाईलचा IMEI चोरी किंवा हरवलेल्या मोबाईलमध्ये वापरला तर त्याचीही माहिती मिळेल.IMEI नंबर बदलणे हा गुन्हा असून त्यासाठी तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. मोबाईल चोरी, हरवणे या घटना वाढल्याने दूरसंचार मंत्रालयाने याबाबत पावलं उचलली आहेत.

Wednesday, June 19, 2019

जागतिक योग दिनानिमित्त मोफत पाच दिवसीय योग शिबीराचे दि.21 ते दि.25 आयोजन

जागतिक योग दिनानिमित्त मोफत पाच दिवसीय योग शिबीराचे दि.21 ते दि.25 आयोजन

सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ येथील हनुमाण शिक्षन प्रसारक मंडळ, रोटरी क्लब, पतंजली योग समिती व स्वाभिमान न्यास आणि न.प.सोनपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवशीय मोफत भव्य योग प्राणायाम शिबीराचे दि. 21 जुन शुक्रवार ते दि. 25 जुन मंगळवार दरम्यान आयोजन करण्यात आले आहे, तरी या शिबीरासाठी उद्घाटन व प्रमुख उपस्थितीत ष. ब्र. गुरूवर्य 108 श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज, सौ. जिजाबाई राठोड, मा. आ. व्यंकटराव कदम, राजेशदादा विटेकर, सौ. सारिका विटेकर, परमेश्वर कदम, सपोनि. शिवदास लहाने, रो.प्रदीप गायकवाड, रो. चंद्रकांत लोमटे, प्राचार्य डॉ. वसंत सातपुते व पी. एल. जोशी हे रहाणार आहेत.शहरातील हनुमाण शिक्षन प्रसारक मंडळ, रोटरी क्लब,  पतंजली योग समिती व स्वाभिमान न्यास आणि न.प. सोनपेठ सतत सामाजिक उपक्रम राबवत असतात, अशातच या सर्व संस्थानी एकत्रीत येऊन जागतिक योग दिनानिमित्त मोफत योग शिबीराचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह सोनपेठ येथे दि. 21 जुन ते 25 जुन दरम्यान सकाळी 5 ते 7 यावेळेत केले आहे. या शिबीराचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.या शिबीरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डी. एम. शेप, सौ पुनमताई खत्री तर योग प्रशिक्षक प्रा. डॉ. विठ्ठल जायभाये, मोहन चौलवार आहेत. नागनाथ सातभाई, उमेशअप्पा नित्रुडकर, संध्याताई कदम, वंदना लोहगावकर, राधाकिसन हिक्के, बळीराम काटे, आशोक मस्के, भक्तराज गांगर्डे, किरण स्वामी, गजानन चिकणे, मयूरी देशमुख, अँड. माधव चिमणगुंडे, आशोक कुंभार, सुरेश पाथरकर, बाबा कदम, ज्ञानेश्वर डमढेरे, नागनाथ कोटुळे, भगवान किरवले, लक्ष्मण साबणे व सर्व पत्रकार बांधव हे आयोजनात रहाणार आहेत.

गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व पालकांसाठी मार्गदर्शन शिबिर

सोनपेठ (दर्शन):-

सोनपेठ तालूक्यातील 10 वी 12 वी, NEET/CET व इतर परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सभारंभ व तालुक्यातील पालक व विद्यार्थांना मार्गदर्शन शिबिर जिजाऊ बिग्रेड ता.सोनपेठ व जिजामाता पब्लिक स्कूल ज्यू काँलेज व   विद्यालय, सोनपेठ संयुक्त विद्यमाने  दि 23 जुन 2019 रविवार सकाळी 11 वा आयोजित केले आहे.
       करिअर मार्गदर्शनासाठी पुणे येथिल सोहम लाईफ कन्संलटंशी चे मा राजेश्वर चांदने व टीम यांची महत्वपुर्ण व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.. तरी सर्व पालक आणि विदयार्थ्यांनी व तसेच  प्राध्यापक ,शिक्षक यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे..तसेच आपल्या शाळ्तील, गावातील गुणवंत विदयार्थ्यांची नावे  फोन नं सहीत खालील फोन नंबरवर कळवावेत...
संयोजक
सौ.विद्या मुजांभाऊ धोडंगे
मुख्याध्यापक,जिजामाता विदयालय व तालुका मार्गदर्शक जिजाऊ बिग्रेड सोनपेठ
9545554488
सौ.अर्चना लहुकूमार वाकणकर
तालुकाध्यक्ष जिजाऊ बिग्रेड सोनपेठ.
सौ रेखा संतोष परांडे
कोषाध्यक्ष जिजाऊ बिग्रेड
नोंदणी अंतिम तारीख 20जुन
कार्यक्रमाचे ठिकाण
छत्रपती शिवाजी महाराज सभाग्रह  न प सोनपेठ

साप्ताहिक सोनपेठ दर्शन

बातमी व जाहिराती साठि

आपला हक्काचा मानुस

संपादक किरन रमेश स्वामी

संपर्क मो.9823547752.






Monday, June 17, 2019

लाच घेताना पोलिस निरीक्षक दिलीप तिडकेसह दोन कर्मचारी गळाला

लाच घेताना पोलिस निरीक्षक दिलीप तिडकेसह दोन कर्मचारी गळाला

नांदेड / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

किनवट ठाण्यात दाखल तक्रार प्रकरणात कारवाई न करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागणारा पोलिस निरीक्षक दिलीप विश्वनाथ तिडके व दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. शुक्रवारी रात्री ही कारवाई केली. या प्रकरणातील पोलिस निरीक्षक फरार झाला आहे.
किनवट शहरातील राजेंद्रनगर परिसरात राहणाऱ्या नचिकेत नेमानीवार व त्याच्या नातेवाईकांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद आहे. नचिकेत याच्या विरोधातील नातेवाईकांनी बोगस कागदपत्रे तयार करून घर हडपल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. पोलिसांनी या प्रकरणात नेमानीवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्याची धमकी दिली होती. ही कारवाई टाळायची असेल तर तीन लाख रुपये लाच द्यावी लागेल अशी धमकी दिल्यानंतर ५० हजारांवर तडजोड केली. किनवट पोलिसांच्या या प्रतापाची तक्रार नेमानीवार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदविल्यानंतर या पथकाने सापळा रचला. शुक्रवारी सायंकाळी नेमानीवार यांच्या निवासस्थानी पोलिस कर्मचारी मधूकर व्यंकटराव पांचाळ याने ५० हजाराची बॅग सोबतचा पोलिस कर्मचारी पांडूरंग बाबूराव बोईनवाड याच्याकडे देताच पथकाने या दोघांनाही ताब्यात घेतले. या प्रकरणात पोलिस निरीक्षक दिलीप तिडके यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एसीबीने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, झाडाझडतीत लाचखोर पोलिस निरीक्षक दिलीप तिडके याच्या शासकीय निवासस्थानात चार लाख ७५ हजार रुपयांची रोकड हाती लागली आहे. सापळ्याची कुणकुण लागताच तिडके तेलंगणा राज्याच्या दिशेने फरार झाला आहे.
एसीबीची धाड पडल्यावर अनेकांनी किनवट पोलिस ठाणे गाठून लाचखोर दिलीप तिडके याच्या भ्रष्टाचारी कृत्याचा पाढा वाचला. दरम्यान, घटनेनंतर अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार यांनी शनिवारी सकाळी किनवटला भेट दिली. आदिवासी बहुल भागातील नागरिकांना विविध प्रकरणात गोवण्याची धमकी दाखवत पोलिस निरीक्षक तिडके यांनी मोठी माया जमविली होती. तिडके यांनी शासकीय निवासस्थानातून दोन बॅगा घेऊन पळ काढला. त्यामध्येही मोठी रक्कम असल्याची माहिती आहे. शिवाय त्यांच्याच सांगण्यावरुन गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्याने तिडके यांच्या घरातून एक बॅग घेऊन जात असताना नागरिकांनी पाठलाग करून त्यास पकडले. या बॅगमध्येही रोकड असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
कंधारमधील पोलिस कर्मचारी जाळ्यात
शनिवारी सायंकाळी कंधार पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याला दोन हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्याने रंगेहाथ पकडले.