सोनपेठ (दर्शन) : - सोनपेठ येथील हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे कै.र.व.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनपेठ येथील राष्ट्रीय सेवा योजना , राज्यशास्त्र विभाग, लोकप्रशासन विभाग व सोनपेठ तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 'राष्ट्रीय मतदार दिना'निमित्त आयोजित रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा यांचे प्रमाणपत्र वाटप करून मतदान करण्याची सामुहिक शपथ आज दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी घेण्यात आली.
याप्रसंगी हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक रामेश्वर कदम , तहसीलदार सुनील कावरखे ,महसूल सहाय्यक, निवडणूक तांत्रिक सहाय्यक ज्ञानेश्वर तुळशीराम घाडगे, प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ कल्याण गोलेकर, लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉ मुक्ता सोमवंशी आदी उपस्थित होते.
१५ व्या राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून सोनपेठ तहसील कार्यालय आणि महाविद्यालयातील विविध विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचे प्रमाणपत्र मा.तहसिलदार सुनील कावरखे साहेब यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. तसेच सर्व कर्मचारी व विद्यार्थी यांना राष्ट्रीय मतदार शपथ देण्यात आली. विद्यार्थी करण उबाळे याने काढलेल्या चित्राचे अनावरण करण्यात आले. रांगोळीत प्रथम क्रमांक शुभांगी हेंगडे, द्वितीय सागर डुकरे, निबंध स्पर्धेत प्रथम करण उबाळे व योगिता शिंदे यांनी नंबर पटकावले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.बापुराव आंधळे , तर आभार प्रदर्शन लोकप्रशासन विभाग प्रमुख प्रा डॉ.मुक्ता सोमवंशी यांनी केले.
No comments:
Post a Comment