सोनपेठ (दर्शन) :- प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी जय भवानी मित्र मंडळ आयोजित जिजाऊ जन्मोत्सव सोहळा 2025 सर्व महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन दिनांक 11 जानेवारी 2025 शनिवार रोजी श्री जगदंबा देवी मंदिर परिसर येथे सायंकाळी 6 ते 8 पर्यंत पंचक्रोशीतील सर्व महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच दिनांक 12 जानेवारी 2025 रविवार रोजी श्री जगदंबा देवी मंदिर परिसर येथेच सायंकाळी 6 ते 8 पर्यंत राजमाता राष्ट्रमाता माॅ जिजाऊ माॅ साहेबांच्या प्रतिमेचे पूजन, महिलांचे व्याख्यान व बक्षीस वितरण सोहळा संपन्न होणार आहे, अशा दोन वदिवसीय जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन जय भवानी मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष बळीराम काटे व सर्व सन्माननीय सदस्य पदाधिकारी यांनी केली आहे तरी जास्तीत जास्त महिला भगिनींनी सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन जय भवानी मित्र मंडळ सर्व सदस्य व पदाधिकारी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment