सोनपेठ (दर्शन) : - सोनपेठ येथील हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.राजाभाऊ कदम साहेबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मागील सहा वर्षापासून आम्ही भव्य आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन कै.रमेश वरपूडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोनपेठ, जि. परभणी यांच्या वतीने करत आहोत. याही वर्षी दि.२१ जानेवारी २०२५ रोजी स. १०.०० वाजता ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यावर्षीचे
विषय - १) राजकारणाचे गुन्हेगारीकरण, २) अभिजात मराठी भाषा: संधी आणि आव्हाने, ३) वेब सिरीजच्या विळख्यात अडकलेली तरुणाई असे निश्चित केले असून यासाठी अनुक्रमे पारितोषिके - प्रथम क्रमांकास - 5001रूपये व स्मृतिचिन्ह
द्वितीय क्रमांकास- 4001रूपये व स्मृतिचिन्ह,
उत्तेजनार्थ तीन पारितोषिके ठेवली असून त्यांना प्रत्येकी 1001 रुपये व स्मृतिचिन्ह
प्रदान करण्यात येईल.
या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वकृत्व स्पर्धेसाठी पदवी महाविद्यालयातील व विद्यापीठातील स्पर्धक भाग घेऊ शकतात. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह स्पर्धेनंतर लगेच प्रदान करण्यात येईल. या स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना विशेष सहभाग प्रमाणपत्र देण्यात येतील. या स्पर्धेसाठी चे नियम पुढील प्रमाणे देण्यात येत आहेत.१) प्रत्येक स्पर्धकाला ५० रुपये नोंदणी शुल्क राहील.२) स्पर्धेसाठी माध्यम मराठी असेल ३) १८ ते २२ वयोगटातील स्पर्धक सहभागी होऊ शकतात. ४) स्पर्धकांनी स्पर्धेपूर्वी संयोजकाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. ५) एका काॅलेजमधील जास्तीत जास्त दोन स्पर्धकाला प्रवेश मिळेल. या स्पर्धेसाठी संपर्क -
१) प्रा. डॉ. बालासाहेब काळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख ९४०३५६२०९१
२) प्रा.डॉ. मुकुंदराज पाटील ९६५७७००२३७ ३) प्रा.डॉ. सुनिता टेंगसे 8983776077. ४) प्रा.डॉ. सखाराम कदम, ९९७५३८०००४, ५) डॉ. संतोष रणखांब 9404241492 या क्रमांकावर संपर्क साधावा. सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्य व भाषा विभागाने कृपया स्पर्धक पाठवून सहकार्य करावे.
असे आवाहन महाविद्यालय व सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment