Tuesday, January 21, 2025

विश्वभारती प्राथमिक विद्यालय सोनपेठ येथे आनंदनगरी उत्सहात साजरी ; उद्घाटक सौ.स्मिताताई राजेश विटेकर

सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ येथील विश्वभारती प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय जीवनासोबतच व्यवहारिक ज्ञानदेखील मिळावे म्हणून.आनंदनगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.यात विद्यार्थ्यांनी 61 स्टॉल उभारले होते.कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सौ.स्मिताताई राजेश विटेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून कदम मॅडम, विनोद पवार ( व्यवस्थापक व्हिजन इन्स्टिट्युट), प्रदिप खटाळ (व्हिजन स्कूल प्राचार्य) इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रिबीन कट करून करण्यात आली. तसेच प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन सांगितले व विद्यार्थ्यांना व्यवसायातून होणारा नफा आणि तोटा याचे मार्गदर्शन केले.तसेच मुख्याध्यापक पप्पू पवार यांनी मुलांना मार्गदर्शन करून प्रमुख पाहुण्यांचे आभार व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अक्षय शिंदे सर यांनी केले.
        विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत व्यवहारीक ज्ञान मिळणे देखील गरजेचे असते.यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणा बरोबरच व्यवसाय कसा करावा लागतो व त्यातुन दोन पैसे मिळविताना कशाप्रकारे अडचणीला तोंड द्यावे लागते याचा अनुभव यावा म्हणून सरस्वती विद्यालयात आनंदनगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीत आपली कला सादर करण्याचा प्रयत्न केला. मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी घरुनच पदार्थ बनवून आणुन शालेय आवारात स्टॉल लावले. विद्यार्थी खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत होते. या मेळाव्याला एकप्रकारे बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी मुख्याध्यापक पवार सर तसेच अक्षय शिंदे, कृष्णा राठोड, सचिन चव्हाण, भाग्यश्री महाजन, मेघा मुळी, उषा पवार, नेहा पौळ, सविता राठोड, ज्योती यमगर, श्रेया येवतेकर, आरती स्वामी, स्वाती देशमुख, सविता काकडे, अश्विनी करपे, गणेश बोचरे, बाबासाहेब मस्के ई.शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदीसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. एकंदरीत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले.

No comments:

Post a Comment