Saturday, January 18, 2025

हजरत लुल्लाह बिबी मांसाहब संदल भक्तिमय वातावरणात संपन्न ; 710 वर्षाची परंपरा आजही कायम हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक


सोनपेठ (दर्शन) :- 

हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले सोनपेठ तालुक्यातील शिरोरी येथील हजरत लुल्लाह बिबी मांसाहब दर्गाशरीफचे प्रती साला प्रमाणे याही वर्षी इस्लामी तारीख 16 रज्जब (दि.17 जानेवारी शुक्रवार) रोजी पवित्र संदल मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाले.
710 वर्षापासून चालत आलेली उर्स व संदलची परंपरा आजही शिरोरी येथील हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येऊन हजरत लुल्लाह बिबी मांसाहब दर्गाशरीफचे संदल मोठ्या भक्तिमय व शांततेत पार पडतात दर्गाशरीफचे धार्मिक कार्यक्रम इस्लामी तारीख 15 रज्जब पासून सुरु होऊन 17 रज्जब रोजी उर्स यात्राने सांगता होते. 15 रज्जब (16 जानेवारी गुरूवार)रोजी दर्गाहला गुसल शरीफ त्यानंतर 16 रज्जब (17 जानेवारी शुक्रवार) रोजी पवित्र संदल शरीफ गावातील दर्ग्याचे खादीम शेख इस्माईल जानिमिया यांचे चुलत बंधू मुजावर शेख शब्बीर जीलानी यांच्या निवासस्थानावरून निघून गावातील मुख्य मार्गावरून मिलादचे वाचन करत दर्गामध्ये चादर चढऊन फातीहा खाणी व दुवा संपन्न झाली व 17 रज्जब (18 जानेवारी) रोजी उर्स यात्रा व चिरागाने कार्यक्रम संपन्न झाले हे सर्व पवित्र धार्मिक कार्यक्रम मोठ्या उल्हासाने गावातील हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येऊन साजरा करतात पवित्र संदलास परिसरातील व इतर जिल्ह्यातील लहान बालक, महिला, पुरुष, वृद्ध हिंदू मुस्लिम भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या मनोकामना इच्छा हजरत लुल्लाह बिबी मांसाहब यांच्याकडे मागितले मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले सर्व धार्मिक कार्यक्रम गावातील हिंदू मुस्लिम बांधवानी एकत्रित येऊन मोठ्या शांततेत व भक्तिमय वातावरणात पार पाडले कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सोनपेठ पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आपले कर्तव्य म्हणून पोलीस बांधवांना दरगाह कमिटीच्या वतीनेही सहकार्य लाभले

No comments:

Post a Comment