सोनपेठ (दर्शन) : - सोनपेठ येथील हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे कै.र.व.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्री रामेश्वर कदम यांच्या हस्ते भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.वसंत सातपुते सर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बाळासाहेब काळे, डॉ.सा.द.सोनसळे हे विचार मंचावर उपस्थित होते.दरवर्षीप्रमाणे दिनांक 14 ते 28 जानेवारी 2025 दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आयोजित केला जातो.यावर्षी या उपक्रमांतर्गत अनुक्रमे हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा, पुस्तकावर परिचर्चा व व्याख्यान अशा भरगच्च कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. दिनांक 28 जानेवारी रोजी 'महानुभाव साहित्य व मराठी भाषा' या विषयावर प्रा.सुरेश मोरे तर प्रा.डॉ.सखाराम कदम हे नुकताच मराठी भाषेसाठी युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारी देविदास सौदागर यांची 'उसवण' या पुस्तकावरची परिचर्चा करणार आहेत.तरी सर्व विद्यार्थी, साहित्यप्रेमी मंडळीनी या कार्यक्रमास उपस्थिती नोंदवावी असे आवाहन मराठी विभाग व महाविद्यालयाचे प्राचार्य यांचेकडून करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment