सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ येथील कै.र.व.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दि. 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित 'यशवंत राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेत सहभाग नोंदवला.ही परीक्षा ‘रेनेसॉन्स स्टेट' (महाराष्ट्राच्या निर्मितीचा अकथित इतिहास) - लेखक: गिरीश कुबेर, (अनुवाद: प्रथमेश पाटील) या ग्रंथावर ठेवण्यात आलेली होती. प्रस्तुत परीक्षा श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालय शिरसाळा व कै. रमेश वरपूडकर महाविद्यालय सोनपेठ जि. परभणी या दोन केंद्रावर घेण्यात आली. या परीक्षेसाठी दोन्ही केंद्रावरील 45 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या स्पर्धेसाठी 'महाराष्ट्राचा अकथीत इतिहास' अर्थात "रेनेसॉंन्स स्टेट" लेखक गिरीश कुबेर यांचा ग्रंथ ठेवण्यात आला होता. त्या ग्रंथावर पन्नास वस्तुनिष्ठ प्रश्न विचारून ही परीक्षा श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालय सिरसाळा आणि कै.र.व. महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या पद्धतीने घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी 45 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत वरपूडकर महाविद्यालयाच्या श्री रवीकुमार सुरेश राठोड (बी.ए. तृतीय वर्ष) याने प्रथम क्रमांक, कु.दिपाली राम काटे (बी.ए. द्वितीय वर्ष) यांचा द्वितीय क्रमांक तर श्री आदित्य जयसिंग ठाकूर (बी.ए. तृतीय वर्ष) यांनी तिसरा क्रमांक मिळवत यशवंत सामान्य ज्ञान स्पर्धेची सर्वसामान्य विजेतेपद महाविद्यालयाला प्राप्त करून दिल्याबद्दल संस्थाध्यक्ष, मा. परमेश्वर कदम (हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ) व प्राचार्य, डॉ. वसंत सातपुते, राज्यशास्त्र विभाग प्रमुख कल्याण गोलेकर यांच्यावतीने मनःपूर्वक अभिनंदन व सत्कार करण्यात आले. या स्पर्धेत वरपूडकर महाविद्यालयाच्या श्री रवीकुमार सुरेश राठोड (बी.ए. तृतीय वर्ष) याने प्रथम क्रमांक, कु. दिपाली राम काटे (बी.ए. द्वितीय वर्ष) यांचा द्वितीय क्रमांक तर श्री आदित्य जयसिंग ठाकूर (बी.ए. तृतीय वर्ष) यांनी तिसरा क्रमांक मिळवत यशवंत सामान्य ज्ञान स्पर्धेच सर्वसामान्य विजेतेपद महाविद्यालयाला प्राप्त करून दिल्याबद्दल संस्थाध्यक्ष, मा. परमेश्वर कदम (हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ) व प्राचार्य, डॉ. वसंत सातपुते, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ कल्याण गोलेकर यांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करून सत्कार करण्यात आला.या यशाबद्दल महाविद्यालयाच्या या गुणवंत स्पर्धक विद्यार्थ्यांचे सोनपेठ परिसरात कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment