पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती पात्रता परीक्षेत योगेश राठोड तालुक्यात प्रथम
विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेत यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेणे गरजेचे- जोशी
सोनपेठ (दर्शन) :-
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या २०२१ च्या पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच घोषीत करण्यात आला असून यात शहरातील श्री महालिंगेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी चि.योगेश पिराजी राठोड हा शहरी विभागात सोनपेठ तालूक्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून तो तालुक्यातील एकमेव पुर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती धारक ठरला आहे. त्याच्या या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शक शिक्षकांचाही मुख्याध्यापकांनी सत्कार केला.
विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.एल.जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात योगेश राठोड आणि त्याचे वडील पिराजी राठोड यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपाच्या भाषणात बोलताना मुख्याध्यापक जोशी यांनी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या स्पर्धा परिक्षेत सहभाग घेऊन यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेण्याचे उपस्थित विद्यार्थ्यांना आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक एन.एम.निळे यांनी केले तर सहशिक्षक सतीश भंडारे यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमास विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment