भित्तीपत्रक प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी दिला कर्तृत्ववान महिलांच्या कार्याला उजाळा - सौ.ज्योतीताई कदम
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्ञोत स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून कै. रमेश वरपूडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील महिला सक्षमीकरण समितीच्या वतीने 'स्मरण कर्तृत्ववान महिलांचे' या उपक्रमा अंतर्गत जिजाऊ जयंती आणि विवेकानंद जयंतीच्या औचित्याने भारतातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या भीत्तीपत्रक प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन मा.ज्योतीताई कदम मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाच्या ऊपाध्यक्षा मा.ज्योतीताई कदम व प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रा. सखाराम कदम यांनी जिजाऊ वंदनेचे गायन केले. यावेळी इतिहास विभागाच्या वतीने माॅ जिजाऊ यांच्या कार्यावर आधारित भीत्तीपत्रकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय महिला, ज्यांची ओळख फक्त त्यांच्या कर्तृत्वावरून होते. अशा सामाजिक, राजकीय, आर्थिक ,शैक्षणिक, क्रीडा, अंतराळ ई.क्षेत्रा तील महिलांवर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ने भीत्तीपत्रके तयार केली. या प्रसंगी मा. ज्योतीताई कदम म्हणाल्या की भित्तीपत्रक प्रदर्शनीतुन विद्यार्थ्यांनी कर्तृत्ववान महिलांच्या कार्याला उजाळाच दिला आहे. यात प्रामुख्याने राजमाता जिजाऊ, रमाई माता, सुनीता विल्यम्स, कल्पना चावला, तानिया सचदेव, सानिया मिर्झा, सिंधुताई सपकाळ, मिताली राज, फातीमा शेख, माधुरी कानीटकर, सारिका काळे, प्रतिभाताई पाटील, निर्मला सीतारमण या विविध क्षेत्रातील महिलांच्या कार्य- कर्तुत्वावर प्रकाश टाकला. ही भित्तीपत्रके कु.नम्रता कांबळे, प्रणिती रंजवे, सोनाली सोनवणे, अनिशा कुराडे, वैष्णवी तोंडगे,भागवत मुलगीर, विशाल हरगुडे ,संजय कांबळे ,योगेश कांबळे, ऋतुजा विटकर, यशश्री कदम, प्रियंका पाटील, अर्चना राठोड, ऋतुजा हरगुडे, शितल हरगुडे, वैष्णवी ढगे, कावेरी जाधव ,प्रियंका पाटील, सानिका कदम, अश्विनी सोनवणे, शितल आबुज या विद्यार्थ्यांनी आकर्षक भित्तीपत्रके तयार करून भित्तीपत्रक प्रदर्शनीत सक्रिय सहभाग नोंदवला.
याप्रसंगी महिला सशक्तिकरण समितीतील डॉ. सुनीता टेंगसे ,डॉ. मुक्ता सोमवंशी डॉ. वनिता कुलकर्णी व महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.





No comments:
Post a Comment