महिलांनी सावित्रीमाईचा जन्मदीन सनाप्रमाने साजरा करायला हवा - विनोदअण्णा भोसले
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचा जन्म झाला त्या कालावधीमध्ये मुलींना शिक्षण तर सोडा साधं सन्मानाने जगण्याचा अधिकारही नव्हता.
अशा बिकट परिस्थितीत समाज व्यवस्थेचा विरोध पत्कारून मुलींच्या सर्वांगीन विकासासाठी 1 जानेवारी 1848 ला पुणे येथे भिडेच्या वाड्यात महाराष्ट्रात पहिली शाळा सुरू केली. यासाठी आजच्या मुलींनी व महिलांनी सावित्रीमाईचा जन्मदीन सणाप्रमाने साजरा करायला हवा असे प्रतिपादन मार्गदर्शन प्रसंगी व्याख्याते विनोदअण्णा भोसले यांनी व्यक्त केले.
खडक पुरा गल्ली गंगाखेड येथील महीला बचत आयोजीत दि.3 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. वर्षाताई गोविंदराव यादव तर प्रमूख पाहुण्या म्हणून मनपा च्या प्रकल्प अधिकारी सौ अंजनाताई सदाशिवराव कुंडगीर व सामाजिक कार्यकर्ते सखाराम बोबडे, सतिश सोनुने,प्रल्हाद मोहिते, पांडुरंग काळदाते आदिंची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना व्याख्याते विनोदअण्णा भोसले म्हणाले की, आज महिलानी राजकारणात ग्रामपंचायत सरपंच पदा पासून ते देशाच्या पंतप्रधान, राष्ट्रपती व सरकारी नोकरीत शाळेच्या शिक्षीका ते जिल्हाधिकारी पदा पर्यंत गगन भरारी घेतली आहे याचं पुर्ण श्रेय क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांना जाते. हे आज आपण विसरता कामा नये.
पुणे शहरात असलेल्या दगडुशेठ हलवाई च्या गणपती दर्शनास महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून महिला व पुरुष जातात पण क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी उभारलेल्या पहिल्या शाळेला भेट देण्यासाठी कोणी जात नाही. यासारखं दुर्दैव महाराष्ट्रात कोणत नसेल असं मला वाटतं.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सौ रेखा मधुकर शिंदे यांनी केले
सदरील कार्यक्रमास खडक पुरा गल्लीसह गंगाखेड शहरातील महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

No comments:
Post a Comment