मार्जिन मनीसाठी नवउद्योजकांनी अर्ज करावेत
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक ०८ मार्च २०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये केंद्र शासनाच्या स्टैंड अप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समजाच्या घटकाकरिता मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय क्रमांक २०२० / प्र.क्र. २३ /अजाक/दिनांक ९ डिसेंबर २०२०, दिनांक १६ मार्च २०२० व शासन निर्णय दिनांक २६ मार्च २०२ ९ अन्वये शासन स्तरावर निश्चित करण्यात आलेल्या आहेत. सदरचे शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी परभणी जिल्ह्यातील सदर योजनेकरिता इच्छुक नवउद्योजक लाभार्थ्यांनी शासन निर्णयातील नमूद करण्यात आलेल्या अटीची व शर्तीची पूर्तता करून प्रस्ताव सादर करावेत. असे आवाहन सहाय्यक आयुक्त , समाज कल्याण, परभणी यांनी केले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment