Monday, January 31, 2022

परळी येथे संपादक व पत्रकार यांचा मूकनायक पुरस्काराने गौरव

परळी येथे संपादक व पत्रकार यांचा मूकनायक पुरस्काराने गौरव

परळी / सोनपेठ (दर्शन) :-

परळी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे संपन्न झालेल्या मूकनायक दिन कार्यक्रमात दि. 31 जानेवारी 2022 सोमवार रोजी परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अरुण गुट्टे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी,माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक आयुब खान पठाण,सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्रसिंग ठाकूर,महिला महाविद्यालयाचे प्रा.डॉ.विनोदजी जगतकर,सामाजिक कार्यकर्ते अनंतजी इंगळे,माजी शिक्षण सभापती तथा नगरसेवक गोपाळजी आंधळे,कार्यक्रमाचे मुख्य संयोजक मार्गदर्शक साहित्यिक,कथाकार दैनिक सम्राट चे पत्रकार रानबाजी गायकवाड,सा.सोनपेठ दर्शन संपादक किरण स्वामी आदी मान्यवरांच्या हस्ते सतीशजी बियाणी (संपादक दै. मराठवाडा साथी),दिलीपजी बद्दर (पत्रकार दै.लोकाशा), बालासाहेब कडबाने ( संपादक दै. जगमित्र),बालासाहेब जगतकर (संपादक सा. मानपत्र), प्रेमनाथजी कदम (पत्रकार दै.सुर्योदय),भगवानजी साकसमुद्रे (पत्रकार दै.पुण्यभूमी),जगदिशजी शिंदे (पत्रकार दै.गावकरी),वैजनाथजी गायकवाड (पत्रकार आर.एच.टी.सी. न्युज),प्रा.रविंद्रजी जोशी (पत्रकार दै.पुढारी),अनुपजी कुसूमकर (पत्रकार दै.महाराष्ट्र प्रतिमा),शेख मुकरम भाई (पत्रकार दै.सिटीजन),विकासजी वाघमारे (पत्रकार दै.महाभारत नवोदीत प्रोत्साहन) आदि मान्यवरांना मूकनायक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.अप्रतीम सुत्रसंचलन कवी बालाजी कांबळे सरांनी केले.

Thursday, January 27, 2022

31 जानेवारी रोजी परळीत मूकनायक दिनाचे आयोजन, मूकनायक पुरस्कार जाहीर

31 जानेवारी रोजी परळीत मूकनायक दिनाचे आयोजन, मूकनायक पुरस्कार जाहीर



परळी / सोनपेठ (दर्शन) :-

हजारो वर्षे वंचित, उपेक्षित समाजाचा आवाज बनून नवी क्रांती करणाऱ्या महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या मूकनायक वृतपञाचा मूकनायक दिन परळी येथे  31  जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला असून या निमित्ताने देण्यात येणारे मूकनायक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 
      परळी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे पञकार भवन येथे  31 जानेवारी सकाळी अकरा वाजता सुरु होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आवाड हे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, सिरसाळा सरपंच रामदादा किरवले, माजी उपनगराध्यक्ष अयुबखाॅ पठाण, ग्रामीण पोलीस स्टेशन पो. नि. मारोती मुंडे, वैद्यकीय आधिक्षक डाॅ. अरुण गुट्टे, प्रा. डाॅ. विनोद जगतकर, सामाजिक कार्यकर्ते अनंत इंगळे आदि उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते मूकनायक पुरस्कार देऊन पञकारांचा गौरव करण्यात येणार आहे. 
         मूकनायक पुरस्कार 
      या वेळी दैनिक मराठवाडा साथीचे संपादक सतीश बियाणी, दैनिक लोकाशाचे दिलीप बददर, मानपञचे संपादक बालासाहेब जगतकर, दैनिक जगमिञचे संपादक बालासाहेब कडबाने, दैनिक सुर्योदयचे प्रतिनिधी प्रेमनाथ कदम, दैनिक पुढारीचे प्रा. रविंद्र जोशी, दैनिक गावकरीचे जगदीश शिंदे, दैनिक पुण्यभूमीचे भगवान साकसमुद्रे, दैनिक सिटीजनचे शेख मुकरम, महाराष्ट्र प्रतिमाचे प्रतिनिधी अनुप कुसूमकर तर नवोदित पञकार प्रोत्साहन पुरस्कार दैनिक महाभारतचे प्रतिनिधी विकास वाघमारे यांना देण्यात येणार आहे. 
    या कार्यक्रमास सर्व पञकार बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक दैनिक सम्राटचे तालुका प्रतिनिधी रानबा गायकवाड यांनी केले आहे.साप्ताहिक सोनपेठ दर्शन परीवाराच्या वतिने सर्व मुकनायक पुरस्कार जाहीर झालेल्या पत्रकार बांधवांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Monday, January 24, 2022

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 72 वा वर्धापन दिन समारंभाचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात फेसबुक लाईव्हद्वारे सहभागी होण्याचे आवाहन

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 72 वा वर्धापन दिन समारंभाचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात फेसबुक लाईव्हद्वारे  सहभागी होण्याचे आवाहन


परभणी सोनपेठ (दर्शन) : -

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 72 वा वर्धापन दिन समारंभाचा मुख्य ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम हा दि. 26 जानेवारी, 2022 रोजी सकाळी 09.15 वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडीयम, परभणी येथे राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते होणार आहे.    
सद्यस्थीतीत परभणी जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने परभणी जिल्हयातील सर्व नागरीकांनी सदर कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी न होता या जिल्ह्याचे फेसबुक Live link https://www.facebook.com/collector.pbn फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केले आहे. 

पालकमंत्री नवाब मलिक यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम

पालकमंत्री नवाब मलिक यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

 राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार दि.25 जानेवारी 2022 रोजी  दुपारी 04.00 वाजता परभणी येथे आगमन व राष्ट्रवादी काँग्रेसपार्टी परभणी जिल्हा शहर कार्यकारणीची बैठक स्थळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, परभणी सायंकाळी 5.00 वाजता महानगरपालिका परभणी नगरसेवकांची बैठक स्थळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, परभणी  सायंकाळी 06 ते 08 दरम्यान राखीव व सोईनुसार मुक्काम करतील.
बुधवार दि.26 जानेवारी रोजी सकाळी 9.05 वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमकडे प्रयाण. सकाळी 9.15 वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम, परभणी येथे आगमन व भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 9.45 वाजता जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हा शल्य चिकित्सक, महानगर पालिका आयुक्त जिल्हा कृषी अधिकारी व इतर सबंधीत अधिकाऱ्यासमवेत जिल्हयातील महत्वाच्या प्रश्नांसदर्भात आढावा बैठक स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी. सकाळी 10.30 वाजता दैनिक धर्मयोध्दा या दैनिकाच्या प्रथमअंक प्रकाशन सोहळयास उपस्थिती स्थळ बी. रघुनाथ सभागृह, वसमत रोड, परभणी. सकाळी 11.00 वाजता श्री. विजय गव्हाणे माजी आमदार यांच्या सत्कार कार्यक्रमास उपस्थिती स्थळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, परभणी. दुपारी 12.00 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, परभणी ग्रामीण कार्यकारीणीची बैठक स्थळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, परभणी दुपारी 1 ते 3.30 दरम्यान राखीव. दुपारी 3.30 वाजता परभणी येथून मोटारीने औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण करतील.

Sunday, January 23, 2022

रमाई विचारमंचाकडून मंडळ अधिकारी ज्योती प्रधान यांचा हृदय सत्कार

रमाई विचारमंचाकडून मंडळ अधिकारी ज्योती प्रधान यांचा हृदय सत्कार


जिंतूर / सोनपेठ (दर्शन) :- 
जिंतूर तालुक्यातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महत्वपूर्ण महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करण्यात रमाई विचारमंच नेहमीच अग्रेसर असतो. जिंतूर तहसील कार्यालयाअंतर्गत पुंगळा व अतिरिक्त पाचलेगाव या दोन सज्जाचा कार्यभार सांभाळणाऱ्या सक्षम महिला तलाठी श्रीमती ज्योती प्रधान यांची महसूल विभागीय परीक्षेद्वारे नुकतीच मंडळ अधिकारी पदावर निवड झाल्याबद्दल रमाई विचारमंचच्या अध्यक्षा आशाताई खिल्लारे यांच्यासह सदस्यांनी त्यांचा हृदय सत्कार केला. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  
         यावेळी डॉ.श्रद्धा खिल्लारे, सुमन प्रधान, आशाबाई वाकळे, शेवंताबाई प्रधान, दैवशाला जाधव, विमल प्रधान,  दिपाली वाकळे, मेघा मोरे, ताईबाई डबडे, राजश्री देबाजे, सुकेशिनी प्रधान, कु. आदिती प्रधान यांची उपस्थिती होती.
        जमीनविषयक नोंदी ठेवून पीक परिस्थितीप्रमाणे महसुलाची वसुली करणे, नागरिकांना जमिनीचे उतारे देणे ही जमीन विषयक महत्त्वाची कामे तलाठी करत असतो. महसूल प्रशासनाचा गावातील मुख्य घटक म्हणून गावात विविध कामे व निर्णयाची अंमलबजावणी करताना तलाठी प्रशासनाचा प्रतिनिधी म्हणून काम करतो. महिला तलाठी ज्योती प्रधान यांनी सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून गोरगरीब, विधवा, दिव्यांग आणि  निराधारांना शासनाच्या विविध योजनेतुन अर्थसहाय्य मिळण्यासाठी  वेळोवेळी पाठपुरावा करून संबंधितास लाभ मिळवून दिला. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदत उपलब्ध करून देण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. फेरफार नोंदी, सातबारा यासह शेतजमीन विषयक इतर कामेही त्यांनी प्राधान्याने पार पडली आहेत. त्यामुळे त्यांच्या कामावर सज्जातील शेतकरी खुश व समाधानी होते. याचा प्रत्यय त्यांची मंडळ अधिकारी पदी निवड झाल्यानंतर सत्कार व शुभेच्छा देण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कार्यालयात हजेरी लावली होती यावरून दिसून आले.
          

Friday, January 21, 2022

उद्योग आणि आर्थिक साक्षरता जनजागृती कार्यशाळा संपन्न

उद्योग आणि आर्थिक साक्षरता जनजागृती कार्यशाळा संपन्न



सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ जि. परभणी येथील समाजशास्त्र विभाग आणि दिनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, नगर परिषद, गंगाखेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 जानेवारी 2022 रोजी उद्योग आणि आर्थिक साक्षरता जनजागृती एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत  'उद्योगा द्वारे महिला विकास आणि गरज आर्थिक साक्षरतेची' या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी प्रो.डॉ. अंजली जोशी, समाजशास्त्र विभाग प्रमुख, दयानंद कला महाविद्यालय, लातूर व डॉ. प्रतिभा बिरादार, समाजशास्त्र विभाग प्रमुख, माऊली महाविद्यालय, वडाळा, सोलापुर यांना आमंत्रित करण्यात आले होते. 
   झूम मीटिंग च्या ऑनलाइन माध्यमातून मान्यवरांनी बचत गटातील महिलांशी संवाद साधला. डॉ.अंजली जोशी यांनी बचत गट महिला सक्षमीकरणाचे एक माध्यम बनत असून बचत गटाद्वारे सर्वसामान्य महिला आपली नवीन ओळख समाजात निर्माण करत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे सांगितले.  महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी बचत गटातील महिलांनी संयुक्त पणे निर्णय घेऊन ते कार्यान्वित करण्याची आज नितांत गरज आहे. केवळ आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी बचत गट न स्थापन करता गटातील रकमेच्या सह्याने तसेच शासनाच्या विविध योजनांची मदत घेऊन ग्रामीण महिलांनी लघु उद्योग, कुटिर उद्योग, पशूपालन करून आपल्या बचत गटाची नवीन ओळख निर्माण करण्याची संधी शासनाने त्यांना उपलब्ध करून दिली आहे. आणि संधीचे सोने सर्व महिलांनी करण्याची वेळ आज आली आहे. याची जाणीव बचत गटातील महिलांनी बाळगावी. असे आवाहन डॉ.अंजली जोशी यांनी महिलांशी संवाद साधताना केले. 
       डॉ. प्रतिभा बिरादार यांनी आर्थिक साक्षरतेवर मार्गदर्शन करताना महिलांशी संवाद साधला, त्या म्हणाल्या पैसा काय आहे, पैशाच्या साह्याने आपण काय करू शकतो, पैसा कुठे आणि कशासाठी, कशा पद्धतीने खर्च करायला हवा या सार्‍या गोष्टींची माहिती असणे म्हणजेच आर्थिक साक्षरता होय. भविष्याच्या दृष्टीने आपण पैशाचे नियोजन करतो ते सुद्धा आर्थिक साक्षरताच आहे. जर या गोष्टीची आपल्याला माहिती नसेल तर आपल्या जीवनात विविध प्रकारच्या आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. आर्थिक गुंतवणूक करताना महिलांनी जागरुकता बाळगणे गरजेचे आहे. तसेच ज्याप्रमाणे आपण कुटुंबाच आर्थिक नियोजन करतो त्याचप्रमाणे आपण बचत गटातील सर्व महिलांनी सामुहिकरित्या नवनविन उद्योग चालू करून त्याचे आर्थिक नियोजनही केले पाहिजे. मानवी जीवनात दोन मोठे पैलू आहेत ते म्हणजे पैसा आणि शिक्षण या दोन्हीचा विचार केला तर समाजातील प्रत्येक गरीब-श्रीमंत, तरुण-वृध, शिक्षित-अशिक्षित, स्त्री- पुरुष यांच्या साठी आर्थिक साक्षरता ही खूप महत्त्वाची आहे. कुटुंबातील आर्थिक निर्णय प्रक्रियेत सुद्धा महिलांनी सहभागी असणे गरजेचे आहे. आर्थिक साक्षरता महिलांना कुटुंबात आणि कुटुंबाबाहेर वावरतांना निश्चितच उपयुक्त ठरते. महिलांनी ऑनलाईन आर्थिक व्यवहार कसे होतात याची इत्यंभूत माहिती जाणून घेणे आज काळाची गरज असल्याचे डॉ. बिरादार म्हणाले.
       उद्योग आणि आर्थिक साक्षरता जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यासाठी हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. परमेश्वर कदम, उपाध्यक्षा मा. ज्योतीताई कदम, मा. विजयकुमारजी तापडिया नगराध्यक्ष, गंगाखेड यांनी मार्गदर्शन केले, तर प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, मा. श्री देविदास जाधव, मुख्याधिकारी, नगरपरिषद, गंगाखेड यांनी कार्यशाळेचे आयोजक म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. या कार्यशाळेच्या समन्वयक डॉ सुनिता टेंगसे, सौ. अंजना बिडगर प्रकल्प अधिकारी, नगर परिषद, गंगाखेड, सौ.जयमाला हजारे, समुदाय संघटक, नगर परिषद, गंगाखेड यांनी कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले आणि या ऑनलाइन कार्यशाळेसाठी तांत्रिक सहाय्यक  प्रा. डॉ. मुकुंदराज पाटील हे होते. या कार्यशाळेत बचत गटातील महिला बहुसंख्येने सहभागी झाल्या होत्या. तसेच प्राध्यापक आणि विद्यार्थी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ.सुनिता टेंगसे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.अंजना बिडगर यांनी मानले.

उद्योग आणि आर्थिक साक्षरता जनजागृती कार्यशाळा संपन्न

उद्योग आणि आर्थिक साक्षरता जनजागृती कार्यशाळा संपन्न


सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ जि. परभणी येथील समाजशास्त्र विभाग आणि दिनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, नगर परिषद, गंगाखेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 जानेवारी 2022 रोजी उद्योग आणि आर्थिक साक्षरता जनजागृती एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत  'उद्योगा द्वारे महिला विकास आणि गरज आर्थिक साक्षरतेची' या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी प्रो.डॉ. अंजली जोशी, समाजशास्त्र विभाग प्रमुख, दयानंद कला महाविद्यालय, लातूर व डॉ. प्रतिभा बिरादार, समाजशास्त्र विभाग प्रमुख, माऊली महाविद्यालय, वडाळा, सोलापुर यांना आमंत्रित करण्यात आले होते. 
   झूम मीटिंग च्या ऑनलाइन माध्यमातून मान्यवरांनी बचत गटातील महिलांशी संवाद साधला. डॉ.अंजली जोशी यांनी बचत गट महिला सक्षमीकरणाचे एक माध्यम बनत असून बचत गटाद्वारे सर्वसामान्य महिला आपली नवीन ओळख समाजात निर्माण करत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे सांगितले.  महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी बचत गटातील महिलांनी संयुक्त पणे निर्णय घेऊन ते कार्यान्वित करण्याची आज नितांत गरज आहे. केवळ आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी बचत गट न स्थापन करता गटातील रकमेच्या सह्याने तसेच शासनाच्या विविध योजनांची मदत घेऊन ग्रामीण महिलांनी लघु उद्योग, कुटिर उद्योग, पशूपालन करून आपल्या बचत गटाची नवीन ओळख निर्माण करण्याची संधी शासनाने त्यांना उपलब्ध करून दिली आहे. आणि संधीचे सोने सर्व महिलांनी करण्याची वेळ आज आली आहे. याची जाणीव बचत गटातील महिलांनी बाळगावी. असे आवाहन डॉ.अंजली जोशी यांनी महिलांशी संवाद साधताना केले. 
       डॉ. प्रतिभा बिरादार यांनी आर्थिक साक्षरतेवर मार्गदर्शन करताना महिलांशी संवाद साधला, त्या म्हणाल्या पैसा काय आहे, पैशाच्या साह्याने आपण काय करू शकतो, पैसा कुठे आणि कशासाठी, कशा पद्धतीने खर्च करायला हवा या सार्‍या गोष्टींची माहिती असणे म्हणजेच आर्थिक साक्षरता होय. भविष्याच्या दृष्टीने आपण पैशाचे नियोजन करतो ते सुद्धा आर्थिक साक्षरताच आहे. जर या गोष्टीची आपल्याला माहिती नसेल तर आपल्या जीवनात विविध प्रकारच्या आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. आर्थिक गुंतवणूक करताना महिलांनी जागरुकता बाळगणे गरजेचे आहे. तसेच ज्याप्रमाणे आपण कुटुंबाच आर्थिक नियोजन करतो त्याचप्रमाणे आपण बचत गटातील सर्व महिलांनी सामुहिकरित्या नवनविन उद्योग चालू करून त्याचे आर्थिक नियोजनही केले पाहिजे. मानवी जीवनात दोन मोठे पैलू आहेत ते म्हणजे पैसा आणि शिक्षण या दोन्हीचा विचार केला तर समाजातील प्रत्येक गरीब-श्रीमंत, तरुण-वृध, शिक्षित-अशिक्षित, स्त्री- पुरुष यांच्या साठी आर्थिक साक्षरता ही खूप महत्त्वाची आहे. कुटुंबातील आर्थिक निर्णय प्रक्रियेत सुद्धा महिलांनी सहभागी असणे गरजेचे आहे. आर्थिक साक्षरता महिलांना कुटुंबात आणि कुटुंबाबाहेर वावरतांना निश्चितच उपयुक्त ठरते. महिलांनी ऑनलाईन आर्थिक व्यवहार कसे होतात याची इत्यंभूत माहिती जाणून घेणे आज काळाची गरज असल्याचे डॉ. बिरादार म्हणाले.
       उद्योग आणि आर्थिक साक्षरता जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यासाठी हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. परमेश्वर कदम, उपाध्यक्षा मा. ज्योतीताई कदम, मा. विजयकुमारजी तापडिया नगराध्यक्ष, गंगाखेड यांनी मार्गदर्शन केले, तर प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, मा. श्री देविदास जाधव, मुख्याधिकारी, नगरपरिषद, गंगाखेड यांनी कार्यशाळेचे आयोजक म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. या कार्यशाळेच्या समन्वयक डॉ सुनिता टेंगसे, सौ. अंजना बिडगर प्रकल्प अधिकारी, नगर परिषद, गंगाखेड, सौ.जयमाला हजारे, समुदाय संघटक, नगर परिषद, गंगाखेड यांनी कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले आणि या ऑनलाइन कार्यशाळेसाठी तांत्रिक सहाय्यक  प्रा. डॉ. मुकुंदराज पाटील हे होते. या कार्यशाळेत बचत गटातील महिला बहुसंख्येने सहभागी झाल्या होत्या. तसेच प्राध्यापक आणि विद्यार्थी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ.सुनिता टेंगसे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.अंजना बिडगर यांनी मानले.

Wednesday, January 19, 2022

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 17 जागांपैकी 10 जागा पटकावून स्पष्ट बहुमत भाजपाचा सुपडा साफ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 17 जागांपैकी 10 जागा पटकावून स्पष्ट बहुमत भाजपाचा सुपडा साफ



पालम / सोनपेठ (दर्शन) : -

पालम येथील नगर पंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 17 जागांपैकी 10 जागा पटकावून स्पष्ट बहुमत पटकावले आहे. त्या पाठोपाठ आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या मित्रमंडळाने 4, अपक्षांनी 2 जागा पटकावल्या.सत्तारुढ भारतीय जनता पक्षास केवळ 1 जागा राखता आली.
या निवडणूकीतील प्रभाग निहाय उमेदवारांना मिळालेली मतांची निवडणुक विभागाने दैनिक दिलासास दिलेल्या यादी  पुढील प्रमाणे....
       प्रभाग क्रमांक 1 मधून संजय रामराव थिटे यांनी 312 मते, त्यांचे प्रतिस्पर्धी रुख्मिणबाई महादू फुलपगार यांनी 152 तसेच सतीश रुस्तुमराव शिंदे यांना 08 व बाबासाहेब शेषराव एंगडे यांना 2 मते मिळाली. 2 नोटा असे एकूण 476 वैध मतांची संख्या.
       प्रभाग क्रमांक 2 मधून पठाण उबेदुल्ला खान नसरुल्ला खान यांना 355, त्यांचे प्रतीस्पर्धी पठाण रशीद खान युसूफ खान यांना 295, पठाण शादात खान मन्सूर खान यांना 11, 2 मते नोटा असे एकूण वैध मताची संख्या 663.
       प्रभाग क्रमांक 3 मधून खुरेशी मोबीन महेबुब यांनी 195 मते मिळवून विजय पटकाविला. त्यांचे प्रतिस्पर्धी सरवरी सगीर नैमोद्दीन यांना 179 तसेच खुरेशी अनिस अब्दुल लतीफ यांना 16, नोटा 6 एकूण वैध मतांची संख्या 396
       प्रभाग क्रमांक 4 मधून पठाण अन्वरी बी हिदायतुल्ला खान यांनी 439 मते मिळवून विजय पटकाविला. त्यांचे प्रतिस्पर्धी जरीना बी सायीन खान पठाण यांना 207, नोटा 3 असे एकूण वैध मतांची संख्या 649.
प्रभाग क्रमांक 5 मधून मंगल वसंतराव सिरसकर यांनी 452 मते पटकावुन विजय पटकाविला. त्यांच्या प्रतिस्पर्धी अंजलीबाई भारत सिरसकर यांना 288 तर प्रयागबाई देविदासराव सिरसकर यांना 2 तसेच नोटा 14 असे एकूण वैध मतांची संख्या 756.
       प्रभाग क्रमांक 6 मधून बालासाहेब गणेश रोकडे व भास्करराव गंगाराम सिरसकर यांना समान म्हणजे 235 मते मिळाली. तसेच पांडुरंग मंचकराव रोकडे यांना 4, तसेच नोटा 4 असे एकूण वैध मतांची संख्या 478. या प्रभागात भास्कर गंगाराम सिरसकर हे काढलेल्या चिठ्ठीद्वारे विजयी केल्या गेले.
       प्रभाग क्रमांक 7 मधून सविताबाई लक्ष्मणराव रोकडे यांनी 323 मते पटकावून मोठा विजय मिळविला. प्रतिस्पर्धी निर्मला दिलीप रोकडे यांना 83, अन्नपूर्णा शिवाजी शिंदे यांना 12, नोटा 2 असे एकूण वैध मतांची संख्या 420.
        प्रभाग 8 मधून सय्यद रजीया बेगम सय्यद इक्तेखार यांना 228 मते मिळाली. त्या विजयी झाल्या. प्रतिस्पर्धी कुरेशी खैरुन्नीसाबी बीबन यांना 193, शेख मेहरुन्नीसा शेख रशीद यांना 195, नोटा 4 अशी वैध मतांची संख्या 620.
        प्रभाग 9 मधून अनिताबाई जालंधर हत्तीअंबीरे या विजयी झाल्या. त्यांना 260, प्रतिस्पर्धी रेखा गौतम हत्तीअंबीरे यांना 257 तर धम्मानंद गोविंद थिटे यांना 20, सुनिता विश्‍वनाथ रोकडे यांना 17, लक्ष्मीबाई विश्‍वनाथ हनवते यांना 1, नोटा 1 अशी एकुण वैध मतांची संख्या 501.
       प्रभाग 10 मधून सरस्वती ज्ञानराज घोरपडे या विजयी झाल्या. त्यांना 385, निर्मलाबाई बापूराव घोरपडे यांना 250, नोटा 8 एकूण वैध मतांची संख्या 643.
       प्रभाग 11 मधून चाऊस गौसीया आबुदबीन यांना 355 मते मिळाली. त्या विजयी झाल्या. प्रतिस्पर्धी पुष्पा गणेश नंदेवार यांना 316 तर सुमित्राबाई दत्ता गायकवाड यांना 24, पठाण शमीन बेगम मोबीन खान यांना 5, कुरेशी अनीसा बी नय्युम यांना 2, सुनीता अनंतराव पौळ यांना 1, नोटा 3 अशी वैध मतांची संख्या 706.
       प्रभाग 12 मधून सरस्वती सदाशिव सिरसकर या विजयी झाल्या. त्यांना 260, मालता गजानन रोकडे यांना 253 तर दिपाली अशोकराव रोकडे यांना 04, नोटा 05, एकूण वैध मतांची संख्या 522.
       प्रभाग 13 मधून कैलास रामराव रुद्रवार यांना 337 मते मिळाली ते विजयी ठरले. त्यांचे प्रतिस्पर्धी सय्यद ताहेर अली वाहेद अली यांना 252, नोटा 1 अशी वैध मतांची संख्या 590.
       प्रभाग 14 मधून पठाण हैदर खा अब्दुल्ला खा यांना 275 मते मिळाली ते विजयी ठरले. प्रतिस्पर्धी पठाण रहील खान लाल खान यांना 209, शेख मुसा मोहीद्दीन यांना 68, पठाण अफसर खान सरवर यांना 2, एकूण वैध मतांची संख्या 560.
       प्रभाग 15 मधून पठाण समीर खान अजीउल्ला खान यांना 338 मते मिळाली. ते विजयी ठरले. प्रतिस्पर्धी शेख शाहीदा बी इसा यांना 124, विलास लिंबाजी कोकाटे यांना 33, उत्तम धोंडीबा घोरबडे यांना 6, नोटा 2 अशी एकूण वैध मतांची संख्या 553.
       प्रभाग 16 मधून गजानन आबासाहेब पवार यांना 417 मते मिळवून विजयी ठरले. प्रतिस्पर्धी पठाण बीसमील्ला बी मंजलेखा यांना 265, विजयकुमार बापुराव घोरपडे यांना 3, नोटा 5  असे एकूण वैध मते 690.
      प्रभाग 17 मधून धु्रपदाबाई विश्‍वनाथ हिवरे यांना 175 मते मिळाली. त्या विजयी ठरल्या. त्यांचे प्रतिस्पर्धी चित्रकला विश्‍वनाथ हत्तीअंबीरे यांना 160, सुलभा महेंद्रकुमार रोहिणकर यांना 144 तर ज्योती रामप्रसाद कदम  यांना 10, छायाबाई बालासाहेब हनवते यांना 5, नोटा 2 असे एकूण वैध मतांची संख्या 496.

विद्यापीठ बॅटमिंटन संघात संगमेश्वरची रूपाली स्वामी समवेत तीन खेळाडूंची निवड

विद्यापीठ बॅटमिंटन संघात संगमेश्वरची रूपाली स्वामी समवेत तीन खेळाडूंची निवड




सोलापूर / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

सोलापूर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या बॅडमिंटन संघात संगमेश्वर महाविद्यालयाच्या उम्मे आयमन शेख , रूपाली स्वामी व निखिल बारावकर या तिघांची निवड झाली . भोपाळ मध्य प्रदेश येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला . या खेळाडूंना प्रा . आनंद चव्हाण , प्रा . संतोष खेंडे व प्रा . शरण वांगी , यांचे मार्गदर्शन लाभले .या खेळाडूंना श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे - सचिव धर्मराज काडादी , महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ . शोभा राजमान्य यांनी अभिनंदन केले ..

Thursday, January 13, 2022

कौडगाव हुडा येथे जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

कौडगाव हुडा येथे जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी


परळी / सोनपेठ (दर्शन) :-

परळी तालुक्यातील मौजे कौडगाव हुडा येथे जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली, शछत्रपती संभाजी राजे मित्र मंडळ व गावकऱ्यांच्या सार्वजनिक जिजाऊ जयंती पारंपारिक पद्धतीने साजरी करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला,जिजाऊ जयंती निमित्त सकाळच्या सत्रात ध्वजारोहण करून जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी लहान मुला मुलींनी जिजाऊसाहेब यांचे विचार मांडले नंतर संध्याकाळच्या सत्रात जिजाऊ पालखी ची गावातून मृदंगाच्या तालावर मिरवणूक काढण्याचे ठरले यावेळी गावातील भजनी मंडळी महिला मंडळी शिवभक्त व गावातील लहान लहान मुली जिजाऊ बनून आल्या,जिजाऊंच्या पालखीची मिरवणूक भव्य दिव्य झाली दारोदारी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या पालखीचे आगमन होताच माय माऊली जिजाऊ दर्शन घेण्यासाठी पंचा आरतीचे ताट घेऊन जिजाऊंना मानवंदना देत होत्या.जिजाऊ पालखी मिरवणुकीनंतर जिजाऊ वंदना घेऊन सांगता करण्यात आली यावेळी छत्रपती संभाजी महाराज ग्रुप ने पूर्ण नियोजन केले होते तसेच गावातील महिला मंडळी आणि भजनी मंडळी गावकरी मंडळी यांनीही मुलाचं योगदान दिला त्याबद्दल छत्रपती संभाजी महाराज ग्रुपच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.

Wednesday, January 12, 2022

भित्तीपत्रक प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी दिला कर्तृत्ववान महिलांच्या कार्याला उजाळा - सौ.ज्योतीताई कदम

भित्तीपत्रक प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी दिला कर्तृत्ववान महिलांच्या कार्याला उजाळा - सौ.ज्योतीताई कदम

सोनपेठ (दर्शन) :-

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्ञोत स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून कै. रमेश वरपूडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील महिला सक्षमीकरण समितीच्या वतीने 'स्मरण कर्तृत्ववान महिलांचे' या  उपक्रमा अंतर्गत जिजाऊ जयंती आणि विवेकानंद जयंतीच्या औचित्याने भारतातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या भीत्तीपत्रक प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन मा.ज्योतीताई कदम मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. 
   या प्रसंगी हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाच्या ऊपाध्यक्षा मा.ज्योतीताई कदम  व प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रा. सखाराम कदम यांनी जिजाऊ वंदनेचे गायन केले. यावेळी इतिहास विभागाच्या वतीने माॅ जिजाऊ यांच्या कार्यावर आधारित भीत्तीपत्रकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय महिला, ज्यांची ओळख फक्त त्यांच्या कर्तृत्वावरून होते. अशा सामाजिक, राजकीय, आर्थिक ,शैक्षणिक, क्रीडा, अंतराळ ई.क्षेत्रा तील महिलांवर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ने भीत्तीपत्रके तयार केली. या प्रसंगी मा. ज्योतीताई कदम म्हणाल्या की भित्तीपत्रक प्रदर्शनीतुन विद्यार्थ्यांनी कर्तृत्ववान महिलांच्या कार्याला उजाळाच दिला आहे. यात प्रामुख्याने राजमाता जिजाऊ, रमाई माता, सुनीता विल्यम्स, कल्पना चावला, तानिया सचदेव, सानिया मिर्झा, सिंधुताई सपकाळ, मिताली राज, फातीमा शेख, माधुरी कानीटकर, सारिका काळे, प्रतिभाताई पाटील, निर्मला सीतारमण या विविध क्षेत्रातील महिलांच्या कार्य- कर्तुत्वावर प्रकाश टाकला. ही भित्तीपत्रके  कु.नम्रता कांबळे, प्रणिती रंजवे, सोनाली सोनवणे, अनिशा कुराडे, वैष्णवी तोंडगे,भागवत मुलगीर, विशाल हरगुडे ,संजय कांबळे ,योगेश कांबळे, ऋतुजा विटकर, यशश्री कदम, प्रियंका पाटील, अर्चना राठोड, ऋतुजा हरगुडे, शितल हरगुडे, वैष्णवी ढगे, कावेरी जाधव ,प्रियंका पाटील, सानिका कदम, अश्विनी सोनवणे, शितल आबुज या विद्यार्थ्यांनी आकर्षक भित्तीपत्रके  तयार करून भित्तीपत्रक प्रदर्शनीत सक्रिय सहभाग नोंदवला. 
   याप्रसंगी महिला सशक्तिकरण समितीतील डॉ. सुनीता टेंगसे ,डॉ. मुक्ता सोमवंशी डॉ. वनिता कुलकर्णी व महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.

Monday, January 10, 2022

आस्थापनांनी मराठी भाषेत फलक लावावेत

आस्थापनांनी मराठी भाषेत फलक लावावेत


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

परभणी शहरातील अनेक आस्थापनांनी बिगर मराठी भाषेत फलक लावण्यात आले आहे. परभणी शहरातील सर्व संबंधित आस्थापनांनी बॉम्बे शॉप अॅक्ट नुसार आणि मराठी भाषा विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडुन निर्गमित केलेल्या शासन निर्णय व परिपत्रकानुसार महाराष्ट्रातील आस्थापनांवर असलेला दर्शनी फलक हा मराठी भाषेत असणे आवश्यक आहे. तरी परभणी जिल्हयातील सर्व आस्थापनांनी आपल्या आस्थापनेचे दर्शनी भागातील फलक हे मराठी भाषेत लावावेत. तसेच 14 जानेवारी ते 28 जानेवारी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याबाबतही परभणी शहरातील सर्व आस्थापनांना शासन निर्णय व परिपत्रकाचे काटेकोरपणे पालन  करावे. असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी वि.नं.माणगांवकर, यांनी केले आहे.
-*-*-*-*-

मार्जिन मनीसाठी नवउद्योजकांनी अर्ज करावेत

मार्जिन मनीसाठी नवउद्योजकांनी अर्ज करावेत


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
  
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक ०८ मार्च २०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये केंद्र शासनाच्या स्टैंड अप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समजाच्या घटकाकरिता मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आली आहे.  या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय क्रमांक २०२० / प्र.क्र. २३ /अजाक/दिनांक ९ डिसेंबर २०२०, दिनांक १६ मार्च २०२० व शासन निर्णय दिनांक २६ मार्च २०२ ९ अन्वये शासन स्तरावर निश्चित करण्यात आलेल्या आहेत. सदरचे शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी  परभणी जिल्ह्यातील सदर योजनेकरिता इच्छुक नवउद्योजक लाभार्थ्यांनी शासन निर्णयातील नमूद करण्यात आलेल्या अटीची व शर्तीची पूर्तता करून प्रस्ताव सादर करावेत. असे आवाहन सहाय्यक आयुक्त , समाज कल्याण, परभणी यांनी केले आहे.
-*-*-*-*-

Saturday, January 8, 2022

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती पात्रता परीक्षेत योगेश राठोड तालुक्यात प्रथम विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेत यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेणे गरजेचे- जोशी

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती पात्रता परीक्षेत योगेश राठोड तालुक्यात प्रथम
विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेत यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेणे गरजेचे- जोशी



सोनपेठ (दर्शन) :-


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या २०२१ च्या पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच घोषीत करण्यात आला असून यात शहरातील श्री महालिंगेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी चि.योगेश पिराजी राठोड हा शहरी विभागात सोनपेठ तालूक्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून तो तालुक्यातील एकमेव पुर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती धारक ठरला आहे‌. त्याच्या या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शक शिक्षकांचाही मुख्याध्यापकांनी सत्कार केला.
विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.एल.जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात योगेश राठोड आणि त्याचे वडील पिराजी राठोड यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपाच्या भाषणात बोलताना मुख्याध्यापक जोशी यांनी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या स्पर्धा परिक्षेत सहभाग घेऊन यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेण्याचे उपस्थित विद्यार्थ्यांना आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक एन.एम.निळे यांनी केले तर सहशिक्षक सतीश भंडारे यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमास विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Thursday, January 6, 2022

महाराष्ट्रातील पहिल्या महिला पत्रकार तानुबाई बिर्जे यांना पत्रकार दिनानिमीत्त विनम्र अभिवादन

महाराष्ट्रातील पहिल्या महिला पत्रकार तानुबाई बिर्जे यांना पत्रकार दिनानिमीत्त विनम्र अभिवादन 



 सोनपेठ (दर्शन) :-

आज पत्रकार दिनानिमित्त महिला पत्रकार तानुबाई बिर्जे यांची माहिती करून देत आहे. आज आपण प्रिंट इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांमध्ये महिला पत्रकारांचा वाढता सहभाग पाहतोय .मात्र आपल्याला माहित आहे का ? भारतातील पहिल्या महिला पत्रकार कोण होत्या.(१८७६-१९१३ )  या  शतकभरापूर्वीच्या ' दीनबंधू 'या सत्यशोधकी नियतकालिकाच्या स्री  संपादक तानुबाई बिर्जे या होत्या.
             तानुबाई बिर्जे ह्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिल्या संपादिका ठरल्या. कृष्णाजी भालेकर यांनी १८७७मध्ये सुरू केलेल्या ‘दिनबंधु’ या वृत्तपत्राचं संपादकपद १९०८ ते १९१२ या काळात तानुबाई बिर्जे यांनी साभाळलं. महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव असलेल्या तानुबाईंनी संपादक म्हणून आपल्या अग्रलेखातून समाजातील विषमतेवर प्रहार करून त्याची चिरफाड केली. बहुजन शिक्षणाचा विचार मांडला. नाविन्यपूर्ण विषय हाताळले आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या प्रबोधनात महत्त्वाची भूमिका बजावली.मात्र ज्यावेळी महिलांना चूल आणि मूल यापलीकडे पाहिलं जात नव्हतं, अशा काळात तानुबाईंनी सत्यशोधकीय पत्रकारितेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि ती चोखपणे बजावली.
            तानुबाई बिर्जे या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या मानसकन्या होत्या. तानुबाई बिर्जे यांचा जन्म १८७६  मध्ये पुण्यात झाला. त्यांचे शिक्षण वेताळ पेठेतील महात्मा फुले यांच्या शाळेत झाले. तानुबाई यांचे वडील देवराव ठोसर हे महात्मा फुले यांचे सहकारी आणि शेजारी होते. त्यामुळे सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्या सहवासात तानुबाई यांचे  जीवन गेल्यामुळे सत्यशोधक चळवळीचे विचार त्यांच्याकडे होते. तानुबार्इंनी संपादक म्हणून, त्यांच्यानंतर 'दीनबंधू'चा लौकिक वाढवला. त्यांनी त्या पत्रात विविध विषय हाताळले. त्या त्यांच्या अग्रलेखाची सुरुवात तुकोबांच्या अभंगाने करत. 
                      त्यांचा भर कृषी ,शिक्षण ,राजकारण समारंभ, मराठा व इतर जातींच्या परिषदा आणि विशेष करून ‘सत्यशोधक चळवळी’चे वृत्तांत यांवर असे. त्यांनी त्यासंबंधी स्फूट लेख व बातम्या छापण्यास सुरुवात केली. त्यात महत्त्वाच्या व्यक्तींचे मृत्यू, त्यांच्या कार्याची माहिती, अपघात ह्यांचाही उल्लेख असे. विशेष म्हणजे काही नोंदी परदेशांतील असत.
                 उदाहरणार्थ, ‘टायटॅनिक’च्या अपघाताची बातमी 'दीनबंधू'मध्ये आली होती ! त्याशिवाय महत्त्वाच्या ग्रंथांवर, नाटकांवर परीक्षणात्मक लिखाणही प्रसिद्ध केले जाई. तानुबार्इंनी संपादक म्हणून विविध विषय हाताळले. त्यामध्ये मराठा विद्यार्थ्यांचे संमेलन, 'सत्यशोधक समाजा’चे अधिवेशन, शिक्षण परिषदेतील ठराव व सूचना, बहुमतावर आधारित राज्य पद्धत, मुस्लिमांचे शिक्षण असे बहुविध विषय आणि त्यावरील चौफेर लेखन आढळते.
       २६ जानेवारी १८९३ रोजी पुण्यामध्ये वासुदेव लिंबाजी बिर्जे यांच्याशी तानुबाई् यांचा विवाह झाला. 
          १८९७ मध्ये दीनबंधू या वृत्तपत्राची जबाबदारी वासुदेव बिर्जे यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली.आणि १९०६ सालापर्यंत त्यांनी वृत्तपत्र चालवले .मात्र काही काळानंतर त्यांचा प्लेगच्या आजारामुळे मृत्यू झाला. पतीच्या जाण्यामुळे दिनबंधु वृत्तपत्र बंद पडते की काय असा प्रश्न पडू लागला होता. मात्र तानुबाई यांनी न डगमगता प्रबोधनाचे कार्य आणि दीनबंधू वृत्तपत्राची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. 
     तानुबाईंनी संपादक म्हणून आपल्या अग्रलेखातून समाजातील विषमतेवर प्रहार करून त्याची चिरफाड केली. बहुजनांच्या शिक्षणाचा विचार मांडला. नाविन्यपूर्ण विषय हाताळले.तानूबाईंची सामाजिक जाणीव  बहुजनांच्या उत्कर्षासाठी कार्य करण्याकडे होती. देशातील सामाजिक सुधारणांसाठी वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा विडाच जणू  तानुबाईंनी ऊचलला  होता.
         विसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या प्रबोधनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तानूबाईंची ओळख एक अत्यंत यशस्वी ,सक्षम संपादक म्हणून होती. तानुबाई चे नाव मराठी पत्रकारितेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले पाहिजे.
      तानुबाई बिर्जे या पहिल्या महिला पत्रकार यांनी सत्यशोधक पद्धतीने पत्रकारिता करत समाजात विचारांची देवाण-घेवाण करत बदल घडवला. एकीकडे तानुबाई यांची पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता यात खूप फरक आहे. महिला पत्रकारांची संख्या वाढली आहे. मात्र तानुबाई सारखी पत्रकारिता सत्यशोधक पद्धतीने सर्व महिला पत्रकारांनी करायला पाहिजे.
     अशा या सावित्रीबाई यांच्या शिष्येचे नाव अत्यंत यशस्वी व सक्षम अशा संपादिका म्हणून पत्रकारितेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहीले गेले पाहिजे.  
     🙏 पत्रकार दिनानिमीत्त तानुबाई बिर्जे यांना विनम्र अभिवादन  🙏
                लेखन ✒️
       डाॅ.सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

Wednesday, January 5, 2022

महिलांनी सावित्रीमाईचा जन्मदीन सनाप्रमाने साजरा करायला हवा - विनोदअण्णा भोसले

महिलांनी सावित्रीमाईचा जन्मदीन सनाप्रमाने साजरा करायला हवा - विनोदअण्णा भोसले 

गंगाखेड / सोनपेठ (दर्शन) :-

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचा जन्म झाला त्या कालावधीमध्ये मुलींना   शिक्षण तर सोडा साधं सन्मानाने जगण्याचा अधिकारही नव्हता.
 अशा बिकट  परिस्थितीत  समाज व्यवस्थेचा विरोध पत्कारून मुलींच्या सर्वांगीन विकासासाठी 1 जानेवारी 1848 ला पुणे येथे भिडेच्या वाड्यात महाराष्ट्रात पहिली शाळा सुरू केली. यासाठी आजच्या मुलींनी व महिलांनी सावित्रीमाईचा जन्मदीन सणाप्रमाने साजरा करायला हवा असे प्रतिपादन मार्गदर्शन प्रसंगी व्याख्याते विनोदअण्णा भोसले यांनी व्यक्त केले.
खडक पुरा गल्ली गंगाखेड येथील महीला बचत आयोजीत  दि.3 जानेवारी 2022  रोजी सकाळी 11 वाजता क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. वर्षाताई गोविंदराव यादव तर प्रमूख पाहुण्या म्हणून मनपा च्या प्रकल्प अधिकारी सौ अंजनाताई सदाशिवराव कुंडगीर व सामाजिक कार्यकर्ते  सखाराम बोबडे, सतिश सोनुने,प्रल्हाद मोहिते, पांडुरंग काळदाते आदिंची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना व्याख्याते विनोदअण्णा भोसले म्हणाले की, आज महिलानी राजकारणात ग्रामपंचायत सरपंच पदा पासून ते देशाच्या पंतप्रधान, राष्ट्रपती व सरकारी नोकरीत शाळेच्या शिक्षीका ते  जिल्हाधिकारी पदा पर्यंत गगन भरारी घेतली आहे याचं  पुर्ण श्रेय क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांना जाते. हे आज आपण विसरता कामा नये.
 पुणे शहरात असलेल्या दगडुशेठ हलवाई च्या गणपती दर्शनास महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून महिला व पुरुष  जातात पण क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी उभारलेल्या पहिल्या शाळेला भेट देण्यासाठी कोणी जात नाही. यासारखं दुर्दैव महाराष्ट्रात कोणत नसेल असं मला वाटतं.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सौ रेखा मधुकर शिंदे यांनी केले
सदरील कार्यक्रमास खडक पुरा गल्लीसह गंगाखेड शहरातील महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे तसेच सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास आपण कटिबद्ध-प्रा. डॉ. विनोद जगतकर

ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे तसेच सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास आपण कटिबद्ध-प्रा. डॉ. विनोद जगतकर



परळी वैजनाथ / सोनपेठ (दर्शन)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे बीड जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. विनोद जगतकर सर यांचा वाढदिवस आज बुधवार दिनांक 5 जानेवारी 2022 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यातील विविध स्तरातून शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव करण्यात आला.

आज बुधवार दिनांक 5 जानेवारी रोजी कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात परळी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व नगरपरिषदेचे लोकप्रिय शिक्षण सभापती गोपाळ आंधळे, शिवसेनेचे जेष्ठ नेते रमेश आण्णा चौंडे, दैनिक बीड चौफेर चे संपादक बालाजी ढगे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे बीड जिल्हा अध्यक्ष तथा माजी नगरसेवक, फुले-शाहू-आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते , सामाजिक कार्यकर्ते, उच्च विद्याविभूषित प्रा डॉ विनोद जगतकर सर यांचा आज वाढदिवस परळी शहर व परिसरात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ तसेच पेढा भरून साजरा करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी शिक्षण सभापती गोपाळ आंधळे, ज्येष्ठ नेते रमेश आण्णा चौंडे, दैनिक बीड चौफेर चे संपादक बालाजी ढगे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते राज जगतकर, प्रताप समिंदरसवळे, रावसाहेब जगतकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
 आज सकाळपासूनच राज्यभरातून प्रा डॉ जगतकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. मोबाईल फोन, व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर आदी सोशल मिडीया वर तसेच प्रत्यक्ष भेटून कार्यकर्त्यांनी काल रात्री पासूनच शुभेच्छा देण्यास सुरुवात केली होती. 
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना. धनंजय मुंडे साहेब यांच्यासह विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच वकील, डॉक्टर, इंजिनिअर, आदींनी प्रा. विनोद जगतकर यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान दैनिक बीड नेताचे  तालुका प्रतिनिधी बालाजी ढगे यांच्याशी संवाद साधताना विनोद जगतकर म्हणाले की ना. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे तसेच सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास आपण कटिबद्ध राहू असे ते म्हणाले.

Tuesday, January 4, 2022

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (अनाथांची माय) यांचें निधन पुणे /. परभणी / सोनपेठ (दर्शन) :-


ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (अनाथांची माय) यांचें निधन



पुणे  /. परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

मायीचें आज दि.4 जानेवारी 22 मंगळवार रोजी रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी पुण्यात निधन झालंय. त्यांच्यावर गेले काही दिवस पुण्यात उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
2021मध्ये भारत सरकारने त्यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव केला होता.
सिंधुताई सपकाळ यांनी 1994 साली पुण्यातील पुरंदर तालुक्यात अनाथ मुलांसाठी 'ममता बाल सदन' नावाची संस्था स्थापन केली.अनाथ मुलांसाठी त्यांनी केलेल्या कामांमुळे महाराष्ट्रासह देशभरात त्या 'अनाथांची माय' म्हणून परिचित झाल्या.
सिंधुताई सपकाळ या गेली 40 वर्षे सामाजिक कार्य करत होत्या. त्यांना आजवर 750 हून अधिक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. अनाथ मुलांना आईसारखी माया देणाऱ्या सिंधुताई 'मी हजारहून अधिक मुलांची आई आहे' असं अभिमानाने सांगत.
सिंधुताई सपकाळ यांना गेल्या वर्षीच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. अनाथ लेकरांची आई म्हणून अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक असलेल्या सिंधुताईंचा जीवनप्रवास अतिशय खडतर होता. अनाथ मुलांना सांभाळणाऱ्या सिंधुताई सपकाळ याचं वक्तृत्वावरही चांगलं प्रभुत्व होतं. कार्यक्रमांमध्ये त्यांना ऐकण्यासाठी अनेकदा मोठी गर्दी जमायची. त्यांना माई म्हणून ओळखलं जात होतं. भाषणांदरम्यान स्वतःच्या जीवनाची कर्मकहाणी सांगतानाच अस्खलित ऊर्दूतील शेर आणि मराठी कवितांच्या ओळी यांच्या माध्यमातून त्या मनं जिंकून घेत.