पुराचा कायम धोका असलेल्या देवडी गावचे पुनर्वसन करा - एस.एम.देशमुख यांची मागणी
दोन नद्यांच्या मध्ये असलेल्या आणि नद्यांना थोडा जरी पूर आला तरी संपर्क तुटणारया देवडी गावचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी गावचे भूमीपूत्र आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख आणि पंचायत समिती माजी सदस्य मच्छिंद्र झाटे यांनी मुख्यमंत्री, पुनर्वसन मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार तसेच जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
गावच्या पुर्वेला खडकाळी नदी आणि पश्चिमेला राणुबाईची नदी आहे.या दोन्ही नद्यांचा संगम गावच्या उत्तरेला जवळच होतो. त्यामुळे गावची अवस्था कात्रीत सापडलयासारखी होते.पश्चिमेकडून गावात येण्यासाठी रस्ता नाही.पुर्वेकडून गावात येण्यासाठी अत्यंत कमी उंचीचा आणि जीर्ण झालेला पुल आहे.गावाशी संपर्क याच पुलाच्या माध्यमातून प्रस्थापित होतो.मात्र खडकाळी नदीला थोडा जरी पूर आला तरी पुल पाण्याखाली जातो आणि गावाचा बाह्य जगाशी असलेला संपर्क तुटतो.दरवर्षी सातत्यानं गावचा संपर्क तुटण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊनच जगावे लागते.. सोमवारी आणि मंगळवारी वडवणी तालुक्यात ढगफुटी झाल्याने दोन्ही नद्यांना महापूर आले.गेल्या पंचवीस वर्षात असे पूर आले नव्हते.त्यामुळे मंगळवारी दुपारी १२ पासून बुधवारी सकाळी ९ वाजेपर्यंत गावचा संपर्क तुटलेला होता..या काळात कोणी आजारी पडले तर त्याला उपचार मिळू शकत नाहीत.. दरवर्षी येणारे हे संकट एखादे वेळेस गावकरयांच्या जिवावर बेतू शकते.देवडी गावावर चे संकट कायमस्वरूपी दूर करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे गावचे पुनर्वसन करणे हाच आहे. सरकारने त्या दृष्टीने प्रयत्न करावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.. निवेदनावर तुळशीराम राऊत, बाबासाहेब झाटे, गोरख पैठणे, लक्ष्मण झाटे, परमेश्वर राऊत, यांच्यासह शंभरावर गावकरयांच्या स्वाक्षरया आहेत.

No comments:
Post a Comment