Monday, September 6, 2021

परभणी महापालिकेची निवडणूक लढवणार - रोहित जगदाळे पाटील

परभणी महापालिकेची निवडणूक लढवणार - रोहित जगदाळे पाटील


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
राज्य निवडणूक आयोगाने येणाऱ्या महापालिका निवडणुका संदर्भात कच्चा आराखडा तैयार करण्याच्या सूचना राज्यातील महापालिकांना दिलेल्या आहेत.परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी ही येत्या काही महिन्यात उडणार असल्याचे बोलले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपा कामगार आघाडी चे जिल्हाध्यक्ष रोहित जगदाळे पाटील यांनी "पक्षाने आदेश देताच मी पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून, निवडणूक लढवणार आहे" अश्या प्रकारचे मत सा.सोनपेठ दर्शन शी बोलताना व्यक्त केले.
"गेल्या ११ वर्षांपासून मी सार्वजनिक जीवनात अगदी स्थानिक पातळी पासून दिल्ली पर्यंत सक्रिय राहिलो आहे. साडेतीन वर्ष झाली पक्षात सक्रिय रित्या काम केलं आहे.
अनेक मुद्द्यांवर आंदोलन केली, विविध सामाजिक उपक्रम राबवले, संगठनेत काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी आहे, स्वतःला वाहून घेऊन आजवर कार्य केल, शिवाय माझे सर्व आयुष्य माझ्या वार्डात गेल्याने जुन्या व नव्या मित्रपरिवाराशी, स्नेहीजनांशी
दांडगा संपर्क आहे. वार्डातील जनतेचा आणि पक्षातील सर्व पक्ष श्रेष्ठींचा आशीर्वाद आणि विश्वास आपल्या पाठीशी आहे. मी आजवर पक्षाकडे काहीही मागितलेले नाही. परंतु आजवर केलेल्या कार्याचा लेखाजोखा पक्षाकडे मांडणार असून पक्षा कडून निवडणूक लढविणार आणि जिंकून येणार असा विश्वास रोहित जगदाळे पाटील यांनी सा.सोनपेठ दर्शन शी बोलताना व्यक्त केला.

No comments:

Post a Comment