Thursday, September 16, 2021

धनंजय स्वामी यांनी साकारला महाबळेश्वर येथील प्राचीन कृष्णाई महादेव मंदिर स्वामी गनपतीस देखावा

धनंजय स्वामी यांनी साकारला महाबळेश्वर येथील प्राचीन कृष्णाई महादेव मंदिर स्वामी गनपतीस देखावा


परळी / सोनपेठ (दर्शन) :-

परळी वैजनाथ येथील जंगम गल्लीतील धनंजय स्वामी यांचा स्वामी गणपती २०२१
धनंजय स्वामी यांनी साकारला महाबळेश्वर येथील प्राचीन कृष्णाई महादेव मंदिर स्वामी गनपतीस देखावा,संकल्पना अशी की दैवी वरदहस्त लाभलेले थंड हवेचे महाबळेश्वर येथील प्राचीन कृष्णाई महादेव मंदिर या मंदिराचा इतिहास असा आहे की, इ.स १२१५ मध्ये राजे ऋग्वेद यांनी महाबळेश्वर येथील कृष्णा नदीच्या काठावर झऱ्याचे उगम स्थान असलेल्या ठिकाणी छोटेसे मंदिर व जलाशय  बांधलेले आहे. तीनही बाजूनी नक्षीदार, कोरीव, दगडी खांबावर मंदिर उभारलेले असून मध्यभागी  जलाशय (बारव) आहे.येथून कृष्णा नदीचा उगम होतो .
मंदिर अगदी हुबेहूब साकारले असून यात मध्यभागी जलाशयाच्या काठावर आरामदेही आसनस्थ एक हात स्वचरणावर ठेवलेली  शांत,संयमी गणेश मूर्ती विराजमान केली आहे. बाप्पाच्या पायाशी असलेल्या गोमुखातून अखंडित जलधारा  समोरील जलकुंडात पडत आहे नुकत्याच श्रावणसरी बरसल्यामुळे मंदिराचा ओलसरपणा सौन्दर्यात आणखीनच भर टाकतो  आल्हाददायक शांत जलप्रवाहाचा खळखळाट अशा रम्य वातावरणात जणू गणपती बाप्पा निसर्गाचा आनंद घेत आहेत.देखावा पाहताना प्रत्यक्ष पुरातन मंदिरात असल्याचा भास निर्माण होतो. अत्यंत सुंदर मनमोहक असा मनाला  भुरळ पाडणारा असा देखावा झाला आहे .देखाव्यास अनुरूप अशी श्रींची मुर्ती पर्यावरण पूर्वक शाडू मातीची खास बनवुन घेतली. या स्वामी गणपती 2021 कलाकृती निर्माते कलाकार धनंजय स्वामी यांचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.

No comments:

Post a Comment