ऊखळी बु.येथिल ईश्वर शिवाजी मुजमले या युवकाचा इतरांनी आदर्श घ्यावा - संपादक
कैलास डुमणे
मराठवाडा साथीच्या वतीने सत्कार
पावसाने गेल्या आठवड्यात संपूर्ण मराठवाड्यात थैमान घातले होते.अनेक नद्यांना महापूर आला होता.सोनपेठ तालुक्यातील ऊखळी बु.या गावातून बोरणा नदी तुडुंब भरून वाहत होती.दरम्यान,त्या महापूरात गावातील एक वृध्द आजीबाई वाहत असल्याचे निदर्शनास येताच,गावातील ईश्वर शिवाजी मुजमले या युवकाने त्या वृद्ध आजीचे प्राण वाचवले होते.त्यांच्या या कार्याबद्दल पाथरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ.सुरेश वरपुडकर यांनीही सत्कार केला होता.ईश्वर शिवाजी मुजमुले परळी वैजनाथ येथे आले असता,'दैनिक मराठवाडा साथी ' च्या वतीने त्यांचा कार्यालयात शाल, श्रीफळ, पुष्पहार व 'विचारधन' पुस्तक देऊन, संपादक सतीश बियाणी,सा.रणधुमाळीचे संपादक कैलास डुमणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.स्वताचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याचा जीव वाचवणे क्वचितच ऐकायला मिळते.अशा युवकांचा सत्कार आपणच केला पाहिजे.ज्यामुळे युवकांना समाजकार्याची आवड निर्माण होईल.असे, गौरवोद्गार बहुजन चळवळीचे युवा नेते धम्मा भाऊ क्षिरसागर यांनी कार्यक्रमप्रसंगी काढले.तसेच,समाजात अशा युवकांची गरज आहे.प्रत्येक युवकांनी ईश्वर शिवाजी मुजमले या युवकाचा आदर्श घ्यायला हवा.असे,यावेळी सा.रणधुमाळीचे संपादक कैलास डूमणे म्हणाले.'दै.मराठवाडा साथी'चे संपादक सतीश बियाणी यांनी अभिनंदन केले.या कार्यक्रमाला पत्रकार राजकुमार कदम,केशव कांबळे,अजय रायभोळे, राजेश सरवदे,विनोद रोडे,भिमा कसबे, विनोद भुमरे,शुभम चव्हाण आदिंची उपस्थिती होती.

No comments:
Post a Comment