पालकमंत्री नवाब मलिक यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार दि.16 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजता हदगाव (न) येथे आगमन व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. दुपारी 4 वाजता ढेंगळी पिंपळगाव ता.सेलू येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. सायंकाळी 4.45 वाजता कोल्हा ता.मानवत येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करतील. सायंकाळी 5 वाजता परभणीकडे प्रयाण. सायंकाळी 6 वाजता आगमन व राखीव. सायंकाळी 6.30 वाजता जिंतूर व सेलू तालुक्यातील पिक कर्ज तसेच जिल्हा परिषद व इतर शासकीय योजनांच्या कर्ज वाटपासंदर्भात सर्व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक (स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी). सायंकाळी 6.45 वाजता सहारा एज्युकेशन ॲण्ड वेलफेअर फाऊंडेशन परभणी यांच्यावतीने सहारा गौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रम (स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी). सायंकाळी 7 वाजता अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत व इतर महत्वाचे मुद्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यासमवेत आढावा बैठक (स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी). रात्री 8.30 ते 9.30 वाजता राखीव व सोईनुसार परभणी येथे मुक्काम करतील.
शुक्रवार दि.17 सप्टेंबर 2021 सकाळी 8.40 वाजता राजगोपालाचारी उद्यानाकडे प्रयाण. सकाळी 8.45 वाजता राजगोपालाचारी उद्यान येथे आगमन व मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना सलामी, पुष्पचक्र अर्पण व ध्वजारोहन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 9.30 वाजता परभणी येथून आहेरवाडी ता.पुर्णाकडे प्रयाण. सकाळी 10.15 वाजता आहेरवाडी येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. सकाळी 10.45 वाजता माटेगाव ता.पुर्णा येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. सकाळी 11.45 वाजता जवळा ता.पालम येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. दुपारी 12.45 वाजता मरडसगाव ता.गंगाखेड येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. दुपारी 1.45 वाजता आनंदवाडी ता.गंगाखेड येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. दुपारी 2 वाजता भिसेगाव ता. सोनपेठ येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. दुपारी 2.30 ते 3.30 वाजता राखीव. दुपारी 3.30 वाजता भिसेगाव येथून औरंगाबादकडे प्रयाण करतील.

No comments:
Post a Comment