Wednesday, September 29, 2021

श्रीमद रंभापुरी जगद्गुरू चे 30 वा दसरा मोहसव समारंभ

श्रीमद रंभापुरी जगद्गुरू चे 30 वा दसरा मोहसव समारंभ 

सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील श्री.ष.ब्र.नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांचे आवाहन प्रती वर्षा प्रमाणे याही वर्षी दिनांक 7 आक्टोंबर 2021 ते  दिनांक 15 आक्टोंबर 2021 पर्यंत चालणारा श्रीमद रंभापुरी जगद्गुरू चे 30 वा दसरा मोहसव समारंभ यावर्षीही कोरोना महामारी चे नियम पाळून धुमधडाक्यात कार्यक्रम संपन्न होणार आहे, याप्रसंगी विविध शिवाचार्य लोकांचे प्रवचन व रोज इस्टालिंग महापूजा व जगद्गुरू चे आशीर्वचन व विविध क्षेत्रातील मान्यवर लोकांचे मार्गदर्शन लाभणार आहे या कार्यक्रमाचे स्वागत व गौरव अध्यक्ष व्ही वाय रागवेंद्र खासदार शिवमोगा कर्नाटक या कार्यक्रमाचे स्थळ श्रीगुरु रेवणसिद्धेश्वर,पुण्य आश्रम कड्डे नंदी हल्लीई ग्राम शिखरपूर तालुका जिल्हा शिवामोगा.असुन सर्व शिवभक्तांनी आपल्या अमुल्य वेळातुन वेळ काढून श्रीमद रंभापुरी जगद्गुरू चे 30 वा दसरा मोहसव समारंभ चे श्रवणीय कार्येक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.ष.ब्र.नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांनी केले आहे.
 

Monday, September 27, 2021

अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखालील प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यासाठी दक्षता घ्यावी

अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखालील प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यासाठी  दक्षता घ्यावी

परभणी / सोनपेठ (दर्शन) : - 

जिल्ह्यातील अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखालील अत्याचाराच्या प्रकरणात पीडितांना गुन्हे दाखल करण्यासाठी लागणारी जात प्रमाणपत्रे लवकरात लवकर देण्यासाठी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले जातील. तरी अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली दाखल असलेली प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यासाठी चार्जशिट दाखल होईपर्यंत समाज कल्याण विभागाने पाठपुरावा करण्याची दक्षता घ्यावी. असे आवाहन परभणीचे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले. 
 जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात  सोमवार दि.27 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 12 वाजता संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.यावेळी समितीचे अशासकीय सदस्य प्रभाकर सिरसाट,प्रल्हादराव अवचार,अतिरिक्त पोलिस अधिक्षक अविनाश कुमार,निवासी आरोग्य अधिकारी  डॉ.किशोर‍ सुरवसे, समाज कल्याणचे निरीक्षक एस.डी.चित्तेकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. वडदकर यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र हस्तगत करण्यावर तपासावर असलेल्या गुन्ह्याचा गोषवारा जाणून घेत न्यायालयात न्यायप्रविष्ट असलेल्या अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखालील प्रकरणांचा आढावा घेवून योग्य त्या सुचना केल्या.  
 बैठकीच्या प्रांरभी अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली माहे ऑगस्ट 2021 मध्ये एकुण 13  गुन्हे दाखल  झाले असून त्यापैकी 13 गुन्हे पोलिस तपासावर आहेत.तर माहे ऑगस्ट 2021 अखेर एकुण 89 गुन्हे पोलिस तपासावर आहेत.सन 2021-22 या आर्थिक वर्षात 1 कोटी 13 लक्ष तरतूद प्राप्त झाली असून सन 2019 मधील 12 प्रकरणातील 19 पीडितांना,वर्ष 2020 मधील 53 प्रकरणातील 81पीडितांना तसेच वर्ष 2021 मधील 47 प्रकरणातील 54 पीडित असे एकुण 112 प्रकरणातील 170 पीडितांना अर्थसहाय्य वाटप करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.अशी माहिती समाज कल्याणचे निरीक्षक एस.डी.चित्तेकर यांनी यावेळी दिली. 

Sunday, September 26, 2021

विजेच्या कडकडाटासह पाऊसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी

विजेच्या कडकडाटासह पाऊसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी



परभणी / सोनपेठ (दर्शन) : - 

मुंबई येथील कुलाबा प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दि. 24 सप्टेंबर 2021 रोजी दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात दि.27 व 28 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तरी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. असे आवाहन परभणीचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव महेश वडदकर यांनी केले आहे.
              प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दि. 24 ते 28 सप्टेंबर 2021 या कालावधीत औरंगाबाद विभागातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याची सुचना निर्गमित केली आहे. ज्यामध्ये परभणी जिल्ह्याचा समावेश आहे.  त्यानुसार दि . 27 व 28 सप्टेंबर रोजी परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे तसेच नदीकाठच्या परिसरातील गावाच्या लोकांनी सतर्क राहावे, नदी पात्रात कोणीही उतरु नये, वाहने, पशुधन इत्यादी सुरक्षित स्थळी ठेवण्यात यावे. सर्व पुरप्रवण क्षेत्रातील गावांना सावधानतेचा इशारा देण्याबाबत सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. असेही जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

            

Saturday, September 25, 2021

हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा महाधन कंपनीच्या वतीने सत्कार

हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा महाधन कंपनीच्या वतीने सत्कार




सेलू  / सोनपेठ (दर्शन) :-

हवामानाचा अंदाज अचूक नोंदवणारे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा सत्कार परभणी जिल्ह्यातील सेलू च्या गुगळी धामणगाव येथे महाधन कंपनीच्या वतीने करण्यात आला.गेल्या पंचवीस वर्षांपासून हवामानाचा अभ्यास करत पावसाबाबत अचूक अंदाज व्यक्त करण्यात ज्यांचा हातखंडा आहे असे पंजाबराव डख यांची महाधन कंपनीच्या वतीने मराठवाडा विभाग विपणन व्यवस्थापक संतोष कदम सह  प्रशांत हावळे, वैभव दळवी यांनी भेट घेत सत्कार केला. पंजाबराव डख यांच्या अचूक अदाजा मुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पावसाबाबत चे अचूक संकेत मिळत आहेत.यामुळे शेती जोपासताना शेतकऱ्यांना मोठा फायदा असुन शेतकरी वर्गात डख हे लोकप्रिय होत आहेत, शेतकऱ्यांसाठी महाधन कंपनीचेही मोठे योगदान असून या कंपनीचे खते महाराष्ट्रात सर्वाधीक विक्री होतात. शेतकऱ्यांच्या  विकासासाठी बांधील असलेल्या महाधन कंपनीने बळीराजाचे हितच जोपासले आहे. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या डख यांच्या अचूक हवामान अंदाज पद्धतीमुळे त्यांच्या या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते असे मराठवाडा विपणन व्यवस्थापक संतोष कदम यांनी याप्रसंगी सांगितले.

आ.सुरेशराव वरपुडकर यांच्या वतीने दिव्यांगांसाठी तपासणी शिबीर !

आ.सुरेशराव वरपुडकर यांच्या वतीने दिव्यांगांसाठी तपासणी शिबीर !



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

पाथरी विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.सुरेशराव वरपूडकर यांच्या वतीने पाथरी विधानसभा मतदार संघातील दिव्यांगांना मोटाराईज ट्रायसायकल वाटपासाठी अस्थिव्यंग असणाऱ्या दिव्यांगांसाठी दी.२७.०९.२०२१ रोजी सकाळी ११ ते सायं.०४ यावेत आ.सुरेशराव वरपुडकर यांचे निवासस्थान नक्षत्र, विष्णुनगर, वसमत रोड, परभणी येथे मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.ज्यांचे दिव्यांगत्वाचे प्रमाण ८०% किंवा त्या पेक्षा अधिक असेल आशा दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांग प्रमाणपत्राची सत्यप्रत, आधार कार्डची सत्यप्रत, रेशन कार्ड, डि.आर.डि.प्रमाणपत्र किंवा उत्पन्न प्रमाणपत्राची सत्यप्रत या कागदपत्रांसह आपल्या तपासणी साठी नाव नोंदणी करून घ्यावी.


Thursday, September 23, 2021

महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यचे सुपुत्र एअर मार्शल विजय चौधरी नवे वायुदल प्रमुख

महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यचे सुपुत्र एअर मार्शल विजय चौधरी नवे वायुदल प्रमुख 



नवी दिल्ली / परभणी / सोनपेठ (दर्शन) : - 

नांदेड जिल्हयाचे सुपुत्र एअर मार्शल विजय चौधरी हे ३० सप्टेंबर २०२१ रोजी भारतीय वायुदलाचे प्रमुख  म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
 
  संरक्षण मंत्रालयाने देशाचे नवे वायुदल प्रमुख म्हणून विद्यमान उपप्रमुख एअर मार्शल विजय चौधरी यांच्या नावाची नुकतीच घोषणा केली आहे. वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदोरिया हे ३० सप्टेंबर २०२१ रोजी सेवानिवृत्त होत असून  एअर मार्शल चौधरी  त्यांच्याकडून पदाची सूत्र स्वीकारतील.

              एअर मार्शल विजय चौधरी हे मुळचे नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्याच्या हस्तरा येथील आहेत. त्यांनी  नांदेड येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले  व पुढे  पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीतून शिक्षण पूर्ण करून २९ डिसेंबर १९८२ रोजी वायुसेनेच्या फायटर स्ट्रीममध्ये रूजू झाले. 

             वायुदलाच्या उपप्रमुख पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी एअर मार्शल विजय चौधरी यांनी  लडाखसह उत्तर भारतातील हवाई हद्दीची जबाबदारी असलेल्या वायुदलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर इन चीफ म्हणून कार्य केले आहे. वायुदलात  त्यांनी कमांड, स्टाफ आणि निर्देशात्मक जबाबदाऱ्या  सांभाळल्या आहेत. ‘मिग’ आणि ‘सुखोई’ ही लढाऊ विमाने उडविण्याचा ३८०० तासांचा त्यांना अनुभव आहे. वायुदालातील त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी 2004 मध्ये वायुदल पदक, विशिष्ट पदक, २०१५ मध्ये अतिविशिष्ट सेवा पदक आणि २०२१ मध्ये परम विशिष्ट सेवा पदकाने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.                


जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम


परभणी / सोनपेठ (दर्शन) : - 

राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
        शुक्रवार दि.24 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 ते 11.45 वाजेदरम्यान परभणी जिल्हा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यासमवेत आढावा बैठक (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी). सकाळी 11.45 ते दुपारी 12.15 वाजेदरम्यान परभणी ग्रामीण जिल्हा कार्यकारीणी बैठक (स्थळ: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, परभणी). दुपारी 12.15 वाजता परभणी येथून जिंतूरकडे प्रयाण. दुपारी 1.45 वाजता जिंतूर येथे आगमन. दुपारी 1.45 ते 2.15 वाजता राखीव. दुपारी 2.15 ते 3 वाजता जिंतूर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक (स्थळ : शर्मा मंगल कार्यालय, जिंतूर). दुपारी 3 वाजता मोटारीने जिंतूर येथून पाथरीकडे प्रयाण करतील. सायंकाळी 4.15 ते 5 वाजेदरम्यान पाथरी येथे आगमन व पाथरी विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक (स्थळ:दुर्राणी पेट्रोल पंप, पाथरी). सायंकाळी 5 वाजता पाथरी येथून परतुरकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम



परभणी / सोनपेठ (दर्शन) : -
राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
        गुरुवार दि.23 सप्टेंबर 2021 रोजी नांदेड येथून सायंकाळी 6.50 वाजता परभणी येथे आगमन. सायंकाळी 7 ते 8 वाजेदरम्यान रा.कॉ.पा प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत परभणी शहर जिल्हा कार्यकारीणी बैठकीस उपस्थिती.  सायंकाळी 8 ते 9 वाजेदरम्यान रा.कॉ.पा प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत परभणी विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. राखीव व मुक्काम करतील.
         शुक्रवार दि.24 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता ते 11.45 वाजता परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट, सकाळी 11.45 ते 12.30 वाजता रा.कॉ.पा प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत परभणी ग्रामीण जिल्हा कार्यकारणी बैठकीस उपस्थिती. दुपारी 1 वाजता परभणी येथून जिंतूरकडे प्रयाण करतील. दुपारी 2 वाजता जिंतूर येथे आगमन व दुपारी 2 ते 2.30 वाजेदरम्यान राखीव. दुपारी 3.15 वाजता जिंतूर येथून पाथरीकडे प्रयाण करतील. दुपारी 4.30 वाजता पाथरी येथे आगमन.  दुपारी 4.30 ते 5.15 वाजेदरम्यान रा.कॉ.पा प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत पाथरी विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 5.15 वाजता पाथरी येथून परतूरकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-

Wednesday, September 22, 2021

महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यासाठी अध्यादेश काढणार

महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यासाठी अध्यादेश काढणार



मुंबई / औरंगाबाद / परभणी / सोनपेठ (दर्शन):-

 राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदा, नगरपंचायतीमध्ये बहुसदस्यीय प्रभागाची तरतूद पुन्हा लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या संदर्भातील अध्यादेश प्रख्यापित करण्यासाठी राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात येईल.  
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करुन, राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये एक सदस्यीय प्रभाग पध्दती लागू करण्यात आली होती. तथापि, कोवीड-19 दरम्यान निर्माण झालेली आरोग्य विषयक परिस्थिती हाताळताना निदर्शनास आलेल्या बाबी तसेच लोकप्रतिनिंधींनी निदर्शनास आणलेली वस्तुस्थिती यामुळे नागरी समस्यांचे निराकरण, जबाबदारी पारपाडणे निर्वाहन हे प्रभागात सामुहिक प्रतिनिधित्वांमुळे (बहुसदस्यीय प्रभाग पध्दती) अधिक उचित पध्दतीने होऊ शकते या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील संबंधित कलमात सुधारणा करुन महानगरपालिकांसाठी बहुसदस्यीय प्रभागाची तरतूद पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार, महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रत्येक प्रभागातून शक्य असेल तेथवर तीन पालिका सदस्य, परंतु, दोन पेक्षा कमी नाहीत व चार पेक्षा अधिक नाहीत इतकी सदस्य संख्या निर्धारित करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली.
नगर विकास विभाग नागरी स्थानिक संस्थामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठीचे  
आरक्षण 27 टक्क्यांपर्यंत ठेवण्यासाठी अध्यादेश काढणार
नागरी स्थानिक संस्थामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठीचे  आरक्षण 27 टक्क्यांपर्यंत ठेवण्यास आणि एकूण आरक्षणाचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाही अशी सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्याप्रमाणे अध्यादेश प्रख्यापित करण्यासाठी राज्यपालांकडे पाठविण्यात येईल.
मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम 5(A)(4), महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 5(A)(1)(C) व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगि‍क नगरी अधिनियमातील कलम 9(2)(D) मध्ये सुधारणा करुन नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी असणारे 27 टक्के हे स्थिर (Static)  प्रमाण बदलून नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठीचे आरक्षण 27 टक्क्या पर्यंत ठेवण्यास एकुण आरक्षणाचे प्रमाण 50 टक्के पेक्षा अधिक होणार नाही अशी सुधारणा करण्यात येईल.
प्रस्तावित अधिनियमात सुधारणा आरक्षणाचे एकूण प्रमाण 50 टक्के पेक्षा अधिक नसावे तसेच नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सर्वच नागरी स्थानिक संस्थांमध्ये सरसकट 27 टक्के नसावे हा मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आशय विचारात घेऊन करण्यात आली आहे.

Saturday, September 18, 2021

प्रेम पन्ना अपार्टमेंट श्री गणेश मंडळ परळी येथे अष्टविनायक दर्शन

प्रेम पन्ना अपार्टमेंट श्री गणेश मंडळ परळी येथे अष्टविनायक दर्शन

परळी / सोनपेठ (दर्शन) :-

परळी वैजनाथ येथील प्रथमच प्रेम पन्ना अपार्टमेंट च्या नागरिकांनी तसेच गल्लीतील नागरिकांनी 25 परीवारांनी मिळून प्रेम पन्ना अपार्टमेंट श्री गणेश मंडळाची स्थापना केली परंतु याठिकाणी अप्रतिम देखावा " अष्टविनायक दर्शन" निर्माण करण्यासाठी दोन महिन्यापासूनचा कालावधी लागला श्री ची मूर्ती ही मुंबई येथून विना कलरची खरेदी केली कलरिंग परळी येथे करण्यात आली अशी श्री गणेशाची मुर्ती बीड जिल्ह्यातील कोणत्याही मंडळाकडे पहावयास भेटणार नाही तसेच विशेष महत्त्व असे "अष्ठविनायकाचे हुबेहूब दर्शन" अद्वितीयच एकदा प्रत्यक्ष पाहून दर्शनाचा लाभ घेतल्यास त्याची महंती कळते म्हणून दिनांक 20 सप्टेंबर 2021 पर्यंत आपन आपल्या इष्ट मित्र परीवारासह या प्रेम पन्ना अपार्टमेंट श्री गणेश मंडळाची तमाम श्री गणेश भक्तांना व नागरिकांनी या अष्टविनायकांचे दर्शन सर्वांना लाभ व्हावा यासाठी नजरे समोर ठेवण्यात आलेले आहेत.सा.सोनपेठ दर्शन संपादक किरण रमेश स्वामी यांनी एक वेळेस भेट दिली तर प्रत्येक्षात अष्टविनायक महाराष्ट्र दर्शन लाभल्याचा अनुभव आला म्हणून दोन दिवसांत केवळ पाच मिनिटे वेळ काढायला हरकत नाही गनपती बप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या चार जय घोष आपसुकच ओठांवर खेळतांना प्रत्येकाच्या दिसून येत आहे.

Thursday, September 16, 2021

हैद्राबादची निजामशाही - “ मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन” !

हैद्राबादची निजामशाही - “ मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन” ! 
     
 
       17 सप्टेंबर म्हटले की, आपण लगेच नाव उच्चारतो “ मराठवाडा मुक्तिसंग्राम” ! आपल्या अज्ञानाची सुरुवातच मुळी याठिकाणाहून होते. कारण तो मराठवाडा मुक्तिसंग्राम नसून हैद्राबाद मुक्तिसंग्राम आहे. 1724 ते 1948 अशी सलग 224 वर्षे आपल्या भागावर हैदराबादच्या निजामाची सत्ता होती. मग हा निजाम म्हणजे कोण ? हेही माहीत असले पाहिजे. त्यानुसार निजाम हे काही कुठल्या व्यक्तीचे नाव नसून ती एक पदवी आहे. दिल्लीच्या मोगल बादशाहने आपला दक्षिणेचा सुभेदार मीर कमरुद्दीन खानाला निजाम उल मुल्क ही पदवी दिली होती. त्यामुळे त्याला निजाम म्हटले गेले. वास्तविक पाहता 200 वर्षात एकूण सात जणांनी निजामशाहिचा कारभार केला. आणि त्या प्रत्येकाने स्वत:ला निजाम ही पदवी लावली. त्यामुळे निजाम हे कोण्या एका व्यक्तीचे नाव नसून ती एक पदवी आहे. 
         निजाम या शब्दाचा अर्थ होतो व्यवस्थापक ! मुल्क म्हणजे जमीन किंवा परिसर. आणि त्यानुसार परिसराची व्यवस्था पाहणारा म्हणजेच निजाम. त्यानुसार दिल्लीच्या मोगल बादशहाचा दक्षिणेतील एक महसुली अधिकारी म्हणजेच निजाम. 1724 ला मोगलांचा  सुभेदार म्हणून काम करताना पहिला निजाम  मीर कमरुद्दीन खानाने औरंगाबाद याठिकाणी स्वत:ची स्वतंत्र गादी निर्माण केली. 1767 नंतर निजामाने आपला कारभार हैद्राबाद येथून चालवायला सुरुवात केली. निजाम हा धर्माने मुस्लीम असलातरी त्याच्याकडे अनेक नामांकित हिंदू सरदारांनी शेवटपर्यन्त चाकरी केलेली आहे. त्यात छत्रपती संभाजीच्या बहीणीचे नातू रावरंभा निंबाळकर, सेनापती धनाजी जाधवाचे पुत्र चंद्रसेन जाधव, फलटणच्या निंबाळकरांचे वारसदार सुलतानजी निंबाळकर, औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापून आणणार्‍या हिम्मतबहाददूर विठोजी चव्हाणांचे चिरंजीव उदाजी चव्हाण यासारख्या दिग्गजांचा समावेश होतो. 
           15 ऑगस्ट 1947 म्हणजेच स्वातंत्र्यापर्यन्त भारतात निजामासारखी जवळपास 565 संस्थाने होती. स्वातंत्र्यानंतर बहुतेकांनी स्वत:ला भारतात विलीन करून घेतले. एक वर्ष उजाडलेतरी हैदराबादचा निजाम काही भारतात सामील व्हायला तयार नव्हता. त्यामुळे निजाम संस्थांनातील जनतेने निजामाविरोधात जो लढा दिला त्यालाच “ हैद्राबाद मुक्तिसंग्राम” म्हटले जाते. 1948 ला हैद्राबादच्या निजामाचे शासन हे देशातील सर्वात श्रीमंत संस्थान होते. 1941 च्या जनगणनेनुसार निजाम राज्याचे एकूण क्षेत्रफळ 82 हजार 694 चौरस मैल इतके होते. जे इंग्लंड आणि स्कॉटलंड देशाच्या दुप्पट भरते. या निजाम राजवटीत संपूर्ण आंध्र प्रदेश, तेलंगणा, मराठवाडा आणि दक्षिण कर्नाटकातील तीन जिल्हे मिळून एकूण 16 जिल्ह्याचा समावेश होता.  
             22 हजार 360 खेड्यात मिळून या संस्थानची लोकसंख्या 1 कोटी, 63 लाख, 38 हजार, 534 एवढी होती.  त्यात 85 % हिंदू तर 12 % मुस्लीम होते. त्यामुळे उर्दू भाषिकांची संख्या ही फक्त 10% असलीतरी राज्यकारभाराची भाषा उर्दूच होती. यावेळी मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यातील लोकसंख्या 52 लाख 19 हजार 528 होती. एकूण क्षेत्रफळाच्या 42 % भाग हा जमीनदाराच्याच मालकीचा होता. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हयातील उस्मानाबाद, परंडा आणि कळंब हे तालुके निजामाचे सर्फेखास म्हणजे वैयक्तिक उत्पन्नाचे तालुके होते. तर या सोबतच गुंजोटी आणि लोहारा हे तालुके निजामाच्या पायग्याचे म्हणजे खाजगी संरक्षक पथकाच्या जहागिरीचे तालुके होते. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा म्हणजे निजामाची खाजगी जहागीर होती. अशाप्रकारच्या जहागिरीतून निजामाला दरवर्षी 15 कोटीचे उत्पन्न मिळत होते. 
        हैद्राबाद संस्थानचा आढावा घेतल्यास असे दिसून येते की, 1883 पासून हे संस्थान इंग्रजांच्या धर्तीवर राज्यकारभार करणारे शासन असून मीर महेबूबअली पाशा हा मोठा सुधारणावादी धोरणाचा होता. त्यामुळे महसूल, अबकारी, अर्थ,कस्टम, स्टॅम्प, न्यायदान, तुरुंग, पोलिस, टपाल, शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, रेल्वे याप्रमाणे 21 विभाग काढून त्याद्वारे गावपातळीपर्यंत प्रशासन व्यवस्था राबविली. त्यामुळे 1910 पर्यंत निजामाकडे  जमा होणारा महसूल हा 2 कोटी 89 लाख 43 हजार इतका होता. अगदी 2 आण्याचे नाणेही चांदीचे असून त्याचे वजन 1.39 ग्रॅम होते. त्यावर M आणि K अशी अक्षरे कोरलेली होती. M म्हणजे महबूब अली आणि K म्हणजे मुल्क. याशिवाय निजामाच्या काळात 16 आण्याचा 1 रुपया होता. त्यामुळेच त्याकाळी सोळा आणे काम झाले, अशाप्रकारची म्हण रूढ झाली. सहावा निजाम मीर महबूबअली हा येवढा शक्तीशाली होता की, इटली, फ्रांस, ओष्ट्रीया, इंग्लंड यासारख्या देशाचे राजपुत्र हे त्याचे खाजगी मित्र होते. 
        1910 पर्यंत गादीवर असणारा सहावा निजाम हा कपडे लत्ता आणि शिकारीचा शौकीन असून त्याने त्याकाळी एकदा वापरलेला ड्रेस पुन्हा कधी वापरला नाही. याचवेळी वारंवार पडणार्‍या दुष्काळामुळे सर्वसामान्य जनता ही अन्नावाचून तडफडून मरत होती. प्रशासन व्यवस्था ही आजच्याप्रमाणेच असून त्याकाळी जिल्हा अधिकार्‍याला तालुकदार म्हणत असत. गावचा कारभार हा पाटील आणि पटवारी यांच्या हातात होता. पोलिस, लष्कर, रेल्वे, टपाल वगैरे यंत्रणेमुळे निजामाचे शासन हे अगदी एखाद्या देशाच्या तोडीचे होते. म्हणूनच देशातील 565 संस्थानात 21 तोफाच्या सलामीचा मान हा म्हैसूर, बडोदा आणि हैदराबादच्या निजामाला होता. 
        1800 साली इंग्रजाबरोबर तैनाती फौजेचा करार केल्याने निजमावर पुर्णपणे इंग्रजांचे वर्चस्व असलेतरी निजामाने इंग्रजालाही झुलवत ठेवून आपला कार्यभाग साधून घेतला. संरक्षणाची जबाबदारी ही इंग्रजाकडे दिल्याने इंग्रजांनी हैद्राबादजवळ सैन्याची स्वतंत्र छावणी निर्माण केली. निजामाच्या मुलाच्या नावाने त्या भागाला सिंकंदराबाद हे नाव पडले. निजाम संस्थानचा कारभार हा एखाद्या देशाच्या कारभाराप्रमाणे असून 1870 साली आपल्या ताब्यातील प्रत्येक गावात निजामाने पिण्याच्या पाण्याकरिता अतिशय मजबूत अशा आडाची निर्मिती केली. ते आड आजही मराठवाड्यातील प्रत्येक गावात पहायला मिळतात. तर दुष्काळग्रस्त भागाकडेही त्यांचे लक्ष असून 1905 साली पडलेल्या दुष्काळात निजामाने 28000 रुपये खर्च करून तुळजापूरच्या घाटाचे काम पूर्ण केले. अशाप्रकारची अनेक कामे त्यांनी समाजासाठी पूर्णत्वास नेली. 
          1911 ते 1948 ला हैदराबादच्या गादीवर सातवा निजाम मिर उस्मानअली गादीवर असून तो जगातल्या 10 श्रीमंतापैकी एक होता. त्याच्याही कालखंडात हैद्राबाद संस्थानात अनेक सुधारणा होऊन छोट्या मोठ्या गावात शिक्षणाची सोय झाली. हैद्राबादला उस्मानिया विद्यापीठाची निर्मिती झाल्याने संस्थांनातील मुलांना उच्च शिक्षणाची सोय झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातील गुंजोटीचे श्री कृष्ण विद्यालय 1921 सालचे आहे. निजाम राजवटीत विज्ञान आणि गणितबरोबरच अखलियात नावाचा विषय शिकणे अनिवार्य होते. ज्यात नीतीमत्तेचे धडे गिरवले जायचे, यात
नापास झालातर त्याला नाकाम अखलियात म्हटले जायचे. विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे निजाम राजवटीतील प्राथमिक शिक्षण हे निशुल्क होते. शाळेतील प्रार्थना मात्र निजामाला दुवा मागण्याची असायची.
खिचर की उम्र हो तुझको
आना बख्त सिंकदर हो |
याचा अर्थ होतो “ दीर्घायु होऊ दे निजाम प्रभूला, हीच मागणी माझी ईश्वराला.”
       राज्यकर्ते मुस्लिम असलेतरी गावपातळीवर सर्वकाही व्यवस्थित होते. न्याय निवाडा निस्पक्क्षपाती होता. गावचा पाटील गावात न्याय द्यायचा. सरकारी कार्यालयाचा तसा संबंध यायचा नाही. परंतु आलाच तर तातडीने काम व्हायचे. रस्ते, रेल्वे यासारख्या सोयी झाल्याने माणसाचा संपर्क वाढला होता. निजामाची प्रशासनावरील पकड मजबूत असल्याने इथं चले जाव, मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो ही गांधीजीची आंदोलने झाली नाहीत. दुसर्‍या महायुद्धांनंतर संपूर्ण भारत देश इंग्रजांच्या विरोधात पेटलेला असताना निजाम राजवटमात्र अगदी स्थिर होती. 1946 पर्यन्त सारकाही व्यवस्थित चालू होतं. 
        मध्येच रझाकार नावाच्या संघटनेचा उदय झाला आणि निजाम संस्थांनातील वातावरण पार बदलून गेले. निजाम राजवट बरी म्हणणारे लोकही आता रझाकारांचे बळी चालले. पाहता पाहता रझाकारांनी संपूर्ण हैद्राबाद संस्थान आपल्या हातात घेतले. 1946 ते 1948 अशी दोन वर्षे संपूर्ण जनता यांच्या अत्याचाराला बळी पडली. गावोगाव अन्याय अत्याचार याला सीमा राहिली नाही. एका बाजूला सारा हिंदुस्तान स्वातंत्र्याचा आनंद साजरा करतोय तर त्याचवेळी निजाम राजवटीतला माणूस जगण्यासाठी धडपडतोय अशा वातावरणात गावातील सर्वसामान्य माणूस जागा व्हायला लागला. आणि त्यातूनच भारतातील एक्या अदभूतपुर्व अशा लढ्याला सुरुवात झाली. त्याला “ हैद्राबाद मुक्तिसंग्राम” म्हटले जाते. 
        सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण संस्थानात उठावाला सुरुवात झाली. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली लढ्याची सुरुवात झाली असलीतरी शेवटची 18 महिने ते तुरुंगातच होते. त्यामुळे निजामाच्या विरोधात आता एकसंघ उठवाबरोबरच गावोगावचा सर्वसामान्य माणूस पेटून उठला. त्यामुळे 1947 – 48 चा कालखंड हा संपूर्ण निजामशाहीसाठी आणि त्यातल्या त्यात उस्मानाबादसाठी अतिशय खडतर असा होता. रझाकारासारख्या अतिशय क्रूर संघटनेला सामान्य माणसाने अंगावर घेतले. आणि तेथूनच सुरू झाला सूडाचा प्रवास. जे शिकले त्यांचा इतिहास पुस्तकात आला परंतु अनेक  अशी मंडळी आहे त्यांना अजूनही इतिहासाने न्याय दिला नाही. एका एका गावची 15 - 20 माणसं रझाकारांनी कापून काढली, जीवंत जाळली तरी त्याची कुठे नोंद नाही. म्हणूनच उस्मानाबाद आकाशवाणीच्यावतीने “ हैद्राबाद मुक्तिसंग्रामात, असे झुंजलो आम्ही ” नावाची मालिका सादर करून दुर्लक्षित इतिहास आपल्या समोर मांडला जाईल. अशा या दुर्लक्षित वीरांना समाजासमोर मांडणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. 
 ...............✍️                                                                                                                              प्रा. डॉ. सतीश कदम, उस्मानाबाद, ९४२२६५००४४

धनंजय स्वामी यांनी साकारला महाबळेश्वर येथील प्राचीन कृष्णाई महादेव मंदिर स्वामी गनपतीस देखावा

धनंजय स्वामी यांनी साकारला महाबळेश्वर येथील प्राचीन कृष्णाई महादेव मंदिर स्वामी गनपतीस देखावा


परळी / सोनपेठ (दर्शन) :-

परळी वैजनाथ येथील जंगम गल्लीतील धनंजय स्वामी यांचा स्वामी गणपती २०२१
धनंजय स्वामी यांनी साकारला महाबळेश्वर येथील प्राचीन कृष्णाई महादेव मंदिर स्वामी गनपतीस देखावा,संकल्पना अशी की दैवी वरदहस्त लाभलेले थंड हवेचे महाबळेश्वर येथील प्राचीन कृष्णाई महादेव मंदिर या मंदिराचा इतिहास असा आहे की, इ.स १२१५ मध्ये राजे ऋग्वेद यांनी महाबळेश्वर येथील कृष्णा नदीच्या काठावर झऱ्याचे उगम स्थान असलेल्या ठिकाणी छोटेसे मंदिर व जलाशय  बांधलेले आहे. तीनही बाजूनी नक्षीदार, कोरीव, दगडी खांबावर मंदिर उभारलेले असून मध्यभागी  जलाशय (बारव) आहे.येथून कृष्णा नदीचा उगम होतो .
मंदिर अगदी हुबेहूब साकारले असून यात मध्यभागी जलाशयाच्या काठावर आरामदेही आसनस्थ एक हात स्वचरणावर ठेवलेली  शांत,संयमी गणेश मूर्ती विराजमान केली आहे. बाप्पाच्या पायाशी असलेल्या गोमुखातून अखंडित जलधारा  समोरील जलकुंडात पडत आहे नुकत्याच श्रावणसरी बरसल्यामुळे मंदिराचा ओलसरपणा सौन्दर्यात आणखीनच भर टाकतो  आल्हाददायक शांत जलप्रवाहाचा खळखळाट अशा रम्य वातावरणात जणू गणपती बाप्पा निसर्गाचा आनंद घेत आहेत.देखावा पाहताना प्रत्यक्ष पुरातन मंदिरात असल्याचा भास निर्माण होतो. अत्यंत सुंदर मनमोहक असा मनाला  भुरळ पाडणारा असा देखावा झाला आहे .देखाव्यास अनुरूप अशी श्रींची मुर्ती पर्यावरण पूर्वक शाडू मातीची खास बनवुन घेतली. या स्वामी गणपती 2021 कलाकृती निर्माते कलाकार धनंजय स्वामी यांचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.

Wednesday, September 15, 2021

सोनपेठ प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्स कडून होनारी अर्थिक लुट थाबवावी

सोनपेठ प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्स कडून होनारी अर्थिक लुट थाबवावी



सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी संपादक किरण रमेश स्वामी यांच्या कडे तक्रार करुन व्हिडिओ पुरावाच दिल्यामुळे तक्रार अर्ज प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्स (सिस्टर) बाळातंपणा साठी येणाऱ्या शहरी असो वा ग्रामीण भागातील गोरं - गरीब मंजुरी करणारी लोकच आता केवळ प्राथमिक आरोग्य केंद्रात बाळातंपणा साठी येतात परंतु सोनपेठ प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्स (सिस्टर) यांच्या कडून 500/-,700/-,1000/-.रुपये घेतात हि आर्थिक लुट लवकरात लवकर थांबवावी दि.13 सप्टेंबर सोमवार रोजी सायंकाळी 6 घ्या दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रातील नर्स (सिस्टर) गाढे व हारकाळ यांनी खपाट पिंपरी येथील लमाणी समाजातील बाळातंपणा साठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाइकां कडून 700/- रुपये घेतले तो व्यक्ती स्वतःच्या इच्छेने 200/- रुपये देत होता,असेच स्वतः इच्छेनुसार लोक रुपये देतात ते बक्षीस म्हणून स्वीकारले हरकत नाही परंतु उरमट भाषा,उपकार करत असल्याचा माजुरे पणा हा कधी समाप्त होणार,तक्रार दाखल करायला कोणी ही पुढे येत नाही याचा माज आलेला दिसून येत आहे,असा कारभार प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्वांनीच येणार्या प्रत्येक व्यक्तींना आदर केला पाहिजे त्यांना योग्य उपचार दिले पाहिजेत व योग्य मार्गदर्शन केले पाहिजे हि अपेक्षा व्यक्त करतो कारभार सुधरावा तसेच ओं.पि.डी.ची नर्स (सिस्टर) तात्काळ बदलावी कालच दि.15 सप्टेंबर 21 बुधवार रोजी एका रुग्णाला सलायन लावायच होत तर या नर्स (सिस्टर) कर्तव्य सोडून बाहेर एका मोटारसायकल वरून गेल्या होत्या या ठिकाणी आरोग्य सेवा पुरविणाऱ्या कर्मचारी वर्गाला नाहक या कामचुकार कर्मचार्यांचा अप्रत्यक्ष मानसीक त्रास होतो व त्याचा परीणाम एकाचा राग दुसऱ्यावर त्याचा रुग्णाला व नातेवाईक यांना विनाकारण त्रास होतो.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुभाष पवार यांना विनंती आहे कि प्राथमिक आरोग्य केंद्रातील कारभारावर जातीने लक्ष घालून तात्काळ सुधारणा करावी नसता मा.शल्य चिकित्सक परभणी, आरोग्य मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल त्यामुळे होणा-या परीणामास आपनच जबाबदार राहाल अशी विनंती संपादक किरण रमेश स्वामी यांनी तक्रार अर्ज केलाआहे.

सोनपेठ प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्स कडून होनारी अर्थिक लुट थाबवावी

सोनपेठ प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्स कडून होनारी अर्थिक लुट थाबवावी



सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी संपादक किरण रमेश स्वामी यांच्या कडे तक्रार करुन व्हिडिओ पुरावाच दिल्यामुळे तक्रार अर्ज प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्स (सिस्टर) बाळातंपणा साठी येणाऱ्या शहरी असो वा ग्रामीण भागातील गोरं - गरीब मंजुरी करणारी लोकच आता केवळ प्राथमिक आरोग्य केंद्रात बाळातंपणा साठी येतात परंतु सोनपेठ प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्स (सिस्टर) यांच्या कडून 500/-,700/-,1000/-.रुपये घेतात हि आर्थिक लुट लवकरात लवकर थांबवावी दि.13 सप्टेंबर सोमवार रोजी सायंकाळी 6 घ्या दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रातील नर्स (सिस्टर) गाढे व हारकाळ यांनी खपाट पिंपरी येथील लमाणी समाजातील बाळातंपणा साठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाइकां कडून 700/- रुपये घेतले तो व्यक्ती स्वतःच्या इच्छेने 200/- रुपये देत होता,असेच स्वतः इच्छेनुसार लोक रुपये देतात ते बक्षीस म्हणून स्वीकारले हरकत नाही परंतु उरमट भाषा,उपकार करत असल्याचा माजुरे पणा हा कधी समाप्त होणार,तक्रार दाखल करायला कोणी ही पुढे येत नाही याचा माज आलेला दिसून येत आहे,असा कारभार प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्वांनीच येणार्या प्रत्येक व्यक्तींना आदर केला पाहिजे त्यांना योग्य उपचार दिले पाहिजेत व योग्य मार्गदर्शन केले पाहिजे हि अपेक्षा व्यक्त करतो कारभार सुधरावा तसेच ओं.पि.डी.ची नर्स (सिस्टर) तात्काळ बदलावी कालच दि.15 सप्टेंबर 21 बुधवार रोजी एका रुग्णाला सलायन लावायच होत तर या नर्स (सिस्टर) कर्तव्य सोडून बाहेर एका मोटारसायकल वरून गेल्या होत्या या ठिकाणी आरोग्य सेवा पुरविणाऱ्या कर्मचारी वर्गाला नाहक या कामचुकार कर्मचार्यांचा अप्रत्यक्ष मानसीक त्रास होतो व त्याचा परीणाम एकाचा राग दुसऱ्यावर त्याचा रुग्णाला व नातेवाईक यांना विनाकारण त्रास होतो.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुभाष पवार यांना विनंती आहे कि प्राथमिक आरोग्य केंद्रातील कारभारावर जातीने लक्ष घालून तात्काळ सुधारणा करावी नसता मा.शल्य चिकित्सक परभणी, आरोग्य मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल त्यामुळे होणा-या परीणामास आपनच जबाबदार राहाल अशी विनंती संपादक किरण रमेश स्वामी यांनी निवेदनात केली आहे.

पालकमंत्री नवाब मलिक यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम

पालकमंत्री नवाब मलिक यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम   



परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
 गुरुवार दि.16 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजता हदगाव (न) येथे आगमन व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. दुपारी 4 वाजता ढेंगळी पिंपळगाव ता.सेलू येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. सायंकाळी 4.45 वाजता कोल्हा ता.मानवत येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करतील. सायंकाळी  5 वाजता परभणीकडे प्रयाण. सायंकाळी 6 वाजता आगमन व राखीव. सायंकाळी 6.30 वाजता जिंतूर व सेलू तालुक्यातील पिक कर्ज तसेच जिल्हा परिषद व इतर शासकीय योजनांच्या कर्ज वाटपासंदर्भात सर्व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक (स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी). सायंकाळी 6.45 वाजता सहारा एज्युकेशन ॲण्ड वेलफेअर फाऊंडेशन परभणी यांच्यावतीने सहारा गौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रम (स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी). सायंकाळी 7 वाजता अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत व इतर महत्वाचे मुद्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यासमवेत आढावा बैठक (स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी). रात्री 8.30 ते 9.30 वाजता राखीव व सोईनुसार परभणी येथे मुक्काम करतील.
 शुक्रवार दि.17 सप्टेंबर 2021 सकाळी 8.40 वाजता राजगोपालाचारी उद्यानाकडे प्रयाण. सकाळी 8.45 वाजता राजगोपालाचारी उद्यान येथे आगमन व मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना सलामी, पुष्पचक्र अर्पण व ध्वजारोहन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 9.30 वाजता  परभणी येथून आहेरवाडी ता.पुर्णाकडे प्रयाण. सकाळी 10.15 वाजता आहेरवाडी येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी.  सकाळी 10.45 वाजता माटेगाव ता.पुर्णा येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. सकाळी 11.45 वाजता जवळा ता.पालम येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. दुपारी 12.45 वाजता मरडसगाव ता.गंगाखेड येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. दुपारी 1.45 वाजता आनंदवाडी ता.गंगाखेड येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. दुपारी 2 वाजता भिसेगाव ता. सोनपेठ येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. दुपारी 2.30 ते 3.30 वाजता राखीव. दुपारी 3.30 वाजता भिसेगाव येथून औरंगाबादकडे प्रयाण करतील.

विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाद्वारे मराठवाड्यातील नागरिकांना न्याय सुविधा मिळणार - पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता

विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाद्वारे 
मराठवाड्यातील नागरिकांना न्याय सुविधा मिळणार - पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता

औरंगाबाद / परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणात मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यांतील नागरिकांना पोलीसांबद्दल काही तक्रार असल्यास येथे तक्रार नोंद करता येणार असून कायद्याप्रमाणे तक्रारींचा निरसण करण्यात येणार आहे. तक्रारी, समस्यांचा तात्काळ निपटारा झाल्याने पोलीस, नागरिक यांना न्याय व सुविधा मिळणे सुलभ होणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता यांनी सांगितले. विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाचे उद्घाटन डॉ.निखिल गुप्ता यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. 
रेल्वेस्टेशन रोडवरील महापौर बंगल्याच्या शेजारील साई ट्रेड सेंटर येथील पहिल्या मजल्यावर सुरू करण्यात आलेल्या विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी डॉ.उन्मेष टाकळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर प्राधिकरणाचे अध्यक्ष निवृत्त्‍ जिल्हा न्यायाधीश दे.ज.शेगोकार, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) तथा सदस्य मीना मकवाना, पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार, यांच्यासह  संबंधित अधिकारी-कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. 
डॉ.गुप्ता म्हणाले की, पोलीस नेहमीच नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज असतात. हे काम करतांना कधी कधी चुका होत असतात. त्याबद्दल तक्रारी निर्माण होऊन प्रकरणे न्यायालयातही जातात. अशा सहज सुटणाऱ्या छोट्या-मोठ्या समस्या आता या प्राधिकरणाच्या माध्यमातून सोडविल्या जाणार आहेत. त्यामुळे हे प्राधिकरण पोलिसांना त्रास देण्यासाठी नसून काम करताना झालेल्या चुका दुरूस्त करणे आणि नागरिकांना चांगल्या सुविधा देणे हे या प्राधिकरणाचे उद्दीष्ट आहे. 
यावेळी प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री.शेगोकार यांनी विभागीय पोलीस तक्रार प्राधिकारणाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या न्याय निवाड्याची प्रक्रिया समजावून सांगितली तसेच येथे खोट्या तक्रारी दाखल केल्याचे सिध्द झाल्यास संबंधित तक्रारदारास शिक्षेची तरतूद आहे. या प्राधिकरणाच्या माध्यमातून समस्यांची सोडवणूकीची भूमिका असुन या माध्यमातून पोलीस व नागरिकांना त्वरीत न्याय मिळणार आहे. 

Monday, September 13, 2021

प्रा.सिद्धार्थ तायडे दिग्दर्शित आणि रानबा गायकवाड लिखित "फायनल तिकीट" लघुपटास इंडियन शॉर्ट सिनेमा फिल्म फेस्टिव्हल मध्ये "सर्वोत्कृष्ट सामाजिक लघुपटाचा सन्मान"

प्रा.सिद्धार्थ तायडे दिग्दर्शित आणि रानबा गायकवाड लिखित "फायनल तिकीट" लघुपटास इंडियन शॉर्ट सिनेमा फिल्म फेस्टिव्हल मध्ये "सर्वोत्कृष्ट सामाजिक लघुपटाचा सन्मान"

सोनपेठ (दर्शन) :-

इंडियन शॉर्ट सिनेमा फिल्म फेस्टिव्हल 2021 या राष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल मध्ये रानबा गायकवाड लिखित आणि प्रा.सिद्धार्थ तायडे दिग्दर्शित फायनल तिकीट" लघुपटास इंडियन शॉर्ट सिनेमा  फिल्म फेस्टिव्हल मध्ये "सर्वोत्कृष्ट सामाजिक लघुपट सन्मान" प्राप्त झाला आहे. या लघुपटाची  निर्मिती-दिग्दर्शन प्रा. सिद्धार्थ तायडे,
पटकथा-संवाद रानबा गायकवाड,छाया-संकलन मनोज आलदे, यांनी केले आहे.
    या  लघुपटात प्रसिद्ध  कलावंत  प्रदीप भोकरे, शेख गणी, शिवकुमार लुले, नागनाथ बडे,देविदास बोकन,बालाजी कांबळे,कपिल चिंडालिया,गोविंद मुंडे, सिद्धेश्वर इंगोले,विकास वाघमारे, विद्याधर सिरसाट, सिद्धांत लांडगे, अनंत सोळंके,सागर चिंडालिया ,चंदा चांदणे परळीकर आदींनी भूमिका साकारल्या आहेत.हा पुरस्कार स्मृतीशेष शिवकुमार लुले आणि कालकथीत देविदास(बंडू) बोकन यांना आदरांजली स्वरूप अर्पण करीत आहोत अशी भावना दिग्दर्शक प्रा. सिद्धार्थ तायडे यांनी व्यक्त केली.
     यापूर्वी रानबा गायकवाड लिखीत व प्रा. सिध्दार्थ तायडे दिग्दर्शित पाण्याखालचं पाणी या शॉर्ट फिल्मला गोवा फिल्म फेस्टिव्हल तसेच मांईड इट या फिल्म्ला नॅशनल फिल्म डिव्हिजन ऑफ इंडिया,झेप राष्ट्रीय लघुपट महोत्सव सोलापूर चा पुरस्कार मिळालेला आहे. 
या सन्माना बद्दल सर्व स्तरांतून टीम फायनल तिकीटचे स्वागत व अभिनंदन होत आहे.

ऊखळी बु.येथिल ईश्वर शिवाजी मुजमले या युवकाचा इतरांनी आदर्श घ्यावा - संपादक कैलास डुमणे मराठवाडा साथीच्या वतीने सत्कार

ऊखळी बु.येथिल ईश्वर शिवाजी मुजमले या युवकाचा इतरांनी आदर्श घ्यावा - संपादक
कैलास डुमणे
मराठवाडा साथीच्या वतीने सत्कार
परळी / सोनपेठ (दर्शन)-

पावसाने गेल्या आठवड्यात संपूर्ण मराठवाड्यात थैमान घातले होते.अनेक नद्यांना महापूर आला होता.सोनपेठ तालुक्यातील ऊखळी बु.या गावातून बोरणा नदी तुडुंब भरून वाहत होती.दरम्यान,त्या महापूरात गावातील एक वृध्द आजीबाई वाहत असल्याचे निदर्शनास येताच,गावातील ईश्वर शिवाजी मुजमले या युवकाने त्या वृद्ध आजीचे प्राण वाचवले होते.त्यांच्या या कार्याबद्दल पाथरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ.सुरेश वरपुडकर यांनीही सत्कार केला होता.ईश्वर शिवाजी मुजमुले परळी वैजनाथ येथे आले असता,'दैनिक मराठवाडा साथी ' च्या वतीने त्यांचा कार्यालयात शाल, श्रीफळ, पुष्पहार व 'विचारधन' पुस्तक देऊन, संपादक सतीश बियाणी,सा.रणधुमाळीचे संपादक कैलास डुमणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.स्वताचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याचा जीव वाचवणे क्वचितच ऐकायला मिळते.अशा युवकांचा सत्कार आपणच केला पाहिजे.ज्यामुळे युवकांना समाजकार्याची आवड निर्माण होईल.असे, गौरवोद्गार बहुजन चळवळीचे युवा नेते धम्मा भाऊ क्षिरसागर यांनी कार्यक्रमप्रसंगी काढले.तसेच,समाजात अशा युवकांची गरज आहे.प्रत्येक युवकांनी ईश्वर शिवाजी मुजमले या युवकाचा आदर्श घ्यायला हवा.असे,यावेळी सा.रणधुमाळीचे संपादक कैलास डूमणे म्हणाले.'दै.मराठवाडा साथी'चे संपादक सतीश बियाणी यांनी अभिनंदन केले.या कार्यक्रमाला पत्रकार राजकुमार कदम,केशव कांबळे,अजय रायभोळे, राजेश सरवदे,विनोद रोडे,भिमा कसबे, विनोद भुमरे,शुभम चव्हाण आदिंची उपस्थिती होती.

Sunday, September 12, 2021

जिल्ह्याधिकारी आंचल गोयल यांनी विना मास्क फिरणारे व लस न घेणाऱ्यावर केली दंडात्मक कारवाई

जिल्ह्याधिकारी आंचल गोयल यांनी विना मास्क फिरणारे व लस न घेणाऱ्यावर केली दंडात्मक कारवाई 

परभणी / सोनपेठ (दर्शन) : -

परभणी शहरात सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर आज जिल्ह्याधिकारी आंचल गोयल यांनी कारवाई केली. 
 जिल्ह्याधिकारी आंचल गोयल  यांनी आज स्वतः शहरातील गांधी पार्क, शिवाजी चौक जनता मार्केट, कच्छी बाजार आणि जुना मोंढा परिसर भागात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर आणि दुकानादारांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच ज्या दुकानादारांनी अजून पर्यंत पहिले ही लसीकरण करून घेतले नाही त्यांची दुकाने बंद करण्याची ही यावेळी जिल्ह्याधिकारी यांनी कारवाई केली. यापुढे जे दुकानदार लस न घेता आपली दुकाने उघडतील त्यांना ५ हजार रुपये दंड लावला जाईल. तसेच ज्या दुकानातील मालक आणि कर्मचारी यांनी दोन्ही लस घेतल्या असल्यास त्याचे प्रमाणपत्र दुकानाबाहेर लावूनच आपली दुकाने उघडी करावी असे ही निर्देश जिल्ह्याधिकारी गोयल यांनी यावेळी व्यापाऱ्यांना दिले.
 यावेळी  जिल्ह्याधिकारी गोयल यांनी नागरिक आणि व्यापारी यांच्याशी संवाद साधला असता ७० ते ८० टक्के जनतेने अजूनही लसीकरण करून घेतले नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता मास्क वापरणे, शारीरिक अंतर राखणे आणि लसीकरण करून घेणे किती महत्वाचे आहे, याबाबत मार्गदर्शन जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी बाहेर पडतांना मास्कचा वापर करावा,  शारीरिक अंतर राखावे आणि लसीकरणाच्या करून घ्यावे असे आवाहन यावेळी जिल्ह्याधिकारी गोयल यांनी केले.
यावेळी महानगर पालिकेकडून विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानादारांवर २०० रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. यानुसार ७७ जणांवर कारवाई करत १५ हजार ४०० रुपये आणि एक दुकानावर कारवाई करत १० हजार दंड करण्यात आला.
यावेळी पालिका आयुक्त रोहिदास पवार, उपायुक्त रणजित पाटील, मुख्य स्वछता निरीक्षक करण गायकवाड यांची उपस्थिती होती.