सोनपेठ (दर्शन) :- कै.र.व.महाविद्यालयात हिंदी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.यानिमित्याने दि.14 सप्टेंबर 2025 रोजी युट्युब व्हिडिओ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हिंदी दिवसाचे महत्त्व सांगण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.वडचकर शिवाजी यांनी केले. यानंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘हिंदी दिवस’ या भितीपत्रकाचे विमोचन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी विभाग प्रमुख प्रो.डॉ.वनिता कुलकर्णी या उपस्थित होत्या. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या डॉ.शेख शकीला तसेच प्रा.कैलास आरबाड हे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. शेख शकीला आपले विचार व्यक्त करताना म्हणाल्या “भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन वर्षातच म्हणजेच 14 सप्टेंबर 1949 दिवशी संविधान सभेने हिंदी भाषेची भारताची राजभाषा म्हणून निवड केली. या दिवसाचे औचित्य साधून 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो” तसेच दुसरे प्रमुख मार्गदर्शक प्रा. कैलास आरबाड यांनी ‘राष्ट्रभाषा हिंदी’ या विषयावर आपले विचार व्यक्त करताना म्हणाले, “भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणजे हिंदी होय या हिंदी भाषेच्या सन्मानाकरिता तसेच हिंदी भाषेतलं सौंदर्य तसेच साहित्य जगासमोर आणण्यासाठी 14 सप्टेंबर हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो” यानंतर विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपली मनोगते व्यक्त केली. शेवटी अध्यक्षीय समारोप करताना प्रो.डॉ.कुलकर्णी वनिता म्हणाल्या “14 सप्टेंबर 1949 रोजी घटना समितीने भारतीय संघराज्याच्या राजभाषेत ऐतिहासिक निर्णय घेऊन हिंदी भाषेला राजभाषेचा सन्मान दिला. त्यामुळे दरवर्षी 14 सप्टेंबर हा दिवस ‘हिंदी दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारतीय राज्यघटनेत 17 व्या भागात परिच्छेद 343 पासून 351 पर्यंत जी कलमे आहेत त्यानुसार हिंदी ही भारतीय संघराज्याची राजभाषा असून तिची लिपी देवनागरी असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. महात्मा गांधीजींनी हिंदी भाषेला जनमानसाची भाषा म्हटले आहे हिंदी ही भारत देशातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. हिंद -आर्य भाषा समुहातील हिंदुस्तानी भाषेच्या संस्कृतीकरणामधून हिंदीचा उदय झाला भारताच्या उत्तर भागातील आणि मध्य प्रदेशातील लोकांची ती मातृभाषा आहे हिंदीचा साहित्यिक इतिहास खुप समृद्ध आहे.” या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आगळे स्नेहा या विद्यार्थिनीने केले तर आभार मुलगीर नागेश या विद्यार्थ्याने मांनले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment