पदवीधर मतदारसंघासाठी सर्व पदवीधरांनी मतदार नोंदणी स्वतः करावी - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण
परभणी/सोनपेठ (दर्शन) : -
1 नोव्हेंबर, 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. सन-2020 मध्ये झालेल्या निवडणूकीसाठी वापरण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये नाव असलेल्या पदवीधरांना पुन्हा नव्याने नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. जास्तीतजास्त पात्र पदवीधर मतदारांनी आपल्या तहसील कार्यालयात मतदार यादीमध्ये नव्याने मतदार नोंदणी स्वतः करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार, उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, नायब तहसिलदार सतीश रेड्डी व पत्रकार यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, पदवीधर नाव नोंदणीसाठी फॉर्म नमुना क्रमांक-18 भरुन देणे आवश्यक आहे. हा फॉर्म सर्व तहसिल कार्यालय, मंडळ अधिकारी महसूल यांच्याकडे उपलब्ध आहे.नोंदणीसाठी पात्रता - 01 नोव्हेंबर 2022 रोजी किंवा पूर्वी कोणत्याही शाखेचा पदवीधर.सर्व विद्यापीठे तसेच सर्व मुक्त विद्यापीठे अथवा कोणत्याही अभिमत विद्यापीठाचा पदवीधर असणे आवश्यक आहे.नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रेः फार्म नंबर 18 भरुन द्यावा, फार्म नंबर 18 बरोबर अंतिम वर्ष गुणपत्रिका किंवा मुळ पदवीची छायांकित प्रत जोडावी. नजिकच्या काळातील दोन पासपोर्टसाईजचे फोटो (फोटोचा पार्श्वभाग पांढ-या रंगाचा असावा).
2020 च्या निवडणूकीच्या वेळेस परभणी जिल्ह्यात पदवीधर मतदार यादीचे 76 यादी भाग असून मतदान केंद्रसंख्या 78 होती. नंतर 2 सहाय्यकारी मतदान केंद्र झाले.यावेळी वाढण्याची शक्यता आहे, या नोंदणीसाठी रहिवासी पुरावा - आधार कार्ड, निवडणुक ओळखपत्र, रेशन कार्ड, लाईट बिल, ड्रायव्हिंग लायसन्स, घरपट्टी यापैकी एक.अर्ज उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयात या ठिकाणी स्वीकारले जातील.
1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक मंगळवार 30 सप्टेंबर 2025, वर्तमानपत्रातील जाहीर सूचना प्रथम पुनर्प्रसिद्धी- बुधवार 15 ऑक्टोबर, द्वितीय पुनर्प्रसिद्धी- शनिवार 25 ऑक्टोबर, नमुना क्रमांक 18 किंवा 19 द्वारे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक - गुरूवार 6 नोव्हेंबर, हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई- गुरुवार 20 नोव्हेंबर, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी- मंगळवार 25 नोव्हेंबर, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2025, दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक, पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे- गुरुवार 25 डिसेंबर व मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी- मंगळवार 30 डिसेंबर 2025.
मतदार नोंदणीसाठी विभागीय आयुक्त हे मतदार नोंदणी अधिकारी असणार आहेत. तर जिल्हाधिकारी हे सहायक मतदार नोंदणी अधिकारी असतील. जास्तीत जास्त पदवीधरांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
No comments:
Post a Comment