अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संस्थेच्या विभागीय अध्यक्षपदी शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांची निवड
सोनपेठ (दर्शन) :- अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संस्थेच्या जालना परभणी व बीड जिल्हा विभागीय अध्यक्षपदी श्री गुरु ष.ब्र. १०८ शंभूलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाईकर यांची तर उपाध्यक्षपदी गुरु ष.ब्र.१०८ काशिनाथ शिवाचार्य महाराज पाथरीकर तर सचिव पदावर श्री गुरु ष.ब्र.१०८ विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मानूरकर यांची एकमताने निवड करण्यात आली. सोनपेठ दि १३ सप्टेंबर 2025 श्री नंदिकेश्वर मठ संस्थान सोनपेठ येथे अखिल भारत वीरशैव लिंगायत शिवाचार्य संस्थेचे उपाध्यक्ष श्री गुरु ष.ब्र.१०८ श्रीकंठ शिवाचार्य महाराज नारायणसूरकर/रेवूर यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र वीरशैव लिंगायत शिवाचार्य संस्थेचे अध्यक्ष गुरु ष.ब्र.१०८ डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मन्मथधाम यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली.या सभेत अखिल भारतीय वीरशैव लिंगायत शिवाचार्य संस्थेचे जालना परभणी व बीड जिल्हा विभागीय अध्यक्षपदी श्री गुरु ष.ब्र. १०८ शंभूलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाईकर यांची, उपाध्यक्षपदी गुरु ष.ब्र.१०८ काशिनाथ शिवाचार्य महाराज पाथरीकर तर सचिव पदावर श्रीगुरु ष.ब्र.१०८ विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मानूरकर यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी झालेल्या सभेस श्रीगुरु ष.ब्र.१०८ विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मन्मथधाम ,श्री गुरु ष.ब्र.१०८ नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर, श्री गुरु ष.ब्र.१०८ अमृतेश्वर शिवाचार्य महाराज जिंतूरकर, श्री गुरु ष.ब्र.१०८ शंभूलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाईकर,श्री गुरु ष.ब्र.१०८ काशिनाथ शिवाचार्य महाराज पाथरीकर,श्री गुरु ष.ब्र. १०८ चंद्रशेखर शिवाचार्य महाराज माजलगावकर, श्री गुरु ष.ब्र.१०८ चनबसव शिवाचार्य महाराज बर्दापूरकर,श्री गुरु ष.ब्र.१०८ वीरुपाक्ष शिवाचार्य महाराज मानूरकर ,श्री गुरु ष.ब्र.१०८ विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज आष्टीकर (लक्ष्मनाची) यांची उपस्थिती होती.
साप्ताहिक सोनपेठ दर्शन जाहिरात व बातम्या साठी संपर्क संपादक किरण रमेश स्वामी मो.9823547752.
No comments:
Post a Comment