Tuesday, August 29, 2023

जिल्हा परिषद परभणी विविध अभियानात उत्कृष्ट काम केलेल्या सरपंचाचे अभिनंदन

जिल्हा परिषद परभणी विविध अभियानात उत्कृष्ट काम केलेल्या सरपंचाचे अभिनंदन 
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुक्यात जिल्हा परिषद परभणी च्या विविध अभियानात उत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायत कार्यालय तालुक्यातील 9 सरपंचांचे सर्व स्तरातून अभिनंदन होताना दिसत आहे, अनुक्रमांक,ग्रामपंचायत गावांचे नाव, सरपंचांचे नाव खालील प्रमाणे 1) उखळी सरपंच श्री राजेभाऊ अच्युतराव सावंत, 2) कोठाळा सरपंच श्री लक्ष्मण छत्रुघन भोसले, 3) नरवाडी सरपंच श्रीमती पुष्पाबाई रामभाऊ वाघमारे, 4) करम सरपंच श्री रामेश्वर दौलतराव पोते, 5) कोरटेक सरपंच श्री दशरथ बाळदेव सूर्यवंशी, 6)
शिर्शी सरपंच श्री भागवतराव उत्तमराव सोळंके, 7) विटा खुर्द सरपंच श्री मदन पंडितराव भोसले, 8) लासिना सरपंच श्रीमती संगीता शामसुंदर परांडे, 9) ऊकडगाव मक्ता सरपंच श्रीमती जयश्री भाऊराव मोरे.यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 5, शिवसेना शिंदे गटाच्या 2,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची 1व भारतीय जनता पक्षाची 1 ग्रामपंचायत दिसत आहेत,या सर्वांचे तहसीलदार सुनील कावरखे,गट विकास अधिकारी मधुकर कदम, सपोनि सुनील अंधारे तसेच सर्व स्तरातून अभिनंदन होताना दिसत आहे.

Sunday, August 27, 2023

पोकरा योजनेची बंद पडलेली वेब साईट तात्काळ सुरू करून शेतकऱ्यांचे पूर्व संमती अर्ज स्वीकारावे - अतिशनाना गरड राज्याचे मुख्यमंत्री यांना थेट निवेदणाद्वारे केली मागणी

पोकरा योजनेची बंद पडलेली वेब साईट तात्काळ सुरू करून शेतकऱ्यांचे पूर्व संमती अर्ज स्वीकारावे - अतिशनाना गरड
राज्याचे मुख्यमंत्री यांना थेट निवेदणाद्वारे केली मागणी 


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
पंधरा जिल्हातील 5142 गावांतील लाखो शेतकरी बांधवाचे होत आहे नुकसान नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत पोकरा प्रकल्प राज्यभर राबविला जात असतो या प्रकल्पात शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभाचे घटक उदा. वृक्षारोपण,फळबाग लागवड,पॉली हाऊस,शेड नेट हाऊस ,पॉली हाऊस/शेड नेटसह फ्लॉवर/भाजीपाला लागवड ,रेशीम,मधमाशी पालन,गोड्या पाण्यातील मत्स्यपालन,इतर कृषी आधारित उद्योग,गांडूळ खत युनिट,नाडेप कंपोस्ट,सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट ,शेततळे,फील्ड अस्तर,विहिरी ,ठिबक संच,फ्रॉस्ट संच,पंप संच,पाइपलाइन व गट कंपनीचे गोदाम ,औजार बँक  आदींसाठी तसेच ठिबक सिंचन योजनेचे अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना पूर्व संमती चे अर्ज वेब साईट वरून आँनलाईन करावे लागतात परंतु ही वेबसाईटच बंद असल्याने शेतकरी वर्ग सदरील पोकरा योजने पासून वंचित राहत असून त्यांना सदरील योजनेचा लाभ घेता येत नसल्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी निर्माण मुख्य मंञी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी मार्फत निवेदण सखोल चर्चा करून पोकरा योजनेची वेब साईट तात्काळ सुरू करून पूर्व संमती प्रक्रिया सुरू करावी अशी विनंती केली.यावेळी अतिशनाना गरड,संतोष गरड,अर्जुण अब्दागिरे,सतिश खोबे,सिध्देश्वर कदम,मुंजाजी भुसारे,गोपाळ कदम, संदीप कदम,उमेश देशमुख, आदी उपस्थित होते.

Monday, August 21, 2023

ग्राहक वीज बील भरणा करण्यासाठी नगदी स्वरूपात कमाल मर्यादा वाढविण्याबाबत

ग्राहक वीज बील भरणा करण्यासाठी नगदी स्वरूपात कमाल मर्यादा वाढविण्याबाबत


सोनपेठ (दर्शन) :-

महवितरण कार्यालयामध्ये ग्राहकांनी वीज बील भरण्यासाठी नगदी रू. 5000/- (पाच हजार रूपये) कमाल मर्यादा ठेवण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांची मोठी हेळसांड होत आहे. अनेक ग्राहकांकडे चेकबुक देखील नाहीत. त्यामुळे त्यांना चेकद्वारे वीज बील भरणे हे शक्य नाही. तसेच वीज बील भरण्यासाठी वीज बील भरणा केंद्रावर गेल्यावर विनाकारण ग्राहकांना भुर्दंड सोसावा लागत आहे. यासाठी वीज बील भरण्यासाठी नगदी स्वरूपात कमाल मर्यादा ही 10,000/- (दहा हजार रूपये)
करण्यात यावी. यामुळे ग्राहकांची अडचण दूर होवून वीज बील भरणा करणे सोपे होईल. तरी में. साहेबांनी वरील विषयी लक्ष घालून सामान्य नागरिकांना होणारी अडचण लक्षात घेवून नागरिकांच्या हितासाठी व आपल्या कार्यालयाच्या वसुलीसाठी वरील मुद्दा हा महत्वाचा आहे. करिता आपण स्वतः वरिष्ठ कार्यालय किंवा वरिष्ठ अधिकारी यांनी या निषयी माहिती द्यावी. ही अडचण एका ग्राहकाची नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सामान्य ग्राहकांची अचडण आहे. यावर आपण स्वतः व्यक्तिगतरित्या या विषयी दखल घेऊन सामान्य नागरिकांची अडचण दूर करावी. या मागणीचे निवेदन अध्यक्ष अभियंता महावितरण परभणी . तसेच माननीय सचिव ऊर्जामंत्री मंत्रालय मुंबई , मुख्य अभियंता परिमंडल कार्यालय महावितरण विद्युत भवन नांदेड,यांनाही पोस्टद्वारे पाठवण्यात आली आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांना पत्र देण्यात आले आहे. यासंदर्भात अखिल भारतीय ग्राहक पंचायत महानगर परभणी शाखेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे निवेदनावर परभणी शाखा महानगराध्यक्ष अब्दुल रहीम अब्दुल करीम, धाराजी भुसारे, भानुदास शिंदे ,के बी शिंदे, अमृतराव शिंदे ,एस के चव्हाण, बाबासाहेब भोसले, मुजीब खान , शंकर झाटे आदिचा निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

Sunday, August 20, 2023

कै.राजाभाऊ कदम साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन......

कै.राजाभाऊ कदम साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन......


सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ शहरातील हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि उच्च शिक्षणाची ज्ञानगंगा सोनपेठ सारख्या ग्रामीण भागात पोचवून पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा निर्माण करून देणारे दूरदृष्टी नेतृत्व दिवंगत राजाभाऊ कदम साहेबांचा आज स्मृतिदिन आहे. साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना शतशः नमन.
उद्योगाच्या क्षेत्रामध्ये नवनवीन संकल्पना राबवून उभारण्यात येणाऱ्या उद्योगांना आज मोठ्या प्रमाणावर आपण स्टार्टअप (उद्यमारंभ) म्हणून संबोधतो. एका लहानशा गरजेतून तुम्ही एखाद्या नवीन उद्योगाची केलेली सुरुवात म्हणजे उद्यमारंभ होय. गरज हि शोधाची जननी आहे असे म्हटले जाते. नव्वदीच्या दशकात अशाच एका सामाजिक गरजेतून आणी सेवाभावी वृतीतून उच्चशिक्षणाची सुरुवात सोनपेठ सारख्या अडवळणाच्या ठिकाणी करावी या संकल्पनेतून कै. राजाभाऊ कदम साहेबांनी उद्दात्त हेतूने हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाची सुरुवात १९९३ मध्ये करून कै. रमेश वरपूडकर महाविद्यालय या नावाने नवीन स्टार्टअप सुरू केले. सोनपेठ सारख्या उच्च शिक्षणाच्या बाबतीत मागे असलेल्या  छोट्या शहरात उच्च शिक्षणाची गंगा पोचवून अनेक पिढ्या घडवण्याचा उद्देश त्यामागे होता. हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाने ‘ज्ञानात धर्म ततः सुखम’  हे ब्रीद घेऊन सोनपेठ तालुक्यातील युवकांना दर्जेदार उच्च शिक्षण उपलब्ध करून देण्याचे हाती घेतलेले कार्य आजतागायत सुरू आहे. संस्थेच्या कै रमेश वरपुडकर महाविद्यालयाने नुकतीच पंचवीस वर्षे पूर्ण केलेली असून महाविद्यालयाची आजपर्यंतची वाटचाल उतरोत्तर प्रगतीकडे घेऊन जाणारी ठरलेली आहे. सुरुवातीच्या काळात भाड्याचा इमारतीमध्ये सुरू झालेले महाविद्यालय आज स्वतःच्या जागेत डौलाने उभे असून सोनपेठ तालुक्याच्या शैक्षणिक विकासात मैलाचा दगड ठरत आहे. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मा. परमेश्वर कदम साहेबांनी मागील अकरा वर्षांपासून संस्थेअंतर्गत विविध शैक्षणीक घटक संस्था सुरू केलेल्या  आहेत. सोनपेठ पंचक्रोशीतील युवकांना आणि विशेष करून मुलींना उच्च शिक्षण उपलब्ध करून देण्याचे स्वप्न संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय राजाभाऊ कदम यांचे होते. १९९० च्या दशकामध्ये मुलींना शिक्षणासाठी परगावी ठेवण्याची मानसिकता रुजलेली नव्हती आणि अशा परिस्थितीत आपल्याच भागात महाविद्यालय असावे अशा खंबीर भूमिकेतून संस्थेची स्थापना झाली. संस्थेच्या या सेवाभावी कार्याला तत्कालीन सचिव श्री रमेशराव खरवडे, ऊपाध्यक्ष श्री लक्ष्मीकांत परळकर, कोषाध्यक्ष श्री व्यंकटरावजी कदम साहेब, संचालक श्री बालासाहेब नखाते, श्री अंकुशराव वाकणकर, डॉ .संतोष नायबळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.सोनपेठ शहरातील परळी रोडवरील राजाभाऊ कदम नगर परिसरात आज संस्थेच्या सर्व घटकसंस्था कार्यरत आहेत.यामध्ये प्रामुख्याने कै.रमेश वरपूडकर वरिष्ठ महाविद्यालय,  कै.रमेश वरपूडकर कनिष्ठ महाविद्यालय, कै. राजाभाऊ कदम विद्यालय (मराठी माध्यम) ई.चा समावेश होतो. प्राथमिक शिक्षणातील इंग्रजी माध्यमाकडे असलेला पालकांचा ओढा लक्षात घेऊन  एल. आर. के. नावाने  इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु केली. याशिवाय शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेलेल्या विद्यार्थ्यांना परत प्रवाहात आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र सुरू करण्यात आलेले आहे तसेच पदव्युत्तर शिक्षणाची गैरसोय लक्षात घेऊन शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासुन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा  विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागाने महाविद्यालयास एम.ए. / एम.कॉम.चे वर्ग चालवण्यास परवानगी दिली असून आता सोनपेठ पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना के.जी.पासून पी.जी.पर्यंतचे शिक्षण एकाच छताखाली पूर्ण करण्याची संधी संस्थेचे अध्यक्ष श्री परमेश्वर कदम साहेबांनी महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात उपलब्ध करून दिलेली आहे. संस्थेचे मिशन ‘Reaching to the Unreached’ असून सोनपेठ तालुक्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व घटक बांधील आहेत, त्याचाच एक भाग म्हणून २०१५ मध्ये महाविद्यालयाने आपली गुणवत्ता NAAC द्वारे प्रमाणित करून घेऊन ‘ब’ दर्जा प्राप्त केलेला आहे तसेच  स्वा.रा.ती.म. विद्यापिठाने महाविद्यालयास शैक्षणिक अंकेक्षणात ‘अ’ दर्जा दिलेला आहे. क्रीडा क्षेत्रात महाविद्यालयाच्या अनेक विद्यार्थ्यांनी आंतरविद्यापीठ पातळीपर्यंत मजल मारली आहे.  महाविदयालयाच्या ‘प्रज्ञा’ वार्षिक अंकास विद्यापिठाने सलग ४ वेळा उत्क्रुष्ट अंक म्हणून पुरस्कारीत केलेले आहे. महाविद्यालयातील बहुतांश शिक्षक पत्रकारिता, कला, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असून स्वा.रा.ती.म. विद्यापिठाच्या विविध प्राधिकरणावर नियुक्त आहेत.  १९९४ मध्ये ५० विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या प्रवासात आज जवळपास २००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाविदयालयाचे अनेक माजी विद्यार्थी अंकेक्षक, शिक्षण, कला, भारतीय सैन्य, शिक्षण क्षेत्र  आणी व्यवसायात आपले करिअर करत आहेत. महाविद्यालयाचे बहुतांश विद्यार्थी इंजिनिअरिंग तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये शिक्षण घेण्यासाठी पात्र ठरत आहेत. महाविद्यालयाचे विद्यार्थी  नेट/सेट सारख्या परीक्षेमध्ये यश मिळवत असून २०२१ च्या परीक्षेत ४ विद्यार्थी सेट पास झालेले आहेत. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील पारंपरिक विषयांचे शिक्षण देत असताना आज बदलत्या काळानुसार कालसुसंगत शिक्षण देण्यासाठी संस्था प्रयत्नरत आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपले महाविद्यालय कसे बहुविद्याशाखीय राहील यासाठी संस्थेची वाटचाल सुरू आहे. परिसरातील विद्यार्थ्यांना व्यवसाईक शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी संस्था कटिबद्ध असून येत्या काळात अशा प्रकारचे शिक्षण घेऊन विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहतील असा आशावाद आम्ही बाळगून आहोत. स्वर्गीय राजाभाऊ कदम साहेबांनी लावलेल्या या शैक्षणिक संस्थेच्या छोट्या रोपट्याचे रूपांतर आज वटवृक्षात झालेले असुन पंचक्रोशीतील विद्यार्थी आणि पालकांना याचा लाभ होत आहे. साहेबांच्या स्मृतीस पुनश्च विनम्र अभिवादन.🙏🙏🙏
         श्री.डाॕ.प्राचार्य वसंत सातपुते
कै.रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ.

Friday, August 18, 2023

सोनपेठ येथे शनिवारी विद्यापीठ अंतर्गत बुद्धिबळ व तायक्वांदो स्पर्धा

सोनपेठ येथे शनिवारी विद्यापीठ अंतर्गत बुद्धिबळ व तायक्वांदो स्पर्धा



सोनपेठ (दर्शन) :-

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत आंतर महाविद्यालयीन  मुले-मुली गटांची बुद्धिबळ  स्पर्धा  शनिवार  दि. 19  रोजी शहरातील कै. रमेश वरपूडकर महाविद्यालय येथे होणार आहे.
 या स्पर्धेमध्ये नांदेड, हिंगोली परभणी, लातूर A B C D या चार झोनमधील विजयी मुलाचे संघ   स्पर्धासाठी सहभागी होणार आहेत, विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील मुलींचे संघ यामध्ये सहभागी होणार आहेत.
 ही स्पर्धा दि. 19-20 ऑगस्ट  दरम्यान होणार आहे.तर तायक्वांदो या स्पर्धेसाठी परभणी व हिंगोली जिल्यातील डी झोन अंतर्गत महाविद्यालयातील संघ सहभागी होणार आहेत.  क्रीडा संचालक  प्रा गोविंद वाकणकर यांच्या विशेष प्रयत्नामुळे  दोन्ही स्पर्धचे यजमान पद कै रमेश वरपुडकर महाविद्यालय यांना मिळाले असल्यामुळे तालुका पातळीवरील व ग्रामीण भागातील खेळाडूंना या स्पर्धेमध्ये  आपले कौशल्य दाखविण्यासाठी वाव मिळणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटक म्हणून डॉ. मनोज रेड्डी क्रीडा संचालक स्वाराती म.वि. नांदेड, डॉ.मीनानाथ गोमाचाळे चेअरमन डी.झोन, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.शि.प्र. मंडळाचे अध्यक्ष परमेश्वरराव कदम, प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार शिवमल्हार वाघे ,प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य डॉ. वसंत सातपुते हे उपस्थित राहणार आहेत.
 स्पर्धा आयोजना साठी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शेख शकीला, क्रीडा संचालक व संघ व्यवस्थापक डॉ.गोविंद वाकणकर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्व्यक डॉ. मुकुंदराज पाटील,डॉ अनंत सरकाळे, क्री. स. सदस्य डॉ. अशोक जाधव, डॉ. कल्याण गोलेकर, प्रा. डॉ. संतोष रणखांब,सर्व प्राध्यापक, महाविद्यालय कर्मचारी सर्व खेळाडू या स्पर्धेसाठी तयारी करत आहे. विशेष  बाब म्हणजे विद्यापीठाच्या वतीने या महाविद्यालयाला  बुद्धिबळ स्पर्धेसाठी प्रथमच यजमान पद दिले आहे.

Wednesday, August 16, 2023

श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराजांचे श्रावणमास तपोणुष्ठान चिंचोली येथे सुरू

श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराजांचे श्रावणमास तपोणुष्ठान चिंचोली येथे सुरू


सोनपेठ (दर्शन):- प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्रावणमास तपोणुष्ठान श्री नंदिकेश्वर मठ संस्थान मठाधिपती श्री ष.ब्र.108 गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराजांची श्रावणमास तपोणुष्ठान लातूर जिल्ह्यातील मौजे चिंचोली बुद्रुक येथील स्वयंभू गौरी शंकर महादेव मंदिर येथे सुरुवात दिनांक 17 ऑगस्ट 2023 गुरुवार रोजी करण्यात आली असून यांची सांगता दिनांक 17 सप्टेंबर 2023 रविवार रोजी संपूर्ण महिनाभर दैनंदिन कार्यक्रम महादेव रुद्राभिषेक सकाळी 7 ते 9,इंष्टलिंग पूजा व दांपत्य पूजा सकाळी 9 ते 12, प्रसाद 12 ते 2, महिला भजनी मंडळ दुपारी 2 ते 5, महाराजांचे आशीर्वचन सायंकाळी 5 ते 6 आणि महादेव मंदिर नित्य आरती रात्री 8 ते 9 तसेच भजन रात्री 9 ते 11 वाजेपर्यंत होईल, सप्ताहात शिवदिक्षा सोहळा दिनांक 12 सप्टेंबर 2023 मंगळवार रोजी सकाळी 9 वाजता तर भव्य शोभा यात्रा व महाप्रसाद दिनांक 17 सप्टेंबर 2023 गुरुवार रोजी समारोप सकाळी 8 वाजता सुरुवात होईल, सोनपेठ श्री नंदिकेश्वर मठ संस्थान वार्षिक सप्ताह मीटिंग दिनांक 17 सप्टेंबर 2023 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होईल,याप्रसंगी कै.कमलाकर आप्पाराव नागपुरे यांच्या स्मरणार्थ संगीतमय शिवमहापुरात कथा शिव भक्त पंडित रुक्मिणीताई हावरे रोहनवाडीकर यांच्या अमृतवाणीतून दिनांक 6 सप्टेंबर 2023 बुधवार ते दिनांक 12 सप्टेंबर 2023 मंगळवार पर्यंत दुपारी 2 ते 5 संपन्न होणार आहे , कार्यक्रमात वेळे नुसार थोडाफार बदल केला जाईल असे आवाहन श्रावणमास तपोणुष्ठान कार्यक्रम समिती समस्त ग्रामस्थ चिंचोली बुद्रुक यांनी केले आहे, तरी भक्तगणांनी व शिष्यगणांनी संपर्कासाठी 9420326341, 9730277161, 9975347395 व 9130514856 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

Friday, August 11, 2023

स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त ब्रेनव्हाशर प्रा.वसंतराव हंकारे यांचे समाज प्रबोधन

स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त ब्रेनव्हाशर प्रा.वसंतराव हंकारे यांचे समाज प्रबोधन 


सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ शहरात प्रथमच भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७६ वा वर्धापन दिनानिमित्त दिनांक १५ ऑगस्ट २०२३ मंगळवार वेळ - सकाळी ०९.३० वाजता , मा. सौ. कोमल सावरे मॅडम (प्रभारी मुख्याधिकारी नगर परिषद, सोनपेठ) यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा समारंभ तसेच सामुहीक राष्ट्रगीताचा समारंभ आणि युवा व्याख्याते, समाज प्रबोधनकार तथा ब्रेनव्हाशर प्रा.वसंतराव हंकारे (सर) यांचा प्रबोधनात्मक व्याख्यानाचा कार्यक्रम " बाप समजून घेताना" आठवडी बाजारच्या प्रांगणात आयोजीत केला आहे.तरी या समारंभास आपली तसेच विद्यार्थीनींनी व महिला भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती प्रार्थनिय आहे.तरी सकाळी ठीक 8 वाजता आपली जागा निश्चित करुन घ्या.स्थळ- आठवडी बाजार, सोनपेठ जि.परभणी आपले विनित ब्र. भु.श्री रंगनाथ महाराज प्रतिष्ठाण, सोनपेठ.

Thursday, August 3, 2023

मा.महादेवजी जानकर यांची परभणी लोकसभा झंझावात जनस्वराज यात्रा

मा.महादेवजी जानकर यांची परभणी लोकसभा झंझावात जनस्वराज यात्रा


सोनपेठ (दर्शन) :- 

जय भारत जय राष्ट्रीय सर्वांना नम्र आवाहन राम मरगळ युवा जिल्हा अध्यक्ष परभणी राष्ट्रीय समाज पक्ष यांनी केले आहे की मा.महादेवजी जानकर यांची परभणी लोकसभा झंझावात जनस्वराज यात्रा दि.५ शनीवार रोजी व दि.६ रविवार रोजी जनस्वराज यात्रेचे आयोजन मा.महादेवजी जानकर साहेबांच्या नेत्रूत्वात होनार असून बदलत्या राजकीय परीस्थीत  उपेक्षीत समाजाला आपेक्षीत ठिकानी सन्मान मिळावा ह्या हेतूने एक संवाद जानकर साहेब करनार आहेत.तरी शेतकरी , कष्टकरी , कामगार,मंजुर, सुशिक्षित, तमाम नागरिकांनी सहभागी व्हा, श्री नृसिंह पोखर्णी येथून उद्या दिनांक ५ तारखेला सकाळी ८ वाजता यात्रेची सूरवात होईल व परभणी मार्गे , नांदगाव, कातनेश्वर, पूर्णा, ताडकळस ,पालम , केरवाडी, मरडसगाव , गंगाखेड , महातपूरी , शेळगाव , सोनपेठ , पाथरी मानवत व सेलू मूक्काम तसेच दि. ६ रविवार रोजी वालूर , जिंतूर , चारठाना मंठा मार्गे परतूर व घनसांवगी येथे समारोप सभा ... तेजिल्ह्यातील सर्व सामाजीक घटना, विवीध राजकीय सामाजीक क्षेत्रातेल सर्व सन्माननीय व्यक्तींना जाहिर आमंत्रन.. आपन पूढिल क्र. विलास गाढवे सर 9923350616 , लोकसभा अध्यक्ष गोविंदराव मानवतकर 8999948244  तसेच जिल्हा संपर्क प्रमूख ब्रिजेश गोरे 9146884287 , जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब दूगाने 9763644579 , यूवा जिल्हाध्यक्ष राम मरगळ 8329379103, विकास पतंगे 9921008477 ज्ञानेश्वर दातार सोनपेठ 8390305858 यांच्याशी तथा स्थानीक तालूका पदाधीकारी यांच्याशी संपर्क करुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी.