प्रा.कालिदास कुलकर्णी यांची पुस्तकं लिखाण कार्याबद्दल राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील श्री महालिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.कालिदास रामकृष्ण कुलकर्णी यांची महात्मा फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. प्रा.कालिदास कुलकर्णी हे श्री महालिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालय सोनपेठ येथे सण 1994 पासून एम.सी.व्ही.सी.विभागात कार्यरत आहेत ते एक उत्कृष्ट अध्यापक असून मनमिळावू,विद्यार्थी प्रिय,समाजकार्यात अग्रेसर असणारे,नेहमीच मदतीचे हात सदैव पुढे असणारे, प्रा.कालिदास कुलकर्णी हे सर्वांना परिचित आहेत.ते त्यांच्या उत्कृष्ट सामाजिक,शैक्षणिक कार्यातून जाणवते. वाचनाची आवड,सामाजिक कार्याची आवड,त्याचबरोबर सांस्कृतिक वारसा असलेले प्रा.कालिदास कुलकर्णी हे महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतर्गत "इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी" या अभ्यासक्रमाचे पुस्तक लेखनाचे काम त्यांनी केलेले आहे. विशेष या कार्याची दखल घेऊन महात्मा फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य यांनी त्यांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे.प्रा.कालिदास कुलकर्णी यांना नुकतेच पुरस्कार निवडीचे पत्र प्रदेश अध्यक्ष श्री व्यंकटराव जाधव,परभणीचे जिल्हाध्यक्ष प्रा.गोविंद लहाने,उपाध्यक्ष प्रा.सिद्धार्थ सोनाळे यांच्या हस्ते देण्यात आले.महात्मा फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित केलेल्या शिक्षण परिषद व पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे दिनांक 30 ऑक्टोबर 2022 ला मान्यवरांच्या हस्ते हा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जाणार आहे त्यांच्या या निवडीबद्दल श्री महालिंगेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम यांच्या वतीने तसेच श्री महालिंगेश्वर विद्यालय अध्यक्ष ष.ब्र.108 चन्नबसव शिवाचार्य महाराज, सचिव सुभाषआप्पा नित्रुडकर, संस्था सदस्य,सा.सोनपेठ दर्शन परिवार, विद्यार्थी, पत्रकार, मित्र परिवार व सर्वस्तरातून अभिनंदन होताना दिसत आहे.


No comments:
Post a Comment