परतीच्या पावसाने शेतकर् यांच्या पिकात पाणी अन् डोळ्यातही ; शिंदे सरकार जागे व्हा असा टाहो
शेतामध्ये सोयाबीन काढणी कापणीचे काम चालू असताना मध्येच पावसाने पचका केल्याने शेतकर्यांची चांगलीच फजिती झाली. सोनपेठ तालुक्यातील अनेक मंडळात तर आजही पावसाचे पाणी शेतात डबडब करत होतं. शेतकर्यांनी याच गुडघाभर पाण्यामधून उरलंसुरलं सोयाबीन बाहेर काढून धुर्यावर टाकलं. हातातोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत भिजत असल्याने शेतकर्यांच्या डोळ्यांमध्ये अक्षरशः पाणी आलंं.सोनपेठ तालुक्यातील सर्वच मंडळांमध्ये परिसरामध्ये परतीच्या पावसाने वादळी वार्यासह विजेच्या कडकडाटामध्ये परतीचा जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सोयाबीन कापसाचे अतोनात नुकसान झाले. काही ठिकाणी तर खळ्यामध्ये पाणी घुसल्याने काढलेले सोयाबीनही भिजले आहे. आज दुसर्या दिवशीदेखील शेतामध्ये पाणी साचून होतं. शुक्रवारी कापणी करून ठेवलेले सोयाबीन दुसर्या दिवशी शनिवारी शेतकर्यांनी दिवसभर ते धुर्यावर उपसून ठेवलंं. एकंदरीतच सोयाबीनच्या काढणी कापणीमध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकर्यांंची फजिती झाली. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने बळीराजाचा दम कोंडला होता.शेवटि शेतकरी राजा परतीच्या पावसाने शेतकर् यांच्या पिकात पाणी अन् डोळ्यातही आता तरी शिंदे सरकार जागे व्हा असा टाहो .






No comments:
Post a Comment