Sunday, October 9, 2022

कुटुंब कल्याण शस्त्रक्रीयेत सहभागी व्हा : डॉ.सुभाष पवार

कुटुंब कल्याण शस्त्रक्रीयेत सहभागी व्हा : डॉ.सुभाष पवार
सोनपेठ (दर्शन) :- 

वाढत्या लोकसंख्येवर शासनाच्या वतीने उपाययोजना आखण्यात येत आहेत. वाढती लोकसंख्येला आळा घालण्यासाठी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया (एकटाका) हा एक मार्ग आहे. शेळगाव येथे १३ ऑक्टोबरला होणाऱ्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रीयेत सहभागी होण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी केले आहे.
शेळगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात १३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया (एकटाका) च्या आढावा बैठकीत बोलत होते. पुढे बोलताना डॉ. पवार म्हणाले,शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या आजारांना आळा घालण्यासाठी मुख्यतः लहान मुलांसाठी व्हिसीजी, पोलिओ, पेंटा, गोवर, रूबेला आदी लसीकरण करण्यात येतात. या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. सुभाष पवार यांनी यावेळी केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मुंडकर, आरोग्यसेविका मुंडे, डांगे, आरोग्यसेवक चव्हाण, मुंडे यांच्यासह प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

No comments:

Post a Comment