गुरु श्रद्धेचे स्थान, गुरु असे महान, सकल जगी - जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन महास्वामीजी
बर्दापूर येथे दरवर्षी होणाऱ्या श्री गुरु महालिंगेश्वर महाराज यांचा पुण्यस्मरण उत्सव, काशीखंड पुराण समामी, यानिमित्त श्री श्री श्री १००८ काशी जगदुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचा अडपालखी उत्सव, व धर्मसभा आयोजित करण्यात आली होती, महास्वामीजींची मिरवणूक रेणुक विद्यालय बर्दापूर ते मठा पर्यंत वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात, लेझीम पथक, झांज पथक, व हजारो महिला व पुरुष भक्तगण पाऊले खेळत भक्तीमय वातावरणात काढण्यात आली, यानंतर झालेल्या धर्मसभेत काशी जगदुरु यांचा श्री गुरु चन्नबसव शिवाचार्य महाराज, महालिंगेश्वर विद्यालय सोनपेठ चे सचिव सुभाष अप्पा नित्रुडकर, मठ संस्थांचे विश्वस्त रामेश्वरअप्पा महाजन, शिवकुमार स्वामी लिंबेकर, यांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला,सर्व व्यासपीठावरील उपस्थित सर्व शिवाचार्य महाराजांचा सत्कार जगद्गुरु यांच्या हस्ते करण्यात आला, त्याच कार्यक्रमात पुस येथील वीरशैव समाज स्मशानभूमीसाठी एक एकर जमीन दान देणारे रामलिंगअप्पा महाजन , मंगलाबाई महाजन यांचा काशी जगदुरुंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मठ संस्थान बर्दापूरचे विश्वस्त सभासद रेवणसिद्ध हिरेमठ ,बालाजी बागल, शिवशंकर बिडवे यांच्या वतीने ही काशी जगदुरूंचा सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्री गुरु चन्नबसव गुरु महालिंग शिवाचार्य महाराज, मठ संस्थान बर्दापूर यांनी सांगितले की या कार्यक्रमाचे आयोजन सर्व भक्तांनी केले आहे, काशी जगदुरु बर्दापूर ला आल्यामुळे बर्दापूर येथे काशी अवतरली, ५० वर्षांनंतर पिठाधिश्चेर बर्दापूर मठ संस्थान येथे आले आहेत, आणि यामुळे दिवाळीच्या आधीच आपण दिवाळी साजरी केली आहे, संत येती घरा, तोची दिवाळी दसरा! व महालिंगेश्वर शिवाचार्य महाराजांच्या कार्याचा उल्लेख केला, श्री गुरु निरंजन शिवाचार्य महाराज औसा, श्री गुरु काशिनाथ शिवाचार्य महाराज पाथरी, श्री गुरु विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मानूर, श्री गुरु अमृतेश्वर शिवाचार्य महाराज जिंतूर, श्री गुरु निळकंठ शिवाचार्य महाराज मैंदर्गी, श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठ, श्री गुरु डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मन्मथ धाम, श्री गुरु रेणुक शिवाचार्य महाराज मंद्रूपकर, श्री गुरु श्रीकंठ शिवाचार्य महाराज नागनसुर यांनीही थोडक्यात धर्म संदेश देताना वीरशैव धर्माचे, आचरणाचे महत्त्व सांगितले, काशी जगदुरुंनी आशीर्वाचन करताना १५ मे रोजी काशी पिठाच्या उत्तराधिकारी पदी निवड झाली व त्यानंतर हजारो भक्तगणांच्या उपस्थितीमध्ये हा खूप मोठा अडपालखी सोहळा झाला, भक्तगणांची भक्ती पाहून आम्हाला आनंद झाला, तपोरत्न महालिंगेश्वर महाराजांनी जे आचरण सांगितले आहे. ते आचरण तुम्ही करा, बाळ आईजवळच रडत असते,सुखदुःख प्रश्न गुरु जवळ मांडा, त्या सर्वांचे उत्तरे गुरूकडे असतात, गुरुच्या सानिध्याने तुमच्यातील राग, लोभ, मोह, माया, द्वेष कमी होत असतो, गुरु स्वत्वाची जाण !, गुरु श्रद्धेच स्थान! गुरु असे महान सकल जगी !! कारण गुरु हे माऊली असतात आपण आई नंतर गुरुंनाच माऊली म्हणतो, आज इथून जाताना सद्विचार, आचार घेऊन जा, असे आव्हान त्यांना उपस्थितांना केले, सर्व भक्तांच्या प्रसादाची व्यवस्था रेणुक विद्यालय प्रांगणामध्ये करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बर्दापूर, कोळ कानडी, सामनगाव, पुस,सोनपेठ, तत्तापुर, वरवंटी, शिवनी, भोसा, भुसणी, मसला, सिंदखेड, हरंगुळ,जायफळ ,मुरुड, अकोला,समुद्रवाणी, कोंड या भागातील हजारो महिला व पुरुष उपस्थित होते,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिवानंद गुळवे यांनी केले तर आभार प्रदर्शन मठसंस्थांनचे विश्वस्त श्री रेवणसिद्ध हिरेमठ यांनी केले.






No comments:
Post a Comment