वरपूडकर महाविद्यालयात डी झोन खो खो क्रीडा स्पर्धा संपन्न
सोनपेठ येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन ड' झोन खो-खो स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत १० संघांनी सहभाग नोंदवला.या स्पर्धा दिनांक 6 ऑक्टोबर 2022 रोजी महाविद्यालयाच्या मैदानावर संपन्न झाल्या. परभणी व हिगोली जिल्ह्यातील मुलांच्या व मुलीच्या संघाने सहभाग नोंदवला. यामध्ये मुलीचे मिळून दहा शिवाजी महविद्यालय परभणी, ज्ञानोपासक महाविद्यालय जिंतुर , बहीर्जी महाविद्यालय वसमत,के के एम महाविद्यालय मानवत,न्यु माँडेल काँलेज हिंगोली,कै.रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ या संघाने सहभाग नोंदवला.विजेत्या खेळाडूनां प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले यामध्ये शिवाजी महाविद्यालय परभणी च्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. ज्ञानोपासक महविद्यालय जिंतूर संघाने द्वीतीय क्रमांक पटकावला.तर कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. विजयी संघाला महाविद्यालयाकडुन ट्राँफी देण्यात आली.मुलांमध्ये के के एम महाविद्यालय मानवत च्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला, श्री शिवाजी महविद्यालय परभणी चा संघ द्वीतीय तर कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या संघाने त्तृतीय क्रमांक पटकावला. याच ठीकाणी ड झोन ची निवड चाचणीतून संघ निवडण्यात आला निवड चाचणी साठी स्व.नितीन महाविद्यालय पाथरी,नुतन महाविद्यालय सेलू,संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड येथील खेळाडू सहभागी झाले.या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री परमेश्वरराव कदम (अध्यक्ष, हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ सोनपेठ) यांची उपस्थिती होती. तर उद्घाटक म्हणून सोनपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदीप बोरकर साहेब यांची उपस्थिती होती.प्रमुख पाहुणे म्हणून ड झोन क्रीडा स्पर्धा चे सचिव मा.डॉ मीनानाथ गोमचाळे, पत्रकार श्री गणेश पाटील श्री शिवमल्हार वाघे,सोनपेठ दर्शन चे संपादक श्री किरण स्वामी हे होते. स्पर्धा संयोजक प्राचार्य डॉ.वसंत सातपुते व क्रीडा संचालक डॉ. गोविंद वाकणकर यांनी स्पर्धेसाठी पंच म्हणून डॉ.नागनाथ गजमल, डॉ.निरंजन अखमार,डॉ.पवन पाटील,श्री लांडगे एम एस,डॉ.माधव कदम,डॉ अंकुश सोळंके,डॉ.संतोष कोकीळ,डॉ.कमलाकर कदम,प्रा.नारायण शिंदे,डॉ मुकुंदराज पाटील(वि.ह.क.समन्वयक), महाविद्यालयातील क्रीडा समितीचे सदस्य डॉ.कल्याण गोलेकर,डॉ.संतोष रणखांब,डॉ. अशोक जाधव,डॉ मुक्ता सोमवंशी,डॉ मारोती कच्छवे, डॉ.बालासाहेब काळे,डॉ.शिवाजी अंभुरे,डॉ साहेबराव सोनसळे, प्रा.अंगद फाजगे,प्रा.सकाराम कदम,प्रा.विकास रागोले,प्रा.संदिप देवराये,डॉ.अनंत सरकाळे,डॉ अशोक चव्हाण,डॉ सूनिता टेंगसे,डॉ.प्रा.दिल्लीप कोरडे, प्रा.महालिंग मेहत्रे,श्री सचिन साबळे,श्री रोहित शिंदेप्रा कैलास आरबाड,दत्ता सोनटक्के,चद्रंपाल पटके,भागवत हाके या सर्वांनी स्पर्धा यशश्वीतेसाठी मदत केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष रणखांब यांनी केले.तर आभार क्रीडा संचालक डॉ.गोविंद वाकणकर यांनी मानले.





No comments:
Post a Comment