गणेश नगर येथे सुमित पवार यांच्या हस्ते साईबाबा यांची आरती संपन्न
सोनपेठ शहरातील गणेश नगर येथे दि.५ आँक्टोबर विजयदशमीच्या निमित्ताने श्री साईबाबा मंदिर येथे गणेश नगर मित्र मंडळ यांच्या वतीने युवा नेते सुमित पवार यांच्या हस्ते आरती ठेवण्यात आलेली होती व त्यानिमित्ताने आरतीसाठी उपस्थित राहून श्री साईबाबा यांची आरती करून श्री साईबाबाचे दर्शन घेतले व सर्वांना विजयदशमीच्या शुभेच्छा दिल्या व महाप्रसादाचा लाभ घेतला.शिर्डी येथील श्री साईबाबांनी 1918 साली दसऱ्याच्या दिवशी दुपारी अखेरचा श्वास घेतला.असे म्हणतात की साई बाबांनी आपल्या भक्तांना सांगितले की दसऱ्याचा दिवस त्यांच्यासाठी जगाचा निरोप घेण्याचा सर्वोत्तम दिवस होता आणि त्यांनी आधीच सूचित केले होते.त्यांनी 15 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी शिर्डीत समाधी घेतली.अन्नपाण्याचा त्याग करून, नश्वर देहाचा त्याग करून ते ब्रह्मलीन झाले होते,तो दिवस विजयादशमी दसर्याचा दिवस होता.या प्रसंगी साईबाबा मंदिर चे निर्माते महादेव मोरे, गणेश नगर येथील नागरिक व शहरातील साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment