Saturday, October 29, 2022

व्यापारी बांधवांनी लोकसहभागातून आपल्या दुकानाच्या बाहेर ही सिसीटिव्हि कॕमेरे बसवावेत - सपोनी संदिप बोरकर

व्यापारी बांधवांनी लोकसहभागातून आपल्या दुकानाच्या बाहेर ही सिसीटिव्हि कॕमेरे बसवावेत - सपोनी संदिप बोरकर 
सोनपेठ (दर्शन) :-

परभणी जिल्ह्यात होत असलेल्या घरफोडी व चोरीच्या अनुषंगाने सोनपेठ शहरातील सर्व प्रतिष्ठित व्यापारी नागरिक यांची पोलीस ठाणे येथे दि.29 आक्टोबर शनिवार रोजी मीटिंग घेऊन चर्चा केली त्यावेळी सोनपेठ शहरातील प्रमुख ठिकाणी 20 सीसीटीव्ही कॅमेरे लोकसहभागातून बसवण्याबद्दल नियोजन केले आहे तसेच आमच्या आव्हानानंतर सराफा असोसिएशन ने शटरला सायरन बसविलेले आहेत इतर दुकानांना पण बसविण्याबद्दल चर्चा करून बसविण्याची कारवाई करत असल्याची माहिती सपोनी संदिप बोरकर यांनी दिली.तसेच व्यापारी बांधवांनी लोकसहभागातून आपल्या दुकानाच्या बाहेर ही सिसीटिव्हि कॕमेरे बसवावेत व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.व्यापारी महासंघ अध्यक्ष कृष्णा कुसुमकर, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशीऐशन अध्यक्ष सुरेश लोढा,सराफा असोशीऐशन अध्यक्ष विष्णूपंत दिहिवाळ, व्यापारी महासंघाचे सचिव आश्रोबा खरात पाटील यांच्या सह अनेक असोशिऐशन चे पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते.याप्रसंगी पोलीस निरीक्षक, अंमलदार, पोलीस हेडकॉन्स्टेबल व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

विमा कंपन्यांची तालुकास्तरीय कार्यालये तातडीने सुरु ; कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले होते आदेश विमा,महसूल व तालुका कृषि अधिका-यांचे संपर्क क्रमांक जाहीर

विमा कंपन्यांची तालुकास्तरीय कार्यालये तातडीने सुरु ; कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले होते आदेश
विमा,महसूल व तालुका कृषि अधिका-यांचे संपर्क क्रमांक जाहीर
परभणी / सोनपेठ (दर्शन) : -

कृषि मंत्री अब्दुल सत्तार हे परभणी जिल्हा दौ-यावर आले असता  जिंतूर तालुक्यात शेतक-यांनी विमा कंपनी प्रतिनिधींकडून देण्यात येणा-या वागणुकीबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यावर कृषि मंत्री श्री. सत्तार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत विमा कंपनी प्रतिनिधी, महसूल विभागाचे अधिकारी आणि तालुका कृषि अधिकारी यांनी समन्वय ठेवत शेतक-यांच्या अडचणी तातडीने सोडविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रभारी जिल्हाधिकारी राजेश काटकर यांनी संबंधित तालुकास्तरीय अधिका-यांचे संपर्क क्रमांक जाहीर केलेले आहेत.
 
जिल्ह्यातील शेतक-यांना आता पिक विम्याबाबत येणा-या अडचणी तात्काळ सोडविल्या जाणार आहेत. कृषिमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रतिनिधीने प्रत्येक तालुकास्तरावरील कार्यालये तात्काळ सुरु केली आहेत. यामुळे शेतक-यांना दिलासा मिळणार आहे. 

कृषि मंत्री श्री. सत्तार यांच्या दौ-यादरम्यान जिंतूर तालुक्यात पिक विमा कार्यालय बंद असल्याचे निदर्शनास आले होते. त्याचबरोबर जिल्हाभरात पिक विमा कंपनीची सर्व कार्यालये बंद असल्याचे शेतक-यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. पिकविमा कंपनीचे कर्मचारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित नसणे, शेतक-यांचा समक्ष व भ्रमणध्वनीवरून संबंधित कर्मचा-याचा फोनवर संपर्क न होणे, तसेच प्रत्यक्ष भेटी न घेणे, शेतक-यांच्या विमाविषयक तक्रारीचा तातडीने निपटारा न करणे अशा स्वरुपाच्या तक्रारी शेतक-यांनी केल्या होत्या.  त्याबाबत मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत बैठकीला उपस्थित असलेल्या जिल्हा प्रतिनिधीला तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्या अनुषंगाने पिक विमासंबंधित कंपनीचे अधिकारी-कर्मचारी यांच्याशी संपर्क करून तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पिक विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, नायब तहसीलदार यांचे संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत.

विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक किशोर वळसे (7208912084) आणि संतोष अशोकराव बेद्रे,  (7028213555), तर तालुका समन्वयक अर्जुन हरीभाऊ मोरे गंगाखेड (9767462257), आकाश हरिभाऊ अंबलिगे जिंतूर (9588482709)  शुभम रमेश कावळे, मानवत (9545995442), राजू लक्ष्मणराव खुळे, पालम  (9766030170),केशव ग्यानदेव शेळके, परभणी (9503493655), सतीश शुभाषराव बेद्रे, पूर्णा (9370199847), विनोद देवराव झाडे, सेलू (8830411415), आकाश राजाभाऊ मोरे, सोनपेठ (9146920614), सुरज ज्ञानोबा लाटे, पाथरी (8446342191) हे  विमा कंपनीचे प्रतिनिधी आहेत.

नित्यानंद मुंजाजी काळे, तालुका कृषी अधिकारी, परभणी (9767007688), आर. एच. तांबीले, पुर्णा (7218654769), जी. ए. कोरेवाड, सोनपेठ (9423173366), ए.जे. देशमुख, पालम (7057232305), पी.बी. बनसावडे, गंगाखेड (7588571115), एस.पी.काळे, जिंतूर (9422725727),पी. एस. नांदे, पाथरी (9423442160), डी.टी. सामाले, सेलू (9423774133) आणि पी. एच. कच्छवे, मानवत (9096595997) यांचा समावेश आहे.

एल. व्ही. खळीकर, नायब तहसिलदार, परभणी (8329150935), के. व्ही. मस्के, पूर्णा (8390247049), प्रकाश गायकवाड, सोनपेठ  (8208967814), आर. एन. पवळे, पालम, (8698184177), सुनिल कांबळे, गंगाखेड  (9049880750), ओमप्रकाश गौंड,जिंतूर (7276993051), संदीप साखरे, पाथरी (7720972431), प्रशांत थारकर,सेलू (9588607076), बी. आर. वटाणे, मानवत (8830650810) आणि परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 02452-226400 आहे. शेतक-यांना पिक विम्याशी संबंधित अडचणी आल्यास वरील विमा कंपनी प्रतिनिधी,तालुका कृषि अधिकारी आणि नायब तहसीलदार यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजेश काटकर यांनी केले आहे.

Friday, October 21, 2022

प्रा.कालिदास कुलकर्णी यांची पुस्तकं लिखाण कार्याबद्दल राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड

प्रा.कालिदास कुलकर्णी यांची पुस्तकं लिखाण कार्याबद्दल राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड

 
               सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ येथील श्री महालिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.कालिदास रामकृष्ण कुलकर्णी यांची महात्मा फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. प्रा.कालिदास कुलकर्णी हे श्री महालिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालय सोनपेठ येथे सण 1994 पासून एम.सी.व्ही.सी.विभागात कार्यरत आहेत ते एक उत्कृष्ट अध्यापक असून मनमिळावू,विद्यार्थी प्रिय,समाजकार्यात अग्रेसर असणारे,नेहमीच मदतीचे हात सदैव पुढे असणारे, प्रा.कालिदास कुलकर्णी हे सर्वांना परिचित आहेत.ते त्यांच्या उत्कृष्ट सामाजिक,शैक्षणिक कार्यातून जाणवते. वाचनाची आवड,सामाजिक कार्याची आवड,त्याचबरोबर सांस्कृतिक वारसा असलेले प्रा.कालिदास कुलकर्णी हे महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतर्गत "इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी" या अभ्यासक्रमाचे पुस्तक लेखनाचे काम त्यांनी केलेले आहे. विशेष या कार्याची दखल घेऊन महात्मा फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य यांनी त्यांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे.प्रा.कालिदास कुलकर्णी यांना नुकतेच पुरस्कार निवडीचे पत्र प्रदेश अध्यक्ष श्री व्यंकटराव जाधव,परभणीचे जिल्हाध्यक्ष प्रा.गोविंद लहाने,उपाध्यक्ष प्रा.सिद्धार्थ सोनाळे यांच्या हस्ते देण्यात आले.महात्मा फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित केलेल्या शिक्षण परिषद व पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे दिनांक 30 ऑक्टोबर 2022 ला मान्यवरांच्या हस्ते हा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जाणार आहे त्यांच्या या निवडीबद्दल श्री महालिंगेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम यांच्या वतीने तसेच श्री महालिंगेश्वर विद्यालय अध्यक्ष ष.ब्र.108 चन्नबसव शिवाचार्य महाराज, सचिव सुभाषआप्पा नित्रुडकर, संस्था सदस्य,सा.सोनपेठ दर्शन परिवार, विद्यार्थी, पत्रकार, मित्र परिवार व सर्वस्तरातून अभिनंदन होताना दिसत आहे.

परभणी आगार प्रमुखाचा मनमानी कारभार ; दीपावलीच्या सणासुदीत महिलांची हेळसांड

परभणी आगार प्रमुखाचा मनमानी कारभार ; दीपावलीच्या सणासुदीत महिलांची हेळसांड



सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ पोखर्णी शिर्शी मार्गे सोनपेठ बस तासा तासाला सुरु असताना दिपावली सारख्या सनाला बस असताना रद्द करणे,दोन तासांनी बस सोडणे, सोनपेठ पर्यंत बस न सोडता शिर्शी पर्यंत सोडणे,अशा पद्धतीने परभणी आगार प्रमुखाचा मनमानी कारभार वाढलेला दिसून येत आहे, ट्रॅव्हल्स वाल्यांची हफ्ते खोरी दीपावली सारख्या सणाला रंग आणत आहे ? अशी चर्चा होताना दिसत आहे, माननीय मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री परभणी आगार प्रमुखाकडे लक्ष द्या अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होताना दिसत आहे, झोपेचं सोंग केलेल्या आगर प्रमुखाला उठवणार कोण ? असाही सवाल सर्वसामान्य जनतेतून पडलेला दिसून येत आहे, सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार हा दीपावलीच्या सणासाठी ट्रॅव्हल्स चे भाडे भरू शकत नाही त्याला एकमेव पर्याय बसचा असून बसचा असा तुघलगी कारभार पाहता शिर्शी पर्यंत आलेल्या बसमधून महिलांची हेळसांड झालेली दिसून येत आहे. लवकरात लवकर परभणी आगार प्रमुखांना सूचना देऊन ज्या ठिकाणी अर्ध्या तासाला शटल सेवा आहे त्या ठिकाणच्या गाड्या इतरत्र वळत्या करून इतर मार्गावर धावाव्यात अशी सूचना करावी अशी जनतेतून मागणी होताना दिसत आहे.

Thursday, October 20, 2022

दिवाळी सण - एक आध्यात्मिक संदेश.... गुरुदेव श्री आशुतोष महाराज जी,संस्थापक एवं संचालक, दिव्य ज्योति जाग्रति संस्थान.

दिवाळी सण - एक आध्यात्मिक संदेश....
गुरुदेव श्री आशुतोष महाराज जी,संस्थापक एवं संचालक, दिव्य ज्योति जाग्रति संस्थान.
सोनपेठ (दर्शन) :-

            सूर्योदयापासून सुरू होणारा प्रत्येक दिवस मानवी सभ्यतेच्या महान गाथेतील एक सुवर्ण अध्याय म्हणून येतो. पण काही दिवस आपल्यातच इतके महत्त्वाचे संदेश घेऊन येतात की मानव समाज त्यांना युगानुयुगे विसरू शकत नाही. असे अविस्मरणीय दिवस सण किंवा उत्सव म्हणून साजरे केले जातात. विशेषत: सणांच्या संदर्भात भारत हा सर्वात समृद्ध देश आहे. सण हे भारतीय संस्कृतीचे प्राण आहेत. ते जीवनावश्यक आणि पौष्टिक आहेत. कारण भारतीय सणांमध्ये ती ऊर्जा आहे, ज्यामध्ये कर्मकांडापासून वंचित राहिलेल्या मानव जातीला पुन्हा जिवंत करण्याची क्षमता ठेवते.
             कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जाणारा  'दीपावली उत्सव'या सांस्कृतिक उत्सवांच्या मालिकेत, मुकुटमणी स्थानावर आहे. या उत्सवाच्या नावावरूनच त्याचे तेज आणि दिव्यता दिसून येते. 'दीप' म्हणजे दिवा, 'अवली' म्हणजे पंक्ती. म्हणजेच दिव्यांची पंक्ती. या सणाच्या दिवशी, लखलखणारे दिवे एकच संदेश देतात – तुमच्या अंतरंगातील तमोगुण दूर करा. मिणमिणते दिवे आपल्याला अंतर्मनात ईश्वर-ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करण्यास सांगतात, अमावस्या कितीही अंधारलेली असो, अंतरंगात आमच्यासारखे प्रकाशमान व्हा.
             हा उत्सव भव्यतेचा उत्सव नाही. तो महान संदेशांचा वाहक आहे. दीपावली साजरी करण्यामागचे सर्वात लोकप्रिय कारण पाहिल्यास, आपल्या लक्षात येईल की हा मुख्यतः श्री राम-सीता अयोध्येत परतल्याचा आनंदाचा उत्सव आहे. त्रेतायुगातील हा संपूर्ण प्रसंग एक अलौकिक संदेश देऊन जातो. अध्यात्मिक दृष्टिकोनानुसार सीता हे आत्म्याचे प्रतीक आहे. मनाच्या रूपात रावणाचे शरीर म्हणून तो लंकेत कैद आहे. मनातील इच्छा आणि विकार हे आसुरी शक्तींचे प्रतीक आहेत. नाना प्रकारच्या यातना आणि प्रलोभने देऊन ते आत्म्याला सतत त्रास देत आहेत. अशा स्थितीत श्री हनुमान रामदूत म्हणून अशोक वाटिकेत पोहोचले, अशी महती आहे. हरणाच्या वेळी रावणाचा ऋषी वेश पाहून सीताजींची एकदा फसवणूक झाली होती. त्यामुळेच यावेळी त्यांचा हनुमानजींवर विश्वास बसला नाही. त्यांनी रामदूत असल्याचा पुरावा मागितला. हनुमानजींनी त्यांच्यासमोर भगवान श्रीरामाची मुहर पुरावा म्हणून मांडली. या रिंगणात सीताजींना रामाचे प्रत्यक्ष दर्शन झाले. हे पाहूनच त्यांनी हनुमानजींना रामाचे दूत म्हणून स्वीकारले. परमेश्वराच्या अलौकिक दर्शनाने निराश झालेल्या सीतेच्या मनात अढळ विश्वास निर्माण केला की तिला लवकरच परमेश्वराच्या भेटीचा आनंद मिळेल. हीच श्रद्धा, हे आश्वासन प्रत्येक युगात, प्रत्येक जीवाला स्वतःसाठी हवे असते. रामदूत हनुमान हे परिपूर्ण सतगुरूचे प्रतीक आहे. आपल्या आत्म्यालाही अशा सत्गुरूची नितांत गरज आहे, जेणेकरून मनाच्या रूपाने रावणाच्या राजवटीतून मुक्त व्हावे.
           ही कथा आणखी एका महत्त्वाच्या सत्यावर प्रकाश टाकते. सध्या सर्वत्र भगवे कपडे घातलेले प्रचारक दिसत आहेत. अशा स्थितीत सीताजींप्रमाणेच प्रत्येक साधकाला आपल्या सिद्धतेचा पुरावा त्यांच्याकडून मागावा लागतो. जे परिपूर्ण गुरू आहेत, ते ब्रह्मज्ञानाचा शिक्का पुरावा म्हणून देतील. या ज्ञानाद्वारे शिष्याला त्याच्या आत असलेल्या परम प्रकाशाचे (श्री राम) प्रत्यक्ष दर्शन होईल. किंबहुना हाच गुरूंच्या सत्यनिष्ठेचा पुरावा आहे. मग ज्याप्रमाणे सीताजींना आपल्या मुक्तीची पूर्ण खात्री झाली होती, त्याचप्रमाणे खर्‍या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शिष्याला पूर्ण खात्री होते. त्याच्याकडून भगवंताचे दर्शन घेतल्यानंतर तोही मुक्तीच्या मार्गावर पूर्ण श्रद्धेने आणि भगवंताशी एकरूप होऊन पुढे जातो आणि निःसंशयपणे गंतव्यस्थान प्राप्त करतो. परिपूर्ण सतगुरूच्या सान्निध्यात, शिष्य स्वतःमध्ये अलौकिक दीपावली साजरी करतो. सत्गुरूंच्या कृपेने त्यांचे हृदय दिव्य दिव्यांनी, असंख्य दीपशिखांनी आणि सोनेरी प्रकाशाने भरलेले असते आणि हेच या प्रकाशोत्सवाचे सार्थक रूप आहे. दिव्य ज्योती जागृति संस्थेतर्फे सर्व वाचकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

Monday, October 17, 2022

गुरुवर्य बाबुदेव महाराज जोशी (बप्पा) यांच्या ९ व्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

गुरुवर्य बाबुदेव महाराज जोशी (बप्पा) यांच्या ९ व्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ शहरातील पोथीचा वाडा येथे वे.शा.सं.वै. गुरुवर्य बाबुदेव महाराज जोशी (बाप्पा) यांच्या ९ व्या पुण्यतिथी निमित्त दि. १६ ऑक्टोबर रोजी अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा व कीर्तनास प्रारंभ करण्यात आला आहे. 
वे.शा.सं.वै. गुरुवर्य बाबुदेव महाराज जोशी (बाप्पा) यांच्या ९ व्या पुण्यतिथी निमित्त शहरातील पोथीचा वाडा येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात पहाटे ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ६ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी २ ते सायं. ५ श्रीमद् भागवत कथा, सायं. ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ ते ११ हरिकिर्तन व नंतर जागर होणार आहे. भागवत प्रवक्ते ह.भ.प.श्री.भागवतरसिक माधव महाराज कुरे सोनपेठकर यांच्या मुखातून श्रीमद् भागवत कथेचे श्रवण होणार आहे.तसेच दि.१६ ऑक्टोबर रविवार रोजी श्री.ह.भ.प. अमोल महाराज गोरे किर्तन झाले, दि. १७ रोजी श्री.ह.भ.प. वैजनाथ महाराज मुळे धामोणी यांचे किर्तन झाले तर आज दि. १८ रोजी श्री.ह.भ.प. पारसमल महाराज ललवाणी सिरसाळा, दि. १९ रोजी श्री.ह.भ.प.प्रशांत महाराज तोरे लातूर, दि. २० रोजी श्री.ह.भ.प. नामदेव महाराज फपाळ, दि. २१ रोजी श्री.ह.भ.प.सोमनाथ महाराज बदाले, दि २२ रोजी श्री.ह.भ.प.माधव महाराज कुरे आदिंचे किर्तन होणार आहे तर दि २३ रोजी सकाळी ११ ते १ श्री.ह.भ.प.शरद महाराज आंबेकर यांचे काल्याचे किर्तन होईल व नंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होइल.तरी सर्व भाविकांनी भागवत कथा, कीर्तन श्रवणाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान आयोजक समस्त भक्त मंडळी सोनपेठ यांनी केले आहे.

Sunday, October 16, 2022

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका कार्याध्यक्ष पदी कुलदीप भोसले यांची नियुक्ती

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका कार्याध्यक्ष पदी कुलदीप भोसले यांची नियुक्ती

सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुक्यात नियोजित शरद युवा संवाद यात्रे निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सोनपेठ तालुका कार्याध्यक्ष पदी कुलदीप भोसले यांची नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली आहे.कुलदीप भोसले यांनी गेल्या १०-१२ वर्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मध्ये काम केले.पक्षाने पुन्हा दखल घेत त्यांना संधी दिली आहे.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख,चंदन पाटील नगराळकर, राजेश विटेकर,परभणी जिल्ह्याचे युवक राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रितेश काळे,माजी नगरसेवक ॲड.श्रीकांत विटेकर,अब्दुल रहेमान सौदागर आदीसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका व शहर पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह सर्व स्तरातून अभिनंदन होताना दिसत आहे.

Saturday, October 15, 2022

प्रा.सिद्धार्थ आबाजी तायडे यांना नाट्यशास्त्र विषयात पीएच.डी.प्रदान

प्रा.सिद्धार्थ आबाजी तायडे यांना नाट्यशास्त्र विषयात  पीएच.डी.प्रदान

परळी / सोनपेठ (दर्शन) :-

 प्रख्यात सिने-नाटय लेखक-दिग्दर्शक-अभिनेता-समीक्षक व संशोधक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या वतीने आंतरविद्या शाखाअंतर्गत नाट्यशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,नाट्यशास्त्र विभागातील संशोधन मार्गदर्शक डॉ. अशोक बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली 'मराठी दलित रंगभूमीचा चिकित्सक अभ्यास' या विषयात त्यांनी संशोधन केले आहे . मुंबई विद्यापीठ लोककला अकादमीचे  विभाग प्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे बहिस्थ परीक्षक म्हणून उपस्थित होते तर  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. स्मिता साबळे अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या.
या यशाबद्दल स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी आमदार शिवाजीराव चोथे, संत रामदास महाविद्यालय घनसावंगीचे प्राचार्य डॉ.आर. के. परदेशी,कोषाध्यक्ष डॉ. संभाजी चोथे,सचिव श्री.विनायक चोथे, उपप्राचार्य प्रा. प्रमोद जायभाये,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. भगवान मिरकड, डॉ. राजू सोनवणे, गोरख चोथे, आंतर विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. चेतना सोनकांबळे,प्रा. दत्ता भगत, प्रेमानंद गज्वी,बलभीम तरकसे,प्रोफेसर डॉ. संजय जाधव,प्रा. गौतम गायकवाड,प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे,प्राचार्य डॉ. दादाहरी कांबळे,डॉ. दिनेश मोरे,डॉ. सतीश साळुंके, प्रकाश त्रिभुवन, डॉ. ऋषिकेश कांबळे,डॉ. प्रवीण भोळे,
डॉ. सतीश पावडे, डॉ. संजय पाटील,डॉ. मंगेश बनसोड,प्रा. किशोर शिरसाठ,डॉ. देवदत्त म्हात्रे, डॉ.जितेंद्र पानपाटील, राजकिशोर मोदी,डॉ. संपदा कुलकर्णी,प्रा. दीपक गरुड, डॉ. विलासराज भद्रे,डॉ.अनिलकुमार साळवे,डॉ. संजीवनी साळवे,सिल्व्हर ओक फिल्म अँड एंटरटेनमेंटचे निर्माता मनोज कदम,अमृत मराठे,महादेव किरवले, रवींद्र जोगदंड,राजकुमार तांगडे,डॉ. वैशाली बोदेले,प्रा. गजानन दांडगे,डॉ. केदार काळवणे,प्रा. प्रशांत भोले,नाथराव वाव्हळ, विष्णू तायडे,भगवान जगताप, अविनाश वाव्हळ, अजय जगताप,
आबासाहेब वाघमारे,प्रा.एस. एल. देशमुख,विजय जाधव,प्रा. दासू वाघमारे, प्रा. रघुनंदन खरात, अरुण सरवदे,डॉ.  धनंजय वडमारे,डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे,प्रा. रमेश धोंडगे,डॉ. संजय पाईकराव,डॉ सचिन बनसोडे,प्रा. अर्जुन पाटेकर,डॉ. हसन इनामदार, इरफान इनामदार, मारोती जाधव, साहित्यिक रानबा गायकवाड,नागनाथ बडे, दत्ता वालेकर,बाजीराव धर्माधिकारी,    चंदुलाल बियाणी, ए.तु. कराड,प्रदीप भोकरे,प्रा. विलास रोडे, गोपाळ आंधळे,मोहन व्हावळे,अनंत इंगळे, रवी जोशी,सिध्दार्थभाऊ हत्तीआंबीरे,अमर हबीब,दगडू लोमटे,डॉ. राजेश इंगोले,डॉ. मुकुंद राजपंखे, पत्रकार अविनाश मुडेगावकर, डॉ. गणेश मुडेगावकर,मुरली फड, अमोल अरगडे,मिलिंद मस्के, राहुल हातागळे,डॉ. प्रवीण खरात,प्रा. विनोद लांडगे,प्राचार्य डॉ. अरुण दळवे, डॉ. मुंजाभाऊ धोंडगे,डॉ. बळीराम पांडे,डॉ. गणेश शिंदे,बा. सो. कांबळे, सिद्धेश्वर इंगोले,विजय जाधव,डॉ. गहिनीनाथ वळेकर,महादू सावंत,किशोर जांगडे,प्रा. कैलास पुपुलवाड, डॉ. तुकाराम देवकर, राहुल वानखेडे, राहुल पांडव, योगेश इरतकर,जॉन भालेराव, डॉ.शिवा वावळकर, डॉ. मिलिंद व्हावळे, डॉ. सतीश मस्के, डॉ. सतीश वाघमारे,प्रा. राज दवणे,प्राचार्य अरुण पवार, डॉ. राजकुमार यल्लावाड ,प्रा.डॉ. माधव रोडे, अनंत मुंडे, केशव कुकडे,प्रा. संजय आघाव,प्रा. डॉ. चंद्रकांत जोगदंड,गोविंद मुंडे,दत्ताभाऊ  सावंत, दत्ता लांडे,ब्रम्हानंद कांबळे,सुभाष वाघमारे, शैलेश लांडगे, दिवाकर जोशी,आसिफ अन्सारी,डॉ. सय्यद अमजद,  प्रा.रवींद्र जोशी,भगवान साकसमुद्रे,अ‍ॅड.
 दिलीप उजगरे, डॉ. संतोष रणखांब,
प्रा.विक्रम धनवे,डॉ. दयानंद झिंझुर्डे, डॉ. चंद्रशेखर कणसे,प्राचार्य सी. व्ही. गायकवाड,प्राचार्य डॉ. रमेश इंगोले,बालासाहेब इंगळे,प्रा. राम पेंटेवार ,भगवंत पवार,प्रा. राजाभाऊ होके, प्रा. बी.एम.खरात, ऍड.अमित गिरवलक,अरविंद दहीवाडे,दादासाहेब कसबे ,राजू वाघमारे,संतोष पोटभरे,डॉ. बबन मस्के, प्रा.शंकर सिनगारे,स्वप्नील सिद्धांती,अतुल कसबे,प्रा. संकेत तोरंबेकर,डॉ. दत्ता हिरवे, पंकज भटकर,डॉ. सचिन भूंबे ,डॉ. राम मोरे, प्रा. ज्ञानेश्वर खोडवे, प्रा. सत्यम पवार,पत्रकार महादेव गोरे,पत्रकार किरण स्वामी, शेख जावेद, शशिकांत कुलथे,मदन ईदगे ,सुनील जावळे,किशोर दहिवाडे, हरिदास घुंगासे,विकास वाघमारे,पृथ्वी शिंदे, नवनाथ दाणे, शेख गणी,निवृत्ती खंदारे, राजू डापकर, डॉ. योगेश कुलकर्णी, डॉ. लक्ष्मण जोगदंड, शशिकांत बडे,गणेश बुरांडे, धपाटे,डॉ. शशिकांत पाटील, डॉ. मारोती घुगे, डॉ. आर. के. राऊत, डॉ.गजानन अवचार, प्रा. रमेश होसुरकर,पत्रकार प्रा. तुळशीदास घोगरे, संभाजी घोगरे,संभाजी तांगडे,डॉ. संतोष आडे,डॉ. सचिन संगेकर, श्री. लक्ष्मीकांत पुंडलिक ,डॉ. काकासाहेब धायगुडे, प्रा. मनोज गवळी,डॉ. योगेश देसाई,अनंत आडसुळे, पत्रकार प्रमोद आडसुळे,पत्रकार शेखर मगर, गणेश नरवाडे, तुषार बोडखे,डॉ. धनंजय रायभोळे, डॉ. वीरा राठोड, डॉ. सुदाम राठोड,प्रा. रमेश वाघ यांचेसह ,विद्यार्थी,साहित्यिक, पत्रकार, कलावंत आदींनी प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे  यांचे अभिनंदन केले आहे.

परतीच्या पावसाने शेतकर्‍ यांच्या पिकात पाणी अन् डोळ्यातही ; शिंदे सरकार जागे व्हा असा टाहो

परतीच्या पावसाने शेतकर्‍ यांच्या पिकात पाणी अन् डोळ्यातही ; शिंदे सरकार जागे व्हा असा टाहो 



सोनपेठ (दर्शन) :-

शेतामध्ये सोयाबीन काढणी कापणीचे काम चालू असताना मध्येच पावसाने पचका केल्याने शेतकर्‍यांची चांगलीच फजिती झाली. सोनपेठ तालुक्यातील अनेक मंडळात तर आजही पावसाचे पाणी शेतात डबडब करत होतं. शेतकर्‍यांनी याच गुडघाभर पाण्यामधून उरलंसुरलं सोयाबीन बाहेर काढून धुर्‍यावर टाकलं. हातातोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत भिजत असल्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यांमध्ये अक्षरशः पाणी आलंं.सोनपेठ तालुक्यातील सर्वच मंडळांमध्ये परिसरामध्ये परतीच्या पावसाने वादळी वार्‍यासह विजेच्या कडकडाटामध्ये परतीचा जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सोयाबीन कापसाचे अतोनात नुकसान झाले. काही ठिकाणी तर खळ्यामध्ये पाणी घुसल्याने काढलेले सोयाबीनही भिजले आहे. आज दुसर्‍या दिवशीदेखील शेतामध्ये पाणी साचून होतं. शुक्रवारी कापणी करून ठेवलेले सोयाबीन दुसर्‍या दिवशी शनिवारी  शेतकर्‍यांनी दिवसभर ते धुर्‍यावर उपसून ठेवलंं. एकंदरीतच सोयाबीनच्या काढणी कापणीमध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकर्‍यांंची फजिती झाली. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने बळीराजाचा दम कोंडला होता.शेवटि शेतकरी राजा परतीच्या पावसाने शेतकर्‍ यांच्या पिकात पाणी अन् डोळ्यातही आता तरी शिंदे सरकार जागे व्हा असा टाहो .

Thursday, October 13, 2022

सोनपेठ येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शरद युवा संवाद यात्रेला प्रचंड प्रतिसाद

सोनपेठ येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शरद युवा संवाद यात्रेला प्रचंड प्रतिसाद
सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ येथे दिनांक 13 ऑक्टोबर 2022 गुरुवार रोजी ठिक सायंकाळी 6 सहा वाजता सोनपेठ शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेस घ्या वतीने फटाक्यांच्या आतिषबाजीत प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचे स्वागत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सभापती राजेश विटेकर यांनी केले व सोनपेठ शहरातील प्रमुख मार्गाने भव्य दिव्य अशी मोटरसायकल रॅली काढत प्रमुख नेत्यांची उघड्या जिप मध्ये मिरवणूक हि छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह येथे शरद युवा संवाद यात्रेस प्रारंभ केला,याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, चंदन पाटील नागराळकर, राजेश विटेकर, दशरथ पाटील सुर्यवंशी, विठ्ठल पाटील सुर्यवंशी, सुमंत वाघ, रितेश काळे,राम बेंद्रे युवक राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष, अशोक भुसारे युवक राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष,माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक सुहास काळे,अमर वरकड, विनोद चिमनगुंडे, अब्दुल रहेमान सौदागर, माजी सभापती, माजी पंचायत समिती सदस्य, माजी सरपंच, माजी चेअरमन, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका व शहर पदाधिकारी आदींची उपस्थिती होती, या ठिकाणीही मानाचा फेटा बांधत पुष्पहार घालून मेहबूब शेख यांचे स्वागत राजेश विटेकर व प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले, इतर मान्यवरांचे स्वागत राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका व शहर पदाधिकारी यांनी केले,याप्रसंगी शहरातील व तालुक्यातील अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यांना महेबुब शेख व राजेश विटेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रुमाल गळ्यात घालून स्वागत केले, यावेळी निसार शेख, बळीराम काटे यांच्या सह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले तर राजेश विटेकर यांनी शरद युवा संवाद यात्रे कशासाठी थोडक्यात सांगुन सर्वांचे आभार व्यक्त केले, समारोप प्रसंगी महेबुब शेख यांनी बोलताना शरद युवा संवाद यात्रा निमित्त सोनपेठकरांच्या या भव्य दिव्य स्वागत आणि भारावून गेलो आहे सोनपेठकरांना सोन्यासारखी नेतेमंडळी लाभली आहे असे मत व्यक्त करत शरदचंद्रजी पवार साहेबांनी महाराष्ट्राला काय दिले हे उदाहरणासह सांगितले यावेळी उपस्थितीतांनी भरघोस असा प्रतिसाद देत घोषणा देत जयघोष करत छत्रपती शिवाजी महाराज सभागृह दणाणून सोडले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक शेतकरी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

गुरु श्रद्धेचे स्थान, गुरु असे महान, सकल जगी - जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन महास्वामीजी

गुरु श्रद्धेचे स्थान, गुरु असे महान, सकल जगी - जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन महास्वामीजी
बर्दापुर / सोनपेठ (दर्शन) :-
बर्दापूर येथे दरवर्षी होणाऱ्या श्री गुरु महालिंगेश्वर महाराज यांचा पुण्यस्मरण उत्सव, काशीखंड पुराण समामी, यानिमित्त श्री श्री श्री १००८ काशी जगदुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचा अडपालखी उत्सव, व धर्मसभा आयोजित करण्यात आली होती, महास्वामीजींची मिरवणूक रेणुक विद्यालय बर्दापूर ते मठा पर्यंत वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात, लेझीम पथक, झांज पथक, व हजारो महिला व पुरुष भक्तगण पाऊले खेळत भक्तीमय वातावरणात काढण्यात आली, यानंतर झालेल्या धर्मसभेत काशी जगदुरु यांचा श्री गुरु चन्नबसव शिवाचार्य महाराज, महालिंगेश्वर विद्यालय सोनपेठ चे सचिव सुभाष अप्पा नित्रुडकर, मठ संस्थांचे विश्वस्त रामेश्वरअप्पा महाजन, शिवकुमार स्वामी लिंबेकर, यांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला,सर्व व्यासपीठावरील उपस्थित सर्व शिवाचार्य महाराजांचा सत्कार जगद्गुरु यांच्या हस्ते करण्यात आला, त्याच कार्यक्रमात पुस येथील वीरशैव समाज स्मशानभूमीसाठी एक एकर जमीन दान देणारे रामलिंगअप्पा महाजन , मंगलाबाई महाजन यांचा काशी जगदुरुंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मठ संस्थान बर्दापूरचे विश्वस्त सभासद रेवणसिद्ध हिरेमठ ,बालाजी बागल, शिवशंकर बिडवे यांच्या वतीने ही काशी जगदुरूंचा सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्री गुरु चन्नबसव गुरु महालिंग शिवाचार्य महाराज, मठ संस्थान बर्दापूर यांनी सांगितले की या कार्यक्रमाचे आयोजन सर्व भक्तांनी केले आहे, काशी जगदुरु बर्दापूर ला आल्यामुळे बर्दापूर येथे काशी अवतरली, ५० वर्षांनंतर पिठाधिश्चेर बर्दापूर मठ संस्थान येथे आले आहेत, आणि यामुळे दिवाळीच्या आधीच आपण दिवाळी साजरी केली आहे, संत येती घरा, तोची दिवाळी दसरा! व महालिंगेश्वर शिवाचार्य महाराजांच्या कार्याचा उल्लेख केला, श्री गुरु निरंजन शिवाचार्य महाराज औसा, श्री गुरु काशिनाथ शिवाचार्य महाराज पाथरी, श्री गुरु विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मानूर, श्री गुरु अमृतेश्वर शिवाचार्य महाराज जिंतूर, श्री गुरु निळकंठ शिवाचार्य महाराज मैंदर्गी, श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठ, श्री गुरु डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मन्मथ धाम, श्री गुरु रेणुक शिवाचार्य महाराज मंद्रूपकर, श्री गुरु श्रीकंठ शिवाचार्य महाराज नागनसुर यांनीही थोडक्यात धर्म संदेश देताना वीरशैव धर्माचे, आचरणाचे महत्त्व सांगितले, काशी जगदुरुंनी आशीर्वाचन करताना १५ मे रोजी काशी पिठाच्या उत्तराधिकारी पदी निवड झाली व त्यानंतर हजारो भक्तगणांच्या उपस्थितीमध्ये हा खूप मोठा अडपालखी सोहळा झाला, भक्तगणांची भक्ती पाहून आम्हाला आनंद झाला, तपोरत्न महालिंगेश्वर महाराजांनी जे आचरण सांगितले आहे. ते आचरण तुम्ही करा, बाळ आईजवळच रडत असते,सुखदुःख प्रश्न गुरु जवळ मांडा, त्या सर्वांचे उत्तरे गुरूकडे असतात, गुरुच्या सानिध्याने तुमच्यातील राग, लोभ, मोह, माया, द्वेष कमी होत असतो, गुरु स्वत्वाची जाण !, गुरु श्रद्धेच स्थान! गुरु असे महान सकल जगी !! कारण गुरु हे माऊली असतात आपण आई नंतर गुरुंनाच माऊली म्हणतो, आज इथून जाताना सद्विचार, आचार घेऊन जा, असे आव्हान त्यांना उपस्थितांना केले, सर्व भक्तांच्या प्रसादाची व्यवस्था रेणुक विद्यालय प्रांगणामध्ये करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बर्दापूर, कोळ कानडी, सामनगाव, पुस,सोनपेठ, तत्तापुर, वरवंटी, शिवनी, भोसा, भुसणी, मसला, सिंदखेड, हरंगुळ,जायफळ ,मुरुड, अकोला,समुद्रवाणी, कोंड या भागातील हजारो महिला व पुरुष उपस्थित होते,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिवानंद गुळवे यांनी केले तर आभार प्रदर्शन मठसंस्थांनचे विश्वस्त श्री रेवणसिद्ध हिरेमठ यांनी केले.

Monday, October 10, 2022

वरपूडकर महाविद्यालयात डी झोन खो खो क्रीडा स्पर्धा संपन्न

वरपूडकर महाविद्यालयात डी झोन खो खो क्रीडा स्पर्धा संपन्न

सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन ड' झोन खो-खो  स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत १० संघांनी सहभाग नोंदवला.या स्पर्धा दिनांक 6 ऑक्टोबर 2022 रोजी महाविद्यालयाच्या मैदानावर संपन्न झाल्या. परभणी व हिगोली जिल्ह्यातील मुलांच्या व मुलीच्या संघाने सहभाग नोंदवला. यामध्ये मुलीचे मिळून दहा शिवाजी महविद्यालय परभणी, ज्ञानोपासक महाविद्यालय जिंतुर , बहीर्जी महाविद्यालय वसमत,के के एम महाविद्यालय मानवत,न्यु माँडेल काँलेज हिंगोली,कै.रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ या संघाने सहभाग नोंदवला.विजेत्या खेळाडूनां प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले यामध्ये शिवाजी महाविद्यालय परभणी च्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. ज्ञानोपासक महविद्यालय जिंतूर संघाने द्वीतीय क्रमांक पटकावला.तर कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. विजयी संघाला महाविद्यालयाकडुन ट्राँफी देण्यात आली.मुलांमध्ये के के एम महाविद्यालय मानवत च्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला, श्री शिवाजी महविद्यालय परभणी चा संघ द्वीतीय तर कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या संघाने त्तृतीय क्रमांक पटकावला. याच ठीकाणी  ड झोन ची निवड चाचणीतून संघ निवडण्यात आला निवड चाचणी साठी स्व.नितीन महाविद्यालय पाथरी,नुतन महाविद्यालय सेलू,संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड येथील खेळाडू सहभागी झाले.या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून  मा. श्री परमेश्वरराव कदम (अध्यक्ष, हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ सोनपेठ) यांची उपस्थिती होती. तर उद्घाटक म्हणून सोनपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदीप बोरकर साहेब यांची उपस्थिती होती.प्रमुख पाहुणे म्हणून ड झोन क्रीडा स्पर्धा चे सचिव मा.डॉ मीनानाथ गोमचाळे,  पत्रकार श्री गणेश पाटील श्री शिवमल्हार वाघे,सोनपेठ दर्शन चे संपादक श्री किरण स्वामी हे होते. स्पर्धा संयोजक प्राचार्य डॉ.वसंत सातपुते व क्रीडा संचालक डॉ. गोविंद वाकणकर यांनी स्पर्धेसाठी पंच म्हणून डॉ.नागनाथ गजमल, डॉ.निरंजन अखमार,डॉ.पवन पाटील,श्री लांडगे एम एस,डॉ.माधव कदम,डॉ अंकुश सोळंके,डॉ.संतोष कोकीळ,डॉ.कमलाकर कदम,प्रा.नारायण शिंदे,डॉ मुकुंदराज पाटील(वि.ह.क.समन्वयक), महाविद्यालयातील क्रीडा समितीचे सदस्य डॉ.कल्याण गोलेकर,डॉ.संतोष रणखांब,डॉ. अशोक जाधव,डॉ मुक्ता सोमवंशी,डॉ मारोती कच्छवे, डॉ.बालासाहेब काळे,डॉ.शिवाजी अंभुरे,डॉ साहेबराव सोनसळे, प्रा.अंगद फाजगे,प्रा.सकाराम कदम,प्रा.विकास रागोले,प्रा.संदिप देवराये,डॉ.अनंत सरकाळे,डॉ अशोक चव्हाण,डॉ सूनिता टेंगसे,डॉ.प्रा.दिल्लीप कोरडे, प्रा.महालिंग मेहत्रे,श्री सचिन साबळे,श्री रोहित शिंदेप्रा कैलास आरबाड,दत्ता सोनटक्के,चद्रंपाल पटके,भागवत हाके या सर्वांनी स्पर्धा यशश्वीतेसाठी मदत केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष रणखांब यांनी केले.तर आभार क्रीडा संचालक डॉ.गोविंद वाकणकर यांनी मानले.

Sunday, October 9, 2022

कुटुंब कल्याण शस्त्रक्रीयेत सहभागी व्हा : डॉ.सुभाष पवार

कुटुंब कल्याण शस्त्रक्रीयेत सहभागी व्हा : डॉ.सुभाष पवार
सोनपेठ (दर्शन) :- 

वाढत्या लोकसंख्येवर शासनाच्या वतीने उपाययोजना आखण्यात येत आहेत. वाढती लोकसंख्येला आळा घालण्यासाठी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया (एकटाका) हा एक मार्ग आहे. शेळगाव येथे १३ ऑक्टोबरला होणाऱ्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रीयेत सहभागी होण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी केले आहे.
शेळगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात १३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया (एकटाका) च्या आढावा बैठकीत बोलत होते. पुढे बोलताना डॉ. पवार म्हणाले,शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या आजारांना आळा घालण्यासाठी मुख्यतः लहान मुलांसाठी व्हिसीजी, पोलिओ, पेंटा, गोवर, रूबेला आदी लसीकरण करण्यात येतात. या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. सुभाष पवार यांनी यावेळी केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मुंडकर, आरोग्यसेविका मुंडे, डांगे, आरोग्यसेवक चव्हाण, मुंडे यांच्यासह प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

बर्दापूर येथे काशी जगद्गुरु अड्डपालखी सोहळ्यात सहभागी व्हा - सुभाषअप्पा नित्रुडकर

बर्दापूर येथे काशी जगद्गुरु अड्डपालखी सोहळ्यात सहभागी व्हा - सुभाषअप्पा नित्रुडकर

सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील अखिल भारतीय वीरशैव महासंघ मराठवाडा अध्यक्ष तथा श्री गुरु 108 जन्नबसव गुरुमहालिंग शिवाचार्य महाराज यांचे सल्लागार विश्वस्त सभासद सुभाषअप्पा महादेवअप्पा नित्रुडकर यांनी समस्त वीरशैव समाज बंधू व भगिनींना दिनांक १० ऑक्टोबर व दिनांक ११ ऑक्टोबर २०२२ या दोन दिवसीय "शिवदिक्षा व अय्याचार संस्कार सोहळ्या" निमित्त बर्दापूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथे श्री श्री श्री १००८ काशी जगद्गुरु डॉ.मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांची अड्डपालखी उत्सव व धर्मसभा दिनांक १० ऑक्टोबर २०२२ सोमवार रोजी दुपारी १:३० वाजता रेणुका माध्यमिक विद्यालय (कचेरी मठ) बर्दापूर येथून प्रारंभ होणार आहे तरी मराठवाड्यातील तमाम वीरशैव बंधू भगिनींनी या नयनरम्य सोहळ्याचा व दर्शन आशीर्वचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.या धर्मसभेत मराठवाड्यातील १५ शिवाचार्य महाराज उपस्थित राहणार असून दोन दिवसीय "शिवदिक्षा व अय्याचार संस्कार सोहळ्या" मध्ये विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत तरी सर्व धार्मिक कार्यक्रमास व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सुभाषअप्पा महादेवअप्पा नित्रुडकर यांनी केली आहे.

Wednesday, October 5, 2022

गणेश नगर येथे सुमित पवार यांच्या हस्ते साईबाबा यांची आरती संपन्न

गणेश नगर येथे सुमित पवार यांच्या हस्ते साईबाबा यांची आरती संपन्न 
सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ शहरातील गणेश नगर येथे दि.५ आँक्टोबर विजयदशमीच्या निमित्ताने श्री साईबाबा मंदिर येथे गणेश नगर मित्र मंडळ यांच्या वतीने युवा नेते सुमित पवार यांच्या हस्ते आरती ठेवण्यात आलेली होती व त्यानिमित्ताने आरतीसाठी उपस्थित राहून श्री साईबाबा यांची आरती करून श्री साईबाबाचे दर्शन घेतले व सर्वांना विजयदशमीच्या शुभेच्छा दिल्या व महाप्रसादाचा लाभ घेतला.शिर्डी येथील श्री साईबाबांनी 1918 साली दसऱ्याच्या दिवशी दुपारी अखेरचा श्वास घेतला.असे म्हणतात की साई बाबांनी आपल्या भक्तांना सांगितले की दसऱ्याचा दिवस त्यांच्यासाठी जगाचा निरोप घेण्याचा सर्वोत्तम दिवस होता आणि त्यांनी आधीच सूचित केले होते.त्यांनी 15 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी शिर्डीत समाधी घेतली.अन्नपाण्याचा त्याग करून, नश्वर देहाचा त्याग करून ते ब्रह्मलीन झाले होते,तो दिवस विजयादशमी दसर्‍याचा दिवस होता.या प्रसंगी साईबाबा मंदिर चे निर्माते महादेव मोरे, गणेश नगर येथील नागरिक व शहरातील साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कै.रमेश वरपूडकर महाविद्यालयात उद्या पासून "ड" झोन खो-खो स्पर्धेस सुरुवात

कै.रमेश वरपूडकर महाविद्यालयात उद्या पासून "ड" झोन खो-खो स्पर्धेस सुरुवात

सोनपेठ (दर्शन) :-

कै.रमेश वरपूडकर महाविद्यालयात उद्या दिनांक ६ व ७ ऑक्टोबर २०२२ पासून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत व कै.र.व.महाविद्यालय संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन खो-खो मुले व मुली यांच्या स्पर्धा होणार आहेत उद्घाटन उद्या सकाळी ११ वाजता तर उद्घाटक म्हणून संदीप बोरकर सपोनी, कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था अध्यक्ष परमेश्वर कदम, प्रमुख पाहुणे डॉ.मीनानाथ गोमचाळे आखाडा बाळापूर, मार्गदर्शक डॉ.चंद्रकांत सातपुते गंगाखेड, संयोजक प्राचार्य डॉ.वसंत सातपुते व क्रीडा विभाग संचालक डॉ.गोविंद वाकणकर. या खो खो स्पर्धेसाठी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील मुलं आणि मुली आदींचे संघ सहभागी होणार आहेत.दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन कै. रमेश वरपुरकर महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक,क्रीडा शिक्षक व कर्मचारी बांधवांनी जय्यत तयारी केलेली दिसून येत आहे.

Monday, October 3, 2022

गुढघे दुःखी पासून मुक्ती साठी रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोनपेठ आयोजित शिबीरास प्रचंड प्रतिसाद

गुढघे दुःखी पासून मुक्ती साठी रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोनपेठ आयोजित शिबीरास प्रचंड प्रतिसाद 
सोनपेठ (दर्शन) :-

रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोनपेठ सिटी यांच्या व डॉ. राममनोहर लोहिया आरोग्य जीवन संस्था राजस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ( भव्य रोग निदान शिबिर ) गुढघे दुखी व कमर दुखी उपचार बिना आपरेशन जर्मन टेक्नालजी व १००% गॅरंटी आपल्या शहरात प्रथमच दिनांक 3 आक्टोबर रोजी सुरुवात झाली,पहिल्याच दिवशी 90 पेशंटची नोंद झाली.दिनांक आज  4, 5, 6, 7 व 8 ऑक्टोबर सोमवार पासुन वेळ : दररोज सकाळी 9.00 ते दु. 01, सायं. 3 ते 8 आता गुढघे (साधेरोपण) बदलण्याची आवशक्ता नाही उपचार थेरेपी  न्युरोथेरेपी  व्हाईब्रेट थेरेपी  फायर व्हॅक्युम (कप्पींग) नोंदणी फ्रिस रु.200/- 6 दिवसाकरीता शिबीराचा पत्ता :- छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतीक सभागृह,सोनपेठ (जुने पोलीस स्टेशन जवळ) तज्ञ डॉक्टर डॉ. आर. के. मिठीया (MPT).डॉ. विक्रम मशाल (Neurotherpist). अजुन पुढील 5 दिवसासाठी जास्तीत जास्त लोकांनी आरोग्य शिबीरात नाव नोंदवुन उपचार करून घ्यावेत असे आवाहन रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोनपेठ अध्यक्ष लिंबाजी कागदे व सर्व सदस्यांनी केले आहे.

युवा नेते सुमीत पवार यांनी केली स्वखर्चाने धूर फवारणी

युवा नेते सुमीत पवार यांनी केली स्वखर्चाने धूर फवारणी



सोनपेठ (दर्शन) :-

आज पाहिला गेले तर सरकारी तिजोरीतून जनतेसाठी कोणीही काम करेल पण निस्वार्थ स्वखर्चातून काम करण्यासाठी निस्वार्थी भावना मनात असायला पाहिजे.
डेंग्यू, मलेरिया यांसारखे अनेक गंभीर आजार केवळ डासांमुळे होत असतात.अनेक रोगांना कारणीभूत असलेल्या डासांच्या संख्येवर नियंत्रण राहावे यासाठी आज सोनपेठ शहरात सोनखेड भागात धूर फवारणी करण्यात आली व शहरातील प्रत्येक प्रभागात औषधी युक्त धूर फवारणी करण्याचे काम युवा नेते सुमीत पवार हे करणार आहेत.शहरातील प्रत्येक प्रभागात सुमीत पवार यांच्या माध्यमातून औषधी युक्त धूर फवारणी करण्यात येत आहे. प्रत्येक नाल्यांमध्ये,इमारतींमधील सांडपाणी व्यवस्था, तसेच साचलेली डबके याठिकाणी औषधी युक्त धूर फवारणी करण्यात येत आहे.या सतकार्या बद्दल तमाम जनतेनी तसेच सर्व स्तरातून युवा नेते सुमित पवार यांचे आभार व्यक्त होताना दिसत आहेत.