Friday, May 27, 2022

ग्रामपंचायत सदस्य दैवशाला काकडवार यांचे सदस्यत्व रद्द व दंड ; दयानंद यादव यांच्या प्रयत्नांना यश

ग्रामपंचायत सदस्य दैवशाला काकडवार यांचे सदस्यत्व रद्द व दंड ; दयानंद यादव यांच्या प्रयत्नांना यश

सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ तालुक्यातील शिरोरी ग्रामपंचायत सदस्य दैवशाला काकरवार यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व माननीय जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी अर्जदार दयानंद यादव यांचा विविध नऊ मुद्द्यावरून तक्रार दैवशाला काकरवार यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात यावे हा अर्ज मान्य करून,माननीय तहसीलदार यांच्या अहवालानुसार गैरअर्जदार दैवशाला काकरवार यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 13 (2 अ) अन्यन्वे ग्रामपंचायत शिरोरी च्या सदस्य पदावरून अनर्ह (रद्द)ठरविण्यात येते,निवडणूक लढविण्यासाठी खोटे व बनावट कागदपत्रे दाखल करून प्रशासनाची दिशाभूल केल्याने त्यांना (पाच हजार रुपये) 5000/- दंड लावण्यात आला तसेच ,गैर‌अर्जदाराकडून दंडाची रक्कम वसूल करण्याची जबाबदारी माननीय तहसीलदार यांच्यावर सोपविण्यात आली आहे.ग्रामपंचायत शिरोरी च्या या निकालाने अनेक ग्रामपंचायत सदस्यांचे धाबे दणाणले दिसून येत आहेत.दयानंद यादव यांनी माननीय जिल्हाधिकारी यांचे आभार व्यक्त केले आहेत.

No comments:

Post a Comment