संसदरत्न खा.सुप्रिया सुळे उपस्थीतीत बाल विवाह प्रतिबंध जागृती अभियान महिला परिषद् तथा कार्यकर्ता मेळावा
काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे शुक्रवारी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीसह श्रीक्षेत्र नृसिंह पोखर्णी येथे त्या दर्शन घेतील.त्यानंतर सोनपेठ तालुका राष्ट्रवादी कांग्रेस आयोजित बाल विवाह प्रतिबंध जागृती अभियान महिला परिषद् तथा कार्यकर्ता मेळावा दुपारी ४ वाजता पद्मिनी मंगल कार्यालय विटा रोड सोनपेठ येथे उपस्थित राहणार आहेत व त्यानंतर लातूरकडे रवाना होतील.त्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका व शहर कार्यकाकरणी बैठकीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर, तालुका अध्यक्ष दशरथ सुर्यवंशी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मीकांत देशमुख व माजी नगरसेवक अॕड.श्रीकांत विटेकर यांच्या नेतृत्वाखाली स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे तरीही बाल विवाह प्रतिबंध जागृती अभियान महिला परिषद् तथा कार्यकर्ता मेळावा व स्वागतासाठी सर्व स्तरातून नागरिकांनाही आवाहन करण्यात आले आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व आघाडी महिला व युवक तालुका व शहर अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते,आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, सभापती, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, चेअरमन आदींनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व आघाडी तालुका व शहर अध्यक्ष यांच्या वतीने करण्यात आले आहे.






No comments:
Post a Comment