सात नगरपालिकांत ३४ आक्षेप दाखल, सोनपेठ नगर परिषद ३ आक्षेप दाखल...
परभणी जिल्ह्यातील सात नगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेवर शनिवारी अखेरच्या दिवशी एकूण ३४ आक्षेप दाखल झाले आहेत.
जिल्ह्यातील जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड आणि पूर्णा या ७ नगरपालिकांची निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. या प्रभाग रचनेवर १० ते १४ मे या कालावधीत आक्षेप दाखल करावयाचे होते. त्यानुसार शनिवारपर्यंत शेवटच्या दिवशी एकूण सर्वाधिक म्हणजे तब्बल १७ आक्षेप मानवत नगरपालिकेत दाखल झाले आहेत. त्यानंतर गंगाखेड, सोनपेठ, सेलू येथे प्रत्येकी ३, जिंतूर येथे ६. पूर्णा येथे २, तर पाथरी येथे १ आक्षेप दाखल झाला आहे. आता या आक्षेपांवर जिल्हाधिकारी २३ मेपर्यंत सुनावणी घेणार आहेत. त्यानंतर ३० मेपर्यंत सुनावणीअंती आक्षेपांवर अभिप्राय देऊन याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी निवडणूक आयुक्तांकडे सादर करणार आहेत. निवडणूक आयुक्त ६ जूनपर्यंत अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देणार आहेत. त्यानंतर ७ जून रोजी अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध केली जाणार आहे.सोनपेठ नगर परिषद ३ आक्षेप दाखल आहेत सर्वांचे यावर लक्ष लागून राहिले आहे.


No comments:
Post a Comment