श्री आद्य जगद्गुरू दारूकाचार्य प्रकटदिन सोहळा व जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव सुरू
सोनपेठ (दर्शन):-
सोनपेठ शहरातील श्री नंदिकेश्वर मठ संस्थान येथे श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनात श्री आद्य जगद्गुरू दारूकाचार्य प्रकटदिन सोहळा व जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव प्रारंभ दि.२ मे २०२२ सोमवार तर सांगता दि.०६ मे २०२२ शुक्रवार सर्व सद्भक्तांना कळविण्यात अत्यानंद होतो कि आद्य शिवयोगी श्री गुरू नंदिकेश्वर स्वामी मठ संस्थान सोनपेठ प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी श्री.आद्य जगद्गुरू दारूकाचार्य प्रकट दिन सोहळा व युगप्रवर्तक जगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवा निमीत्त ग्रंथराज श्री सिद्धांत शिखामणी पारायण शिवकिर्तन आयोजित केले आहे तरी सर्व सद्भक्तांनी कार्यक्रमास सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी.दिनांक / वार दि.०२ मे २०२२ सोमवार पासून दैनंदिन कार्यक्रम:- सकाळी ९ ते १२ पारायण १२ ते ०२ प्रसाद ०४ ते ०६ भजन शिवपाठ सुरुवात करण्यात आली आहे.विनीत श्री गुरू नंदिकेश्वर महिला भजनी मंडळी व सद्भक्त मंडळी, सोनपेठ,स्थळ आद्य शिवयोगी श्री गुरू नंदिकेश्वर स्वामी मठ संस्थान,सोनपेठ, जि. परभणी.अन्नदाते श्री. रविंद आप्पा शेटे,दि.०३ मे २०२२ मंगळवार अन्नदाते श्री.सदाशिव अप्पा राजमाने,दि.०४ मे २०२२ बुधवार अन्नदाते श्री.सुरेश आप्पा पोपडे,दि.०५ मे २०२२ गुरुवार श्री.कोंडिबा गुरुजी एकलारे,दि.०६ में २०२२ शुक्रवार सकाळी ११ ते १२ शि.भ.प. सौ. शकुंतलाताई शिवहार आप्पा चाकुरे (साखरा) यांचे प्रसादाचे किर्तन होऊन नंतर समस्त बरदाळे परिवार सायखेडा यांच्या वतीने महाप्रसाद होईल.

No comments:
Post a Comment