सोनपेठ मार्गे लवकरच परभणी - पुणे व परभणी - बीड या दोन नवीन लांब पल्ल्याच्या बस सुरू होणार
सोनपेठ तालुक्यातील तमाम नागरिकांना अतिशय आनंदाची बातमी आपनाला सोनपेठ येथून लांब पल्ल्याच्या बस सुरू व्हाव्यात यासाठी सोनपेठ तालुका मराठी पत्रकार संघाचे अनेक सदस्य वर्षानुवर्षे प्रयत्न करत होते, शेवटी परभणी आगार व्यवस्थापक तसेच कृष्णा राडकर पाटील यांच्या प्रयत्नातून उद्या पासून परभणी , सोनपेठ , सिरसाळा ,तेलगाव , बिड बस सेवा सकाळी व सायंकाळी दोन बस सुरु होणार आहे तसेच परभणी , पोखर्णी , शिर्शी , सोनपेठ , सिरसाळा , तेलगाव , बिड , गेवराई मार्गे पुणे हि बस सेवा लवकरच सुरू होणार असल्याचे कृष्णा राडकर पाटील यांनी सांगितले आहे,या नविन बस सेवेस जास्तीत जास्त प्रवासी बांधवांनी पंचक्रोशीतील नागरिकांना सुरक्षित प्रवास बसचा प्रवास म्हणून सर्व प्रकारच्या बस च्या सवलतीचा लाभ हि होणार असल्याने या बसांना प्रतिसाद देऊन आनखी आपल्या मागण्या पंढरपूर, लातूर, औरंगाबाद, मुंबई देखील सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.सर्व प्रवासी बांधवांनी सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.


No comments:
Post a Comment