28 मे रोजी भव्य महानृत्य स्पर्धा
सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
परभणी / सोनपेठ (दर्शन) : -
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हतीअंबीरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त शनिवार दि. 28 मे रोजी येथील बी. रघुनाथ सभागृहात ‘भव्य राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा युवा-जल्लोष 2022’ चे आयोजन करण्यात आले आहे.
मागील 2 वर्षापासुन या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.कलावंतांच्या प्रतिभेला चालणा मिळावी व हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या स्पर्धेच आयोजन करण्यात येत. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून ही स्पर्धा दोन गटात घेण्यात येणार आहे.
त्यामध्ये ‘शालेय गट’ - वैयक्तिक नृत्य स्पर्धा वय 14 वर्षांपर्यंत प्रथम बक्षीस- 5 हजार रुपये, सन्मानचिन्ह, द्वितीय बक्षीस- 3हजार रू. आणि तृतीय बक्षीस- 2 हजार रू. व सन्मानचिन्ह व उत्तेजनार्थ 1 हजार रुपयांची दोन बक्षीसे असे असणार आहे. तसेच ‘खुला गट-’ वैयक्तिक नृत्य स्पर्धा प्रथम बक्षीस- 7 हजार व स्मृतिचिन्ह, द्वितीय बक्षीस - 5 हजार व स्मृतिचिन्ह, तृतीय बक्षीस - 3 हजार व स्मृतिचिन्ह तर उत्तेजनार्थ बक्षीस - 1 हजार रुपयांची दोन पारितोषिके देण्यात येणार आहेत.
सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात येईल. ही स्पर्धा व्यवसायिक कलावंतांसाठी नसेल. स्पर्धेचे आयोजक प्रा. सुनील तुरुकमाने, कार्याध्यक्ष राहुल वाहिवळ, कार्यवाह पंकज खेडकर, सहकार्यवाह राजेश रणखांब, मुख्य समन्वयक उमेश शेळके, स्पर्धा संयोजक सोहम खिल्लारे हे असून या स्पर्धेसाठी संदीप राठोड, प्रेम लहाने, संदीप गायकवाड, कपिल भरणे, शे.जावेद, प्रमोद पुंडगे, प्रा.अतुल वैराट, गिरीश इजागत आदी परिश्रम घेत आहेत. अधिक माहितीसाठी प्रा. सुनील तुरुकमाने (9422177711), राहुल वाहिवळ (9890862357, पंकज खेडकर (9823093235), उमेश शेळके (9881616131), प्रा.राजेश रणखांब (9763231331) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.