दलित वस्ती निधी चा वापर वस्ती सोडून करू नये रिपाईचे भूषण मोरे यांचे अभ्यंकर यांना निवदन
परभणी सोनपेठ (दर्शन) :-
महानगरपालिका अंतर्गत दलित वस्तीसाठी राज्य शासनाकडून मिळणारा निधी हा अनुसूचित जाती व नवबौद्ध यांची संख्या ज्या ठिकाणी 50 टक्के पेक्षा कमी असून देखील त्या ठिकाणी हा निधी वापरला जातो यामुळे या निधीचा गैरवापर होत असून हा थांबविण्यात यावा या आशयाचे निवेदन राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष भूषण मोरे यांच्यातर्फे देण्यात आले. सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनातर्फे परभणी महापालिकेला मिळालेला दलित वस्ती चा निधी महापालिकेतील आयुक्त व शहर अभियंता हे ज्या ठिकाणी अनुसूचित जाती व नवबौद्ध यांचे 50 टक्के पेक्षा कमी लोकसंख्या असून देखील त्या ठिकाणी दलित वस्ती चे कामे करण्यात येत असल्याने जे प्रभाग राखीव आहेत त्या ठिकाणी आजही रस्ते नाल्यांचे व्यवस्था नसल्याने येथील दलित लोकांवर अन्याय होत असल्याने येथील लोकांना आजही नाल्या रस्ते दिवे यांच्या सुविधा मिळत नाहीत यामुळे या लोकांवर अन्याय होत असल्याची तक्रार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष भूषण मोरे त्यांनी राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष अभ्यंकर यांच्याकडे केली आहे याप्रकरणी अभ्यंकर यांनी भूषण मोरे यांना जिल्हाधिकारी समक्ष सदरील प्रकरण मी हाताळून जिल्हाधिकारी यांना निर्देश देईल असे सांगितले.

No comments:
Post a Comment